IIT चा इंजिनियर नोकरी सोडून शेती करायला लागला; वर्षाला 20 कोटींची उलाढाल करतोय !!

सध्याच्या काळात आम्ही आरामाची नोकरी शोधतो. त्रास होऊ नये आरामात आमचं आयुष्य निघावं म्हणून प्लॅनिंग करत असतो. तसंही शेती हा तोट्याचा विषय आहे. त्यामुळे शेतीतून काय भेटत नाही हा आमचा गैरसमज झालेला आहे. मात्र बेंगलोरच्या श्रीराम चितलूर यांनी असा विचार केला नाही.

त्यांनी शेती करण्यासाठी IIT मधली नोकरी सोडली. शेतीमध्ये तुम्ही करोडपती होऊ शकता हे सगळ्यांना दाखवून दिलं. त्यांची ही कहाणी शेतात आपलं करिअर घडवणाऱ्यांसाठी खुप प्रेरणादायी आहे.

श्रीराम चितलूर हे मुळचे बेंगलोरचे. आयआयटीमध्ये ते नोकरी करत होते. मात्र त्यांना शेती करण्याची इच्छा होती. तसं ते पिढीजात शेतकरी नव्हते. मात्र शेतात नवीन प्रयोग करण्याची त्यांची इच्छा होती. हीच इच्छा त्यांना शांत बसु देत नव्हती. त्यांच्याकडे शेती नाही म्हणून त्यांनी शेती खरेदी करण्याची तयारी केली. शेती खरदे करण्यासाठी शोधाशोध सुरू केली. आंध्रप्रदेशमध्ये शेती घेतली.

नोकरी करत असल्यामुळे शेतीत ते पुर्णवेळ देऊ शकत नव्हते. त्य़ामुळे सोपी शेती करण्याचं त्यांनी ठरवलं आणि 2008 मध्ये त्यांनी चंदन शेतीची लागवड केली. त्यावेळेस त्याच्यासोबत अशोक जयथी नावाचे त्याचे मित्र सुद्धा सहभागी झाले. त्यांची 30 एकर शेती होती.

त्यामुळे दोघांनीही एकत्र येत या शेतात चंदन लागवड केली.

दोघंही जाँब करत असल्यामुळे त्यांना चंदन शेती करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र शेतात काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. शेतात आयुष्यभर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतून फायदा मिळावा यासाठी ते प्रयत्नशिल होते.

त्यासाठी त्यांनी शेतीचा अभ्यास सुरू केला. कारण आधुनिक शेती करायची असेल तर शेतीत नवीन प्रयोग करायला हवे. शेतीचं परिक्षण करून त्या पद्धतीचे पिकं त्यात घ्यायला हवेत. शेतकऱ्यांना एकत्र येवून मार्गदर्शऩ करायला हवं. यासाठी त्यांनी 2011 साली होसाचिगुरु अॅग्रो-फॉरेस्ट्री नावाची कंपनी सुरू केली.

त्याच वेळी त्यांच्यासोबत श्रीनाथ शेट्टी हे तिसरा पार्टनर म्हणून जाॅईन झाले.

श्रीनाथ शेट्टी यांच्याकडे शेतीचा अनुभव होता. त्यांनी शेती क्षेत्रात अनेक वर्ष काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या अनुभव कामी येणार होता. तीन जणांची टिम रेडी झाली होती. त्यांनी आपल्या कंपनीमार्फत शेती करण्याचं ठरवलं.

या कंपनीचा उद्देश होता की, शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करायचं. त्यासाठी त्याच्य़ा शेताचं परिक्षण करायचं. कोणतं पिक घ्यायचं याबद्दल मार्गदर्शन करायचं. त्यासाठी त्यांनी दोन पर्याय दिले.

ज्यांना आधुनिक शेती करायची असेल त्यांनी आमच्या कंपनीकडून शेती विकत घ्यायची.

कारण या कंपनीमार्फत शेती विकत घेणाऱ्यांना ते आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची यांचं मार्गदर्शन करत होते.

त्या शेताचं संपुर्ण परिक्षण करून नेमकं कोणतं पिकं घ्यायचं, कोणती खतं वापरायची, विक्री कुठं करायची, मातीची कंडीशन कशी आहे. पाण्याची किती आवश्यकता लागणार आहे. यांचा संपुर्ण अभ्यास करून ही शेती विकली जाणार होती.

तर दुसरा पर्याय असा होता की, ज्या शेतकऱ्यांकडे आपली स्वत:ची शेती आहे. त्यांनी आपली शेती आमच्या कंपनीला जोडावी.

आधुनिक शेतातली सगळी माहिती आम्ही तुम्हाला पुरवू. तसंच तुमच्या शेतात येणारं पिक हे डायरेक्ट कंपनीच्या मार्फत चांगल्या किंमतीत विकलं जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत गेला.

सध्या ही कंपनी दोन पद्धतीमध्ये शेती करत आहे. ज्या शेतकऱ्याचं बजेट कमी आहे. त्यांना वर्षाकाठी उत्पन्न हवं आहे. त्याच्यासाठी कमी कालावधीत येणारी पपई, टरबुज, ढोबळी मिरची, ही पिकं घेतली जातात. त्यासाठी सगळी यंत्रणा कंपनीमार्फत पुरवली जाते.

तसंच ज्या शेतकऱ्यांचं बजेट मोट्ठं आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतीत चंदन, सागवान, मेलिया डुबीया ही झाडं लावली जात आहेत.

श्रीराम सांगतात की, आमच्या कंपनीच्या योग्य नियोजनामुळे शेतकरी खुश आहेत. त्यांना आधुनिक शेतीच्या माध्यमातून लाखोंचा फायदा होतोय. आमच्या शेतीतून तयार होणारं लाकूड आम्ही डायरेक्ट फर्निचर करणाऱ्या मोठ्या कंपनींना देत आहोत.

शेतातून निघणारा माल मध्यस्थीला न देता डायरेक्ट बाजारात विकत आहोत. त्यामुळे आमची कंपनी नफ्यात आहे. तसंच शेती ही तोट्याची आहे, किंवा परवडत नाही, या गैरसमजुतीवर आम्ही कायमची मात केलेली आहे.

शेताचा एक तुकडा खरेदी करून सुरू झालेली श्रीराम चितलूर यांची शेती आज तब्बल 800 एकरवर पसरली आहे.

त्याच्या कंपनीसोबत आज 800 एकर शेती जोडली गेली आहे. या 800 एकर शेतीत त्यांनी 18 पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. याच शेतीतून आज त्यांची कंपनी वर्षाकाठी 20 कोटींची उलाढाल करत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.