इम्रान हाश्मीचे चित्रपट बघण्यासाठी पाकिस्तानात थिएटर हाऊसफुल्ल व्हायचे.

इम्रान हाश्मी आणि तरुणाई मध्ये असलेली त्याची क्रेझ, सिरीयल किसर पासून ते सलग हिट गाणी अशी त्याची ओळख, म्हणजे इम्रान हाश्मीचा कोणताही चित्रपट घ्या त्यातलं गाणं हे हिट असतं. इतर कोणत्याही चित्रपटाच्या अभिनेत्याला इतकी लोकप्रिय गाणी मिळाली नसेल जी इम्रान हाश्मीला मिळाली. फक्त गाणीच नव्हे तर सस्पेन्स अभिनय काय असतो हेहि त्याच्या चित्रपटातून आपल्याला कळतं.

इम्रान हाश्मीच्या सिनेमाला भारतात ठराविक वर्गानेच उचलून धरलं वगैरे असं कितीही असलं तरी एक आश्चर्य म्हणजे पाकिस्तानात इम्रान हाश्मीच्या सिनेमाला थिएटर मध्ये तुडुंब गर्दी असायची. एका चित्रपटापासून हि सुरवात झाली आणि पाकिस्तानमधेही इम्रान हाश्मी लोकप्रिय होऊन गेला. नक्की काय किस्सा आहे हा बघूया.

सुरवातीला चित्रपटांबाबतीत तो सिरीयस नव्हता. फुटपाथ या त्याने केलेल्या त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या चित्रपटाच्या डबिंगला त्याने नकार दिला होता कारण तेच तेच वाक्य किती वेळा परत म्हणायचे तेव्हा वैतागून दिग्दर्शक विक्रम भट यांनी उरलेली डबिंग केली होती. मात्र जसं जस त्याला चित्रपट क्षेत्र समजू लागलं त्यानुसार त्याने बदल केले. त्याच्या पदार्पणातला फुटपाथ हा चित्रपट चालला नाही मात्र इम्रान हाश्मीला चित्रपट न चालल्याचं दुःखही झालं नाही.

इम्रान हाश्मी काय चीज आहे हे २००४ साली आलेल्या मर्डर चित्रपटाने दाखवून दिलं. मात्र मर्डर रिलीज झाला त्यात खच्चून भरलेले किसिंग सिन , त्यातही मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी , जोडीला भिगे होंट तेरे सारखी गाणी… हा चित्रपट २००४ सालचा सगळ्यात जास्त हिट असलेला चित्रपट मानला गेला.

मर्डर चित्रपटाने इम्रान हाश्मी चांगलाच गाजला. या चित्रपटाने त्याला सिरीयल किसर असा टॅग लावला. मात्र मर्डर चित्रपटानंतर इम्रानने जे काही चित्रपट केले ते याच टॅगला धरून होते आणि थोड्याफार प्रमाणात चालत होते.

मर्डर नंतर मात्र इम्रानची गाडी सुसाट सुटली आणि त्याने जहर, अक्सर, आशिक बनाया आपने आणि गँगस्टर अशा चित्रपटांमध्ये काम केलं. हे चित्रपट बॉक्स ऑफिस वर चालायची मात्र इम्रान हाश्मीचे हि सिरीयल किसरची इमेज दिवसेंदिवस वाढत चालली होती. इम्रानला या नेहमीच्या गोष्टींपेक्षा वेगळं काही तरी करू पाहत होता.

२००७ साली इम्रानचा आवारापन नावाचा चित्रपट आला. हि एक ट्रॅजिक लव्हस्टोरी होती.चित्रपटातील गाण्यांनी मात्र कहर केला, चित्रपटातील गाणी इतकी दर्दी होती कि सिंगल लोकांचं पण ब्रेकअप झालं असावं. चित्रपट ऍव्हरेज होता मात्र यातील इम्रानच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि हा चित्रपट इम्रानच्या आयुष्यातील सर्वोत्तम चित्रपट असल्याचं बोललं जाऊ लागलं.

जन्नत हा चित्रपट २००८साली आला आणि या चित्रपटाने इम्रान हाश्मीला सर्वोत्तम अभिनेत्यांच्या रांगेत जाऊन बसवलं. मॅच फिक्सिंग वर आधारित या चित्रपटात एका बुकीचा रोल इम्रानने केला होता. या चित्रपटात असलेला प्रपोजल सिन हा आजवरचा सगळ्यात बेस्ट सीन असल्याचं मानलं जात. भारतात या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला, या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली.

ज्यावेळी जन्नत हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज झाला त्यावेळी पाकिस्तानमध्ये थेटर तुडुंब भरले होते. मर्डर चित्रपटापासून इम्रान हाश्मीचे क्रेझ थेट पाकिस्तानात जाऊन पोहचली होती. इम्रानच्या चित्रपटात असणारे किसिंग सिन आणि गुणगुणावी वाटणारी गाणी यामुळे हे चित्रपट पाकिस्तान मध्ये चालले. २०००चं चित्रपट दशक हे इम्रान हाश्मीच्या चित्रपटांशिवाय अपूर्ण आहे.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात त्याने साकारलेली दाऊद इब्राहीमची भूमिका हि त्याच्या अभिनय कारकिर्दीतली आजवरची सगळ्यात वेगळी भूमिका ठरली. त्याच्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं.

पुढे त्याने अनेक उत्तम चित्रपट केले केवळ गाणी आणि किसिंग सीन यांच्याखेरीज त्याचा सशक्त अभिनय सुद्धा महत्वाचा ठरला. शांघाय चित्रपट हा त्याच्या अभिनयातला आणि टर्निंग पॉईंट समजला जातो. एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग इम्रान हाश्मीचा चाहता आहे त्यातही तरूण-तरुणींची संख्या जात आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.