बॉयकॉट चायना’चा नारा आजही हिट असला, तरी चीनकडून होणारी आयात ३१ टक्क्यांनी वाढलीये
आठवतंय का मागच्या वर्षी दिवाळीत सर्वसामान्य ते नेते, अभिनेते सगळे जण बायकॉट चायनाचा नारा देत होते. चायनीज वस्तूंची होळी करत होते. सोशल मीडियावर ट्रेंड सुद्धा जोरात चालवला गेला होता. मात्र यंदा दिवाळीच्या धामधुमीत बायकॉट चायना विसरल्याचे जाणवते.
जरी गेल्या वर्षी बायकॉट चायनाचा नारा दिला असला तरीही चीनकडून आयात ४६.२९ टक्क्यांनी वाढल्याचे पाहायला मिळाला होता. चालू वर्षातील पहिल्या ९ महिन्यात चीन मधून करण्यात येणाऱ्या आयातीत ३१ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती चायना जनरल ऍडमिनीट्रेशन कस्टम कडून ही माहिती देण्यात आली आहे.
एकीकडे सरकारच्या वतीने आत्मनिर्भर भारतचा नारा देत आहे. त्यासाठी प्रोत्साहन सुद्धा दिला जात आहे. तरीही चीन मधून आयात का वाढत आहेत हे समजून घेऊ या
हे सगळं समजून घेण्यापूर्वी भारतात चीनकडून कुठल्या वस्तू आयात करते
चीनकडून भारताचं आयात होते असं नाही. जगभरातील अनेक देश हे चीन वर अवलंबून आहेत. भारतात चीन मधून इलेक्ट्रॉनिक वस्तू, मशीनरी बरोबरच मोठ्या प्रमाणात केमिकल आयात होत. हे केमिकल भारतीय फार्मा कंपनीसाठी फार महत्वाचं असतं. याच बरोबर वाहनांना लागणारे सुट्टे भागासाठी भारत चीन वर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
महत्वाचं म्हणजे औषध बनवण्यासाठी लागणारे लागणारे घटक हे चीन मधून मागवले जातात. जर हे घटक भारताला मिळाले नाही तर इथल्या फार्मा कंपन्या ठप्प पडतील. भारताच्या वाणिज्य विभागाने दिलेल्या माहिती नुसार २०२१ पासून या वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याच बरोबर मागच्या वर्षांपासून लॅपटॉप, कम्प्युटर, ऑक्सिजन मशीन बरोबरच ऍसिटिक ऍसिडच्या आयात मध्ये प्रचंड वाढ झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या पूर्वी भारत चीन सीमेवर तणाव वाढला होता. त्यामुळे देशभरात बायकॉट चायनाचा नारा देण्यात येत होता. त्यानंतर कोरोना आला आणि काही दिवस सगळंच ठप्प पडले होते. तसेच दोन्ही देशातील व्यापार बंद झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी आयाती मोठ्या प्रमाणात वाढली.
चायना जनरल ऍडमिनीट्रेशन कस्टम ने जानेवारी २०२२ मध्ये अहवाल दिला होता. त्यानुसार २०२१ मध्ये भारताचा चीन सोबतचा व्यापार १२५.६ अरब डॉलर वर पोहचला होता. याच अर्थ असा होतो की, जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता तेव्हा आयात मोठ्या प्रमाणात सुरु होता.
मागच्या वर्षी पहिल्यांचा १०० अरब डॉलर पुढे गेला होता
दोन्ही देशात तणावच वाढला नाही तर व्यापार सुद्धा वाढला. याच बरोबर रेकॉर्ड सुद्धा झाला होता. हे पाहिल्याचं घडलं होत. चीनसोबतचा द्विपक्षीय व्यापार १०० अरब डॉलरच्या वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. यामध्ये भारताने ९७.५२ अरब डॉलर्सची आयात केली होती आणि निर्यात २८.१४ बिलियनची झाली होती.
गेल्या वर्षी भारत-चीन द्विपक्षीय व्यापाराने १२५ अब्ज डॉलरची विक्रमी पातळी ओलांडली होती. गेल्या वर्षी भारतातील चिनी आयात ४६.२ टक्क्यांनी वाढली होती. या कालावधीत भारताची चीनला होणारी निर्यातही ३४.२ टक्के झाली होती. त्यानंतरही २०२१ साली भारताची चीनसोबतची व्यापार तूट ६९.३८ अरब डॉलर पर्यंत वाढली होती.
तर या वर्षीच सांगायचं झाल्यास पहिल्या ९ महिन्यात दोन्ही देशांचा व्यापार १०३.६३ अरब अमेरिकन डॉलरवर गेला आहे. गेल्या वर्षी पहिल्या नऊ महिन्यात तुलनेत १४.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.गेल्या वर्षी व्यापार तूट ६९.३८ अरब डॉलर होती यंदा यात वाढ झाली असून ७५.६९अब्ज डॉलर पेक्षा जास्त वाढली आहे.
फक्त भारताचा चीन मधून आयात करतो असे नाही. सध्या जगभरातील देश उत्पादनाच्या बाबतीत चीनवर अवलंबून आहेत. मग ते औषधे असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, खेळणी, घरगुती वस्तू. चीन अनेक वस्तूंची निर्यात करतो.
सरकार पासून ते सर्वसामान्यां नागरिकांना चीनचे बद्दल राग आहे. तर दुसरी बाजू म्हणजे पण तेवढीच महत्वाची आहे. दररोजच्या जीवनात लागणाऱ्या गोष्टींसाठी चीन वर अवलंबून असल्याचे पाहायला मिळत. चीन मधील वस्तुंना पर्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत होत असले तरीही मात्र तसे होताना दिसत नाही.
देशभरातील सगळ्या मोठ्या बाजारपेठा चिनी वस्तुंनी भरलेल्या असल्याचे पाहायला मिळत. उद्योगाचा बहुतांश कच्चा माल चीन मधून येते. यामुळे कितीही विरोध झाला तरीही भारताला चीन मधून आयात करावीच लागते. सुई पासून ते ट्रेनच्या चाकापर्यंत सर्व काही चीनमधून येत आहे.