गुजरात, उत्तरप्रदेशात मेल्यानंतर प्रेतांना जळण्यासाठी पण वाट बघावी लागतं आहे …

देशात कोरोनानं गतवर्षीपेक्षा प्रचंड मोठं रुप धारणं केलं आहे. रुग्णवाढीच्या बाबतीत रोज नवी-नवीन रेकॉर्ड होतं आहेत. त्यामुळे देशभरात कुठे बेडचा तुटवडा, कुठे ऑक्सिजनची कमतरता, तर कुठे रेमडीसिवीरसाठीच्या रांगा आणि कुठे ऍम्ब्युलन्स देखील न मिळणे अशी अवस्था. एकूणच सामान्य माणसाला घाबरवून सोडणारी परिस्थिती आहे.

यात देखील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जर वेगवेगळ्या राज्यातील परिस्थिती बघायची म्हंटलं तर सगळ्यात भयानक अवस्था आहे ती गुजरात आणि उत्तरप्रदेशची.

कारण इथं कोरोना झाल्यानंतर ऑक्सिजन आणि बेड अशा गोष्टींसाठी तर वाट बघावी लागतच आहे पण कोरोनामुळे मृत्यु झाल्यानंतर रुग्णांना जळण्यासाठी देखील वाट बघावी लागतं आहे. विषेश म्हणजे हे सगळं लपवण्यासाठी दोन्हीकडच्या सरकारची आणि प्रशासनाची आटोकाट धडपड सुरु असल्याचं दिसूनं येत आहे.

सगळ्यात आधी गुजरातमधील परिस्थिती काय आहे ते बघू.

गुजरातमध्ये मागच्या २४ तासात कोरोनाचे ८ हजार १५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३०२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण जवळपास ४४ हजार २९८ आहेत. तर कालच्या एका दिवसात ८१ मृत्यूची नोंद झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हि आकडेवारी सातत्यानं वाढतं आहे. काल-परवाच एका ऍम्ब्युलन्समध्ये रुग्णाला बेडसाठी वाट बघावी लागल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

गुजरातमधील या बिकट परिस्थितीवर न्यायालयानं देखील ताशेरे ओढले आहेत.

गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती भार्गव करिया यांच्या खंडपीठानं सरकारवरच्या कारभारावर टीका करत न्यायालय आणि केंद्र सरकारनं दिलेल्या सूचनांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचं म्हंटलं आहे. सोबतच जेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली नसल्याचं मत व्यक्त करत सरकारच्या बेडची उपलब्धता, रुग्णांची तपासणी, ऑक्सिजन, रेमडीसीवर या सगळ्या दाव्यांवर शंका व्यक्त केली आहे.

सोबतच न्यायालयानं येणाऱ्या दिवसात आणखी परिस्थिती बिघडणार असल्याचं म्हंटलं आहे. न्यायालयानं फेब्रुवारीमध्येच विजय रूपानी सरकारला कोरोनाच्या उपाययोजनांसंबंधी काही सूचना दिल्या होत्या.

सरकारनं या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आता समोर यायला सुरुवात झाली आहे.

लखनऊचे निवृत्त न्यायाधीश रमेश चंद्रा यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सध्या चांगलीच व्हायरल होतं आहे. कोरोना झाल्यामुळे मागच्या ३ दिवसांपासून दोघं पती-पत्नी रुग्णालय तसेच सरकारला मदत मागत होते, मात्र त्यांना घ्यायला ना ॲम्बुलन्स आली ना त्यांना रुग्णालयात बेड मिळाला. तिसऱ्या दिवशी पत्नीचा घरातच मृत्यू झाला. मात्र या काळात हा मृतदेह उचलायला देखील कोण आलेलं नाही.

निवृत्त न्यायाधीश रमेश चंद्रा स्वत: कोरोना पॅाझिटिव्ह आहेत.

WhatsApp Image 2021 04 16 at 1.20.57 PM

दुसऱ्या बाजूला राज्यात काल प्रशासनानं जरी ८१ मृत्यु झाल्याची नोंद केली असली तरी गुजरातमधील मृत्यूची परिस्थिती याहून भयानक आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी केलेल्या पडताळणीनंतर गुजरात प्रशासन मृत्यूची आकडेवारी लपवत असल्याचं समोर आलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार,

वडोदरा महानगरपालिकेनं आपल्या रोजच्या अहवालात शहरामध्ये रोज जास्तीत जास्त २ ते ३ मृत्यू होतं असल्याचं सांगितलं आहे. तर २० पेक्षा कमी सुरतमध्ये, आणि १५ पेक्षा कमी राजकोटमध्ये.

पण टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या पडताळणीनंतर गुजरातमधील सर्वात मोठे एसएसजी हॉस्पिटल वडोदरा इथं एकाच ठिकाणी मागच्या ७ दिवसांमध्ये १४२ मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर वडोदऱ्याच्या २ हॉस्पिटल्समध्ये मागच्या आठवड्यामध्ये ३०० मृत्यु झाले असल्याचं सांगितलं आहे.

राजकोटमध्ये हाच आकडा ८ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान १८४ होता. तर प्रशासनानं इथं या काळात ३२ मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

तर आजतकचे अहमदाबाद प्रतिनिधी गोपी घांघर यांनी अहमदाबादच्या कोरोना हॉस्पिटलमध्ये जवळपास ६ तास थांबून परिस्थितीचा आढावा घेतला होता. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत इथं प्रत्येक तासाला कमीत कमी १० जणांची प्रेत बाहेर आणली गेली. हि प्रक्रिया २४ तास चालू आहे. पण त्याच दिवशी अहमदाबाद महापालिकेनं मृतांचा आकडा २४ सांगितला होता.

विद्युतदाहिन्या देखील वितळलेल्या…

सुरतमधील अश्विनीकुमार आणि रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा ओघ सर्वात जास्त आहे. इथल्या जवळपास १६ विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज १०० पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील या विद्युतदाहिन्यांवर इतका ताण आला आहे की त्याच्या उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुरांडी अक्षरशः वितळली आहेत.

रामनाथ गेल्हा स्मशानभूमीतील एका अधिकाऱ्यानं इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला स्मशानभूमीत दिवसाला ८० मृतदेह येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील सर्व विद्युतदाहिन्या थोडाथोडा वेळाच्या फरकानं वापरल्या जात आहेत. पण इथल्या मृतदेहांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्या आहेत.

उत्तरप्रदेश मधील परिस्थिती

उत्तरप्रदेशमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतं आहेत. मागच्या २४ तासात इथं २० हजार ४३९ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याच्यातील ५ हजार १८३ रुग्ण केवळ लखनऊचे होते. तर इथं मृतांची आजवरची संख्या ९ हजारांच्या घरात पोहचली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ७ जिल्ह्यांमधील कोरोना वगळता इतर ओपीडी सेवा बंद केली आहे.

तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडा देखील मोठा आहे. लखनऊच्या स्मशानभूमीत जास्त मृतदेह आल्यानं इथं जाळण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. बराच वेळ मृतदेह वेटिंग ठेवला होता. अखेरीस एका प्लास्टिकच्या शेडखाली मृतदेहांचे अंत्यसंस्कार उरकण्यात आले.

पण हा प्लास्टिकचा शेड अंत्यसंस्काराचा नव्हता तर समशानभूमीत येणाऱ्या लोकांसाठी होता. पण जसं या प्लास्टिकच्या शेड खाली मुखाग्नी दिला तस इथल्या प्लास्टिकला आग लागली, आणि बघता बघता पूर्ण शेड जाळून खाक झाला.

lucknow, corona, bhaisakund

यानंतर याच स्मशानभूमीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला, डझनभर प्रेत जळत असल्याचं यात दिसून आलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी स्थानिक प्रशासनानं स्मशानभूमीला बाहेर पत्रे ठोकले गेले. त्याच कारण आतमधील व्हिडीओ पुन्हा बाहेर यायला नको. यानंतर सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा झाली. 

एकूणच गुजरात आणि उत्तरप्रदेशमध्ये सध्या मरण स्वतः झाल्याचं बघायला मिळत आहे, पण मरणानंतर मृत्यू देखील ओशाळत आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.