राजेश खन्नाने या कारला एवढं हिट केलं की लोक तिला गाड्यांची सुपरस्टार म्हणून लागले..
ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक जास्त टॉप कार येतात जातात, परंतु अशा काही कार आहेत ज्यांची बर्याच काळापासून क्रेझ असते.
1960 चे दशकात रस्त्यावर जी एक दिसायला क्लासिक आणि वेगवान वेगाने गाडी दिसायची. ती गाडी रस्त्यावर दिसली कि, बघणाऱ्यांची नजर त्यावरून हटायचीच नाही. त्या गाडीच्या इंजिनचा दणदणीत आवाजामुळे प्रत्येकाला तिची एन्ट्री होतेय हे समजून जायचे.
तुफान क्रेझ असलेली ही कार काही साधारण कार नव्हती तर ती क्लासिक इम्पाला कार होती. ती कार चालवणाऱ्यांना ‘क्या कूल हैं हम’ अशी फिलिंग येत असे. त्यांना वाटे की, रस्त्यांवर फक्त आता आपलेच राज्य चालणार!
एकेकाळी रस्त्यावर राज करणारी ही ‘इम्पाला’ आजच्या काळात विसरली गेली आहे. तर मग भूतकाळाची पाने फिरवूया आणि पुन्हा एकदा जाणून घेऊया इम्पाला सर्वांच्या मनात अगदी ‘ड्रीम कार’ असणाऱ्या ‘इम्पाला’ च्या मनोरंजक प्रवासाबद्दल..
फोर्डला टक्कर देण्यासाठी इम्पाला चा जन्म झाला होता …
1958 सालामध्ये कार कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा चालू होती. आणि या सामन्यात फोर्ड कंपनीने बाजी मारली, त्यांची कार लोकांना खूप आवडली.
दुसरीकडे, शेवरले ही कंपनी फोर्डच्या मागे पडत होती. कंपनीला असे काहीतरी करायचे होते की, ते फोर्डलाही मागे टाकू शकेल. म्हणून त्यांनी पूर्णपणे नवीन प्रकारच्या कार तयार करण्याचा निर्णय घेतला. या एका निर्णयानंतर शेवरले च्या सर्व ऑटोमोबाईल अभियंत्यांनी नवीन प्रकारची कार बनविण्याचे काम सुरू केले. एवढेच नाही तर त्याने थोड्याच काळात ती कारही बनविली.
शेवरोलेने लॉन्च केलेल्या त्या कार ला जेंव्हा लोकांनी पाहिले, तेव्हा सर्व प्रथम त्या कार चे डिझाइन पाहून आश्चर्यचकित झाले!
ही दोन-दरवाजे कन्व्हर्टेबल कार बाजारातील इतर टॉप कारपेक्षा खूप वेगळी होती. यापूर्वी कार चे इतके क्लासिक आणि स्टाइलिश डिझाईन कोणीही पाहिले नव्हते. डिझाइनच्या दृष्टीने तर ते पास झाले पण आता त्याच्या ट्रायल्स ची वेळ आली. ही एक दमदार कार होती जी पेट्रोल इंजिनसह हॉर्सपॉवर 136 होती. हिचा लुक स्टायलिश असावा म्हणूनच नाही तर वेगवान ड्रायव्हिंग साठी देखील तिचे तसेच डिझाइन केले गेले होते. भारी डिझाइन असूनही, ते 150 किमी / प्रति गंठा वेग ठेवण्यासाठी ती सक्षम होती.
इतकेच नाही तर ते केवळ 14 सेकंदात 0-60 मैल वेगाने धावणारी ही कार पाहून सर्वांनाच धक्का बसला. प्रत्येकाला आता कळले होते कि, कंपनीने ‘कमाल’ कार बनविली आहे. तथापि, या कारचे नाव काय द्यावे हे ठरलेच नव्हते.
त्याची रचना आणि वेग लक्षात घेऊन त्याला आफ्रिकेतील हरिणांची एक प्रजातीचे नाव देण्यात आले, ज्याला इम्पाला म्हणतात! असे म्हटले जाते की, हे हरीणदेखील इम्पाला कारसारखे सुंदर दिसते आणि अतिशय वेगाने धावते, म्हणूनच या कारसाठी त्याचे नाव ठरविण्यात आले.
यानंतर, शेवरलेने 1958 मध्ये त्यांची इम्पाला कार लॉन्च केली. इतकेच नाही तर सुरुवातीला याची किंमत 2500 डॉलर ठेवली गेली. यानंतर कारमुळे संपूर्ण जगच बदलले.
भारतामध्ये बोलायचं झालं तर, इथेही इम्पालाने बर्याच लोकांना वेड लावले होते, तेही राजेश खन्ना यांच्यामुळे! खासकरुन सुपरस्टार राजेश खन्ना यांना इम्पाला कार खूपच आवडली.
असे म्हणले जाते की, राजेश खन्ना यांना गाड्यांची खूप आवड होती आणि त्यांच्याकडे बऱ्याच महागड्या गाड्या देखील होत्या. त्या सर्व गाड्यापैकी त्याची खरी आवड शेवरले इम्पाला होती.
1960 च्या दशकात जेव्हा राजेश खन्ना चित्रपट मिळावेत म्हणून स्ट्रगल करीत असत, तेव्हासुद्धा ते स्वत: च्या इम्पालामध्ये फिरत असत. इतकेच नव्हे, तर जेव्हा राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया अफेअर होते, तेव्हा डिंपलने राजेश खन्नाला अजून एक इम्पाला भेट दिली होती.
1971 मध्ये त्यांच्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटामध्ये रेड इंम्पाला दाखविण्यात आली आणि या सिनेमाला ला प्रचंड यश मिळाले. मग काय, कंपनीला भारतात प्रसिद्धीसाठी जास्त प्रयत्न करावेच लागले नाहीत, कोणत्याही जाहिरातीशिवाय ही गाडी भारतातल्या रस्त्यावर मोठ्या संख्येने धावू लागली.
खूप कमी वेळात ही कार ‘स्टेट्स सिम्बॉल’ बनली. प्रत्येकालाच ती कार विकत घ्यायची होती. इम्पाला रस्त्यावरून जाताना लोकं कार कडे नुसते पाहतच बसायचे.
1958 मध्ये बनलेल्या इम्पालाला फक्त दोन दरवाजे होते. 1965 पर्यंत कार चे डिझाइन आहे तसेच राहू दिले आणि 1965 मध्ये समोर आलेल्या त्या डिझाइनने त्या कार चे भाग्यच बदलले. कारण इम्पालाचे दोन दरवाज्याचे, चार करण्यात आले आणि त्याच्या डिझाइनमध्येही बरेच बदल करण्यात आला. त्याचे इंजिन बदलून त्यात एक नवीन V8 इंजिन लावण्यात आले, त्यामुळे त्या कारचा परफॉर्मन्स आणखी वाढला.
” यानंतर, नवीन मॉडेल इम्पाला कारची जगभरात मागणी होऊ लागली. एवढेच नाही तर असे म्हटले जाते की, शेवरलेला इतकी मागणी येऊ लागली कि, त्या मॉडेल चे उत्पादन करणे कठीण झाले होते.
आकडेवारीनुसार, 1965 च्या मॉडेलच्या आगमनानंतर, शेवरले ने दरवर्षी सुमारे 1 मिलियन इम्पाला बनविणे सुरू केले. एवढेच नाही तर या सर्व गाड्या कधी विकल्या गेल्या हे कळलेच नाही! माहितीनुसार, 1965 नंतर शेवरलेने सुमारे 7,46,800 V8 इंम्पाला विकल्या होत्या.”
इम्पालाची मागणी जगातील प्रत्येक देशांमधून येऊ लागली. शेवरलेला कार बाहेर निर्यात करण्यासाठी त्याचे उत्पादन युनिट वाढवावे लागले. 65 नंतर शेवरलेने थेट 1971 मध्ये इम्पालाचे एक नवीन मॉडेल आणले. यावेळीही त्याने या वेगाकडे अधिक लक्ष दिले. नवीन मॉडेलसह इम्पाला ची 365 हॉर्सपॉवर करण्यात आली.
1971 च्या मॉडेलमध्ये कारचे इंजिन देखील अधिक किफायतशीर बनवले गेले होते. 1973 मध्ये जेंव्हा ‘ऑइल क्राईसेस’ आला तेंव्हा कंपनीला आणखीनच फायदा झाला. तेंव्हा जगभर इंधनाची कमतरता होती. अशा परिस्थितीत इम्पालाचे अधिक किफायतशीर इंजिन उपयुक्त ठरले. तथापि, हे इंजिन बनवल्यामुळे इम्पालाला स्वत: च्या कारची परफॉर्मन्स थोडी कमी करावी लागली.
असे मानले जाते की, नंतर इम्पाला बंद पडण्याचे कारणही हेच ठरले. काळानुसार, नवीन गाड्या बाजारात येत होत्या, त्या कामगिरीच्या दृष्टीने इम्पालापेक्षाही चांगल्या असल्याचे सिद्ध होत होते.
गाजलेल्या नावामुळे, येत्या काही वर्षांत इम्पालाने बर्याच कार विकल्या परंतु हळूहळू त्याची विक्री कमीच होऊ लागली. लोकांनी इम्पालाऐवजी इतर वाहने निवडण्यास सुरवात केली. कालांतराने शेवरले लाही इम्पाला विकताना समस्या आली. 1985 पर्यंत, त्याचा सेल इतका कमी झाला होता की कंपनीने त्याचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्याचे उत्पादन थांबविण्यात आले.
काळाच्या ओघात आधुनिक न झाल्यामुळे इम्पालाचे उभे राहिलेले साम्राज्य अगदी काहीच कमी काळात कोसळत चालले होते.
1985 मध्ये, इम्पालाने त्याचे उत्पादन थांबविले, परंतु शेवरलेला आपले नाव इतक्या सहज खाली येऊ द्यायचे नव्हते. त्याचे उत्पादन निश्चितपणे थांबवले गेले होते, परंतु इम्पाला अद्याप जिवंत होती. कंपनीने आधुनिकतेला अंमलात आणत पुन्हा इम्पाला तयार करण्यास सुरवात केली, बराच वेळ लावून शेवटी नवीन इम्पाला 1994 मध्ये हे लाँच केली.
यावेळेसचा सेल पूर्वीसारखा तेजीत नव्हता, परंतु वाईट ही नव्हता. बर्याच वर्षानंतर परत आल्यानंतरही लोक इम्पाला विसरले नव्हते. आणि जेंव्हा त्याचे नवीन मॉडेल आले लोकांनी लगेच इम्पालाला आपलेसे केले. यानंतर, इम्पालाने अपडेटेड मॉडेल वेळोवेळी काढण्यास सुरुवात केली. कंपनीची अज्जीबात इच्छा नव्हती कि, त्यांची ही क्लासिक कार पुन्हा बंद व्हावी.
अमेरिकेसारख्या देशात इम्पाला अजूनही लोकांना आवडत आहे. लोक त्याचे नवनवीन मॉडेल मनापासून स्वीकारत आहेत. तथापि, जेव्हा भारतातले लोकं अजूनही जुन्या क्लासिक इम्पालाला प्राधान्य देतात. इतक्या वर्षानंतरही इम्पालाने आपले नाव राखले.
मध्ये काही अडचणी आल्या, परंतु कंपनीने त्याला तोंड देत पुन्हा उभारी घेतली आणि ह्याचमुळे आजही इम्पाला अस्तित्वात आहे!
हे ही वाच भिडू
- एकेकाळी इंपालामधून फिरणाऱ्या तिचा देह पाच सहा जणांनी हातगाडीवरून ढकलत नेला.
- आजही एखादी अडगळीतली ॲंबेसिडर पाहिली की चेअरमन सायेब आठवतात
- पहिली मेड इन इंडिया लिमोझीन सरकारी धोरणांमुळे रस्त्यावर उतरू शकली नाही.
- ‘पद्मिनी’च्या मोहापायी लालबहादूर शास्त्रींनी देखील कर्ज काढलं होतं.