इब्तिदा हायवेसे : इम्तियाज अली…

हायवे सिनेमाचं स्वप्न घेवून तो महेश भट्ट यांच्याकडे गेला. तिथून नकार पचवत त्यानं “सोचा न था” नावाचा सिनेमा केला. पुढे “जब वी मेट” पासून त्याची गाडी सुसाट धावू लागली पण या सर्वात हायवे सिनेमा राहिलाच. शेवटी हायवेची ऑफर आंतराष्ट्रीय मीमचा विषय ठरलेल्या चाईल्ड रिप्रेझेंनटेटिव्ह आलिया भट्ट देण्यात आली. पुढे काय झाल…

इम्तियाज अली त्याच्या सिनेमातून प्रत्येकाला त्याच्या आत डोकवायला भाग पाडतो. कोणी म्हणतो, हा दिग्दर्शक माझा ‘स्पिरिट एनिमल’ आहे तर कोणी म्हणतो, त्याचा सिनेमा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पडत असलेल्या प्रश्नांना एक सुफीझमच्या ट्रान्स मध्ये घेवून जातो. त्याच्या फिल्ममध्ये अस काहीतरी असतच ज्यात तुम्हाला आयुष्याची फिलॉसॉफी सापडते. “जब वी मेट” पासून ओळख निर्माण केलेला हा दिग्दर्शक. नव्या फळीच्या लेखकांना, अभिनेत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच पसंत पडत आला आहे. त्याला सिनेइंडस्ट्रीत येऊन आज १३ वर्ष पूर्ण झाली. अभय देओल आणि आयशा टाकियाला घेऊन केलेला “सोचा न था” या सिनेमाची ही तेरा वर्ष. अशा वेळी आठवतो तो इम्तियाजने तमाशा फिल्मच्या वेळी सांगितलेला हा किस्सा…

इम्तियाजने ‘कन्फ्युज असणारा धांदरट मुलगा, काहीच जमलं नाही तर ‘भाग जानेवाले लडकां” अशा अजरामर पात्रांना जन्म तर दिलाच पण त्याच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला एक आर्टिस्ट म्हणून देखील जन्म दिला. सुफीझमच्या गिरकीत स्वतःला स्वतःपासून मुक्त करू पाहणाऱ्या या अवलियाला मुळात पहिला सिनेमा करायचा होता तो हायवे.

हायवे सिनेमाला एक निर्माता मिळावा या उद्देशाने तो भट्ट साब यांच्याकडे गेला. महेश भट्टने गोष्ट ऐकली आणि त्याला थेट विचारलं, तुझ्यात अस काय आहे की, मी तुझ्या या गोष्टीवर पैसे लावू ?

म्तियाजने उलट प्रश्न केला, का लावाल ?

तेव्हा भट्ट साब म्हणाले, तुझ्या डोळ्यात जसा सिनेमा जीवंत दिसतो तसाच काही वर्षांपूर्वी माझ्या डोळ्यात देखील दिसायचां. तू हायवे सिनेमाचा नाद सोड आणि माझ्या त्या स्टोरीवर काम कर… 

इम्तियाजने भट्ट साबच्या त्या स्टोरीवर काम सुरू केलं पण त्याला ते जमलं नाही. सहा महिन्यानंतर इम्तियाज म्हणाला, मला काही सुचत नाही.

त्यावर भट्ट साब म्हणाले, तू वेडा आहेस. सोडून दे तो सिनेमा… 

मग इम्तियाजने धर्मेंद्रच्या प्रोडक्शन हाऊसमधून सोचा न था केला. त्याच मुख्य कारण होतं ते म्हणजे धर्मेंद्रला त्याचा भाचा अभय देओलला लॉन्च करण्यासाठी  एक दमदार लव्ह स्टोरी हवी होती. सोचा न था २००५ मध्ये आला पण तितकासा चालला नाही. त्यानंतर इम्तियाजला रॉकस्टार बनवायचा होता. रॉकस्टार सिनेमा त्यानं दिपिकाला ऑफर केला. यावेळी देखील भट्टी जमली नाही पण दिपिकाला सिनेमा ऑफर करणारा हा पहिला दिग्दर्शक होता. रॉकस्टारची पण भट्टी जमेना म्हणल्यावर देओल कुटुंबाबरोबर असणार चांगलं रिलेशन मेन्टेन करण्यासाठी त्यानं जब वी मेट करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बॉबी देओल आणि प्रीती झिंटा या जोडीला साईन करण्याची प्रोसेस चालू केली पण प्रितीने या सिनेमाला नकार दिला. नंतर त्याने हाच सिनेमा करीना आणि शाहिदला घेवून केला. त्यानंतर इम्तियाज नावाचं काय झालं तुम्ही जाणताच.

TOI

पण या सगळ्यात हायवेच भूत इम्तियाजच्या डोक्यातून जात नव्हतं. जब वी मेटनंतर इम्तियाज हे नाव सगळ्यांना माहीत झालं होतं पण हायवेसारख्या विषयाला हात घालायला कोणाची हिंमत होत नव्हती. पुन्हा एकदा हायवे पेटाऱ्यात बंद करून त्याने अभय देओलसाठी आहिस्ता आहिस्ता लिहला. सैफ-दीपिकाला घेऊन लव आज कल केला.

रॉकस्टारनंतर तो आत्ता सुसाट सुटला होता पण हायवेची रुखरुख त्याच्या डोक्यातून जात नव्हती. याच काळात अलिया भट्ट नावाची एक चाईल्ड रिप्रेझेंनटेटिव्ह सिनेमात आलेली. स्टूडंट ऑफ द इयर सारखा सिनेमा करुन तिने एक इमेज फिट केलेली. याच दरम्यान कॉफी विथ करणमध्ये तिने बालिश उत्तर देवून मिडायापुढे एक ट्रेण्ड सेट केला होता. अशाच काळात इम्तियाजनं डाव खेळला. तो डाव होता लंगड्या घोड्यावर पैसै लावण्याचा. त्यानं हा सिनेमा थेट आलियाला ऑफर केला. त्याच आलियाला जी भट्ट साबची मुलगी होती. ज्या भट्ट साहेबांनी इम्तिआजचा हा सिनेमा करायला नकार दिला होता. आलियानं तो सिनेमा केला. आत्ता आलियाचं काय झालं हे वेगळं सांगायची गरज आहे का ?