खुद्द इम्रान खानच म्हणतायेत आम्हाला शिस्तच नाही
होय…पाकिस्तानात कायदा सुव्यवस्था नाहीच असं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतायेत.
म्हणजे पाकिस्तानवर जी टीका सर्व जगभरातून होत असते त्याला एक प्रकारची थेट मान्यताच पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे….या मान्यतेचं निमित्त ठरलंय ते म्हणजे, अमेरिकन मुस्लिम विद्वान शेख हमजा युसूफ यांच्या ऑनलाइन मुलाखतीतचं… या मुलाखतीत पंतप्रधान इम्रान खान यांनी हे सांगितले आहे. अमेरिकन मुस्लिम विद्वान शेख हमजा युसूफ हे कॅलिफोर्नियातील जेतुना कॉलेजचेही प्रमुख आहेत.
शेख यांनी घेतलेल्या या मुलाखतीच्या निमित्ताने इम्रान खान यांनी मान्य केलेय कि, काही लोकांकडून संसाधने हस्तगत करणे आणि देशात कायद्याचे राज्य नसणे हीच बाब पाकिस्तानला मागास ठरवते.
पाकिस्तानच्या मागासलेपणाची कारणेच त्यांनी या मुलाखतीत सांगितली आहेत.
त्यातलंच एक म्हणजे म्हणजे, पाकिस्तानात हजारो दहशतवादी सक्रिय आहेत. हि गोष्ट इम्रान खान यांनी आधीच मान्य केली आहे.
ठराविक लोकं संपत्तीवर कब्जा करून बसतात त्यामुळे बहुसंख्य जनता आरोग्य, शिक्षण आणि न्यायापासून वंचित आहे आणि हे प्रमाण काळानुरूप बदलण्याऐवजी वाढतच चालले आहे. पाकिस्तानातही गरीबांसाठी वेगळा आणि श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे. त्यात कायदा आणि सुव्यवस्था नसल्यामुळे देशाने ज्या पातळीवर जाऊन प्रगती करायला हवी होती ती प्रगती झालीच नाही. थोडक्यात ज्या देशात कायदा आणि नियम आहेत तोच देश विकास करतो…तसेच काहीसं पाकिस्तानचं आहे. नियमानुसार चालत नाही तोपर्यंत कोणताही समाज प्रगती करू शकत नाही, पाकिस्तानच नाही तर अनेक विकसनशील देशांमध्ये ही समस्या आहे, असं देखील इम्रान खान यांनी म्हणलं आहे….
उच्चभ्रूंचा संसाधनांचा ताबा आणि कायद्याचा अभाव ही पाकिस्तानच्या अविकसिततेची प्रमुख कारणे आहेत.
ते म्हणाले की कायद्याचे राज्य असल्याशिवाय कोणताही समाज आपली क्षमता साध्य करू शकत नाही आणि विकसनशील देशांमधील प्रमुख समस्या म्हणजे कायद्याचे राज्य नसणे आणि गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करणारे कायदे…
गुन्हा करणाऱ्याच्या गुणवत्तेच्या आधारावर कायदा काम करतो. जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही मोठ्या पदावर बसाल आणि गरीब असाल तर आयुष्यभर संघर्ष करत राहाल. पंतप्रधानांची ही मुलाखत रविवारी पाकिस्तान टेलिव्हिजनवर प्रसारित झाली. इम्रान म्हणाले, मदिनाविषयी प्रेषित मुहम्मद यांनी कल्पिल्याप्रमाणे पाकिस्तानला एक कल्याणकारी इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. त्यांच्या सरकारला दोन तत्त्वांचे पालन करून देशाला पुढे न्यायचे आहे. यापैकी एक तत्त्व म्हणजे पाकिस्तानला कल्याणकारी राज्य बनवणे आणि दुसरे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे.
मदिना राज्याच्या पैगंबराच्या संकल्पनेवर आधारित पाकिस्तानला इस्लामिक कल्याणकारी देश बनवायचा आहे, असे ते म्हणाले. ‘आम्हाला हा देश दोन तत्त्वांवर बसवायचा आहे. प्रथम, समाजाच्या खालच्या स्तराची काळजी घेणारे कल्याणकारी आणि मानवी मुल्यांना जपणारे राज्य बनवणे आणि दुसरे म्हणजे कायद्याचे राज्य उभे करणे…त्यालाच अनुसरून आम्हच्या सरकारने गरीबांना मदत करण्यासाठी पाकिस्तान देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा कल्याणकारी कार्यक्रम सुरू केला आहे.’
इम्रान खान यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना, पाकिस्तान सरकार पर्यावरणाच्या सुधारणा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पृथ्वीवरील जीव वाचवायचे असतील तर, पर्यावरणाचा प्रामाणिकपणाने स्वीकार करायलाच हवा. नाहीच घेतलं तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भविष्यात भोगावाच लागणार आहे, आत्ताच्या पिढीने केलेला पर्यावरणाचा ऱ्हास हा येत्या पिढीला नुकसानदायक ठरणारा आहे.
हे ही वाच भिडू:
- ऑक्सफर्डमधल्या निवडणुकीत इम्रान खाननं अध्यक्षपदासाठी बेनझीर भुट्टोंचा प्रचार केला होता
- तीन बेगम और एक प्लेबॉय उर्फ इम्रान खान
- पाकिस्तान पुढे नवीन प्रॉब्लेम झालाय. देशातलं गव्हाचं पीठच संपलंय..