प्रत्येकाने मास्क वापरला तर ७० हजार लोकांचा मृत्यू रोखता येईल : IHME चा अहवाल 

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा देखील अनेक अहवाल, अंदाज, निष्कर्ष समोर येत होते.  यातले किती निष्कर्ष आणि अहवाल योग्य ठरले हा खरतर अभ्यासाचा विषय.  पण कोरोना काळात एक गोष्ट मात्र पक्की लोकांना समजली असेल आणि ती म्हणजे कोणतिही शुल्लक वाटणारी गोष्ट हलक्यात घ्यायची नसते. 

आत्ता जो अहवाल मांडण्यात आला आहे त्यानुसार सध्याच्या ग्रोथ प्रमाणेच आकडेवारी वाढू लागली तर मे महिन्यात कोरोनामुळे देशभर होणाऱ्या मृत्यूंची संख्या ५ हजार ६०० पर्यन्त जावू शकते. 

याच अभ्यासात सांगण्यात आलय की भारतात युनिव्हर्सल मास्क कव्हरेज लागू झाला अर्थात सर्वच घटकातील लोकांनी मास्क वापरण्यास सुरवात केला व त्याचं कठोरपणे अबलंबन केलं तर ७० हजार लोकांचा मृत्यू रोखता येवू शकतो.

वॉशिंग्टन विद्यापिठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मिट्रिक्स एन्ड इवोल्यूशन अर्थात IHME मार्फत हा अभ्यास करण्यात आला आहे.  यामध्ये संशोधकांनी भारतात वाढणाऱ्या कोरोना केसेसची आकडेवारी आणि मृत्यूदराचा अभ्यास करून अहवाल मांडलेला आहे. 

यामध्ये कोरोनाच्या दूसऱ्या लाटेचा पीक पॉईन्ट १० मे असेल अस सांगण्यात आलय. तेव्हा हा मृत्यूदर दिवसाला ५६०० होईल अस सांगण्यात आल आहे.  या अहवालानुसार १२ एप्रिल ते १ ऑगस्ट पर्यन्तच्या ३,२९,००० मृत्यूंची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  भारतात आजवर ६ लाख ६५ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे… 

आत्ता हा सगळा जर तर चा अंदाज. यातून तुमच्या मनात भिती निर्माण करणं हा देखील आमचा उद्देश नाही. आमचा उद्देश इतकाच आहे की या अहवालात सांगितलेली सर्वात मोठ्ठी आणि महत्वाची गोष्ट. 

ती म्हणजे मास्क वापरा. संपुर्णपणे मास्क वापरून संरक्षण केल्यास संभाव्य मृत्यूसंख्येतला ७० हजारांचा आकडा कमी होवू शकतो. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.