ऑनलाईन जनावरं विकण्याची IIT च्या पोरींची भन्नाट आईडीया

स्टार्टअप हा शब्द आजकाल आपल्या जवळचा वाटायला लागलाय. खास करून कोरोना झाला त्यानंतर स्टार्टअपची तर लाटचं यायला लागला. नोकरी गमावलेल्या मंडळींनी ब्रेकअप झाल्यासारखं ती वाटचं बदलली, आणि स्टार्टअपशी हात मिळवून नव्या मार्गावर चालायला सुरुवात केली. आणि आज ती सक्सेसच्या वाटेवर आहेत.

 

आता स्टार्टअप म्हटलं की,

खाण्या- पिण्याचे, ब्रँडेड कपड्यांचे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे, ब्युटी प्रॉडक्ट किंवा इतर कुठलं सामानाचे स्टार्टअप पाहिले असतील, पण जनावरांना ऑनलाईन विकण्याच्या स्टेटस बद्दल कधी ऐकलयं? नाही ना… आणि कोणी विचार सुद्धा केला नसेल .  

 

पण नीतू यादव आणि कीर्ती जांगरा या दोन्ही मैत्रिणींनी मिळून हा युनिक असा स्टार्टअप सुरु केलाय. फोर्ब्सच्या सुपर 30 च्या यादीत ही दोन नावे यावेळी सर्वाधिक चर्चेत असल्याचं बोललं जातयं.

या दोघींनी आपल्या दुधाच्या व्यवसायातून 250 मिलीयन डॉलरता व्यवसाय उभा केलाय. 

26 वर्षांची नीतू ही राजस्थानमधील एका दूध व्यवसायाची मुलगी, तर किर्तीचे वडिल हरियाणामध्ये सरकारी कर्मचारी आहेत.

दोघींनी आयआयटी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले. पण पोस्ट इंजीनियरिंग डिग्री करण्याऐवजी दोघींनी स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली.

कीर्ती जांगरा यांनी अमेरिकेत मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतलेलं. करिअर सोडून कीर्तीने स्टार्टअपमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या दोघींची आयडिया होती की, जनावर भाड्यानं देऊन तिला गुरांच्या व्यापारासाठी ऑनलाइन मार्केटप्लेस सुरू करायचं. 

ही कल्पना प्रत्यक्षात उतरवतवी गेली. आणि त्यांनी animall.in नावाने एक मोबाइल अॅप लॉन्च करण्यात आलं. जे अॅप 2019 मध्ये लाँच करण्यात आले. हे अॅप म्हणजे बडी कमाल की चीज..

म्हणजे अॅनीमोल अॅपवर तुम्ही घरबसल्या जनावरांची खरेदी-विक्री करू शकता. एवढच नाही तर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्राण्यांबद्दल बरीच माहिती मिळू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे या वेबसाइटद्वारे तुम्हाला पैसे जिंकण्याची संधी मिळेल.

 

आता भिडूनं सुद्धा अशा स्टार्ट बद्दल ऐकले तेव्हा कळालं की, अॅनीमोल हे भारतातील अशा प्रकारचे एकमेव मोबाइल अॅप आहे.

हे ॲप 100 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या प्राणी विक्रेते आणि खरेदीदारांची माहिती देते

अॅनीमोल हे 100 किलोमीटरच्या अंतरात असलेल्या प्राणी विक्रेते आणि खरेदीदारांची माहिती देते. ज्यामुळे तुम्ही त्यांच्याशी सहज संपर्क साधू शकता आणि किंमतींवर चर्चा करू शकता.

या अॅपद्वारे खरेदी-विक्रीसोबतच पशुपालकांना त्यांच्या जनावरांच्या आजारांबाबत सल्लाही मिळू शकतो. अॅपवर प्राण्यांच्या आरोग्याबाबत सल्ला घेण्यासाठी पशुवैद्य सहज उपलब्ध आहेत.

कंपनीचा दावा आहे की, आतापर्यंत अडीच लाख पशुपालक शेतकरी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत आणि सुमारे 10 लाख खरेदीदार देखील जोडले गेले आहेत.

नीतू आणि किर्तीने दोन वर्षांपूर्वी तर अॅनी हा वीकेंडला पार्ट टाइम म्हणून स्टार्टअप सुरु केला होता. पण आता ही छोटी कंपनी व्यवसायात सामील झालीये. या अॅपच्या मदतीनं दोघींनी आतापर्यंत 250 मिलीयन डॉलरचा फंड जमा केलाय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.