फराह खानला ‘मैं हूं ना’ मध्ये मुस्लिम व्हिलन नको होता
बऱ्याच दिवसांपासून देशात हिंदू – मुस्लिम वाद सुरु झालाय. बांग्लादेशात सुरु झालेल्या हिंसेचे पडसाद त्रिपुरात उमटले आणि आता हा वाद हळू- हळू पेट घेत चाललंय. ज्याचा परिणाम म्ह्णून आता चित्रपटांना सुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आता कुठलाही वाद चित्रपटांवर घसरण्याची ही काय पहिली वेळ नाही. देशातल्या कुठल्याही वादग्रस्त घटनेचे परिणाम चित्रपट सृष्टीला भोगावेच लागतात. त्यामुळे सध्याच्या हिंदू- मुस्लिम वादात आता सूर्यवंशी चित्रपट सापडलाय.
खरं तर अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर रोहित शेट्टीचा चित्रपट सूर्यवंशी हा चित्रपट ५ नोव्हेंबरलाच रिलीज झालाय. जो बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालतोय. पण सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. तो चित्रपटाला व्हीलेनमुळे. चित्रपट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीवर आरोप होतोय कि, त्यांनी चित्रपटात मुस्लिम व्हिलन दाखवलाय.
आता चित्रपट रिलीज होऊन इतके दिवस उलटलेत. पण तोपर्यंत त्याच्या व्हीलेनवरून कुठलाच प्रॉब्लेम नव्हता, पण देशभरात सुरु असलेल्या हिंदू-मुस्लिम वादाची ठिणगी आता या चित्रपटावर पडलीये. ज्यामुळे सूर्यवंशीची टीम ट्रोल होतोय.
हा, पण या ट्रोल करणाऱ्यांना दिग्दर्शक रोहित शेट्टीने चोख प्रत्युत्तर दिलंय. त्याने म्हंटल कि, “चित्रपट बनवताना कोणत्याही जाती-धर्माच्या अभिनेत्याला व्हिलन बनवण्याचा विचार केला गेला नव्हता. आणि याआधीच्या आपल्या चित्रपटात हिंदू व्हिलन देखील होते, मग तेव्हा वाद का नाही पेटला.”
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रोहितने म्हंटले कि,
‘जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की, सिंघम’या चित्रपटात जयकांत शिक्रेची भूमिका प्रकाश राज यांनी केली होती, जो हिंदू आहे. सिंघम, सिंघम रिटर्न्स आणि सिम्बामध्ये हिंदू व्हिलन होते. सोनू सूदने सिंबामध्ये ध्रुव रानडेची भूमिका साकारली होती, जो मराठी आहे. या चित्रपटांतील तिन्ही खलनायक हिंदू असताना काही अडचण का आली नाही?
आता चित्रपटांवरून हिंदू-मुस्लिम वाद तसा जुनाच आहे, बऱ्याच चित्रपटांना या वादामुळं दंगलींना समोर जावं लागलं. काही दिवसांपूर्वीच आश्रम वेब सिरीजचा झालेला वाद काही नव्यानं सांगायला नको. त्यामुळे बरेचशे दिग्दर्शक यापासून चार हात लांब राहतात. आपला चित्रपट किंवा सिरीज वादात सापडणार नाही याची खबरदारी घेतात, त्यातल्यात्यात जेव्हा विषय हा नाजूक असतो, तेव्हा तर सगळ्याच गोष्टी विचारात घेतल्यात जातात.
याचाच खुलासा दिग्दर्शक फरान खानने सुद्धा केला होता. २००४ मध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानचा ‘मैं हूं ना’ चित्रपट आला होता. जेव्हा तिने दिग्दर्शनात नुकताच पदार्पण केलं होत. या चित्रपटात एका दहशतवादाची भूमिका सुनील शेट्टीने साकारली होती.
याबबत एका मुलामुखतीत फराह म्हणाली, तिला चित्रपटातील खलनायक मुस्लिम असावा असे वाटत नव्हते. सोबतच तिने असेही म्हंटले कि, तिने मुद्दाम चित्रपटात सुनील शेट्टीचा राईट हॅन्ड असणाऱ्यांचे नाव खान ठेवले होते. ज्याला नंतर कळते की त्याला फसवले गेले आहे आणि तो शेवटी दहशतवादापासून दूर जातो आणि देशभक्त बनतो.
सुनील शेट्टीने या सिनेमात राघवन नावाचा अतिरेकी साकारला होता. हा राघवन लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनवर आधारित होता असंही म्हटलं गेलं. एकेकाळी आर्मी मधला मेजर असलेला सुनील शेट्टी अतिरेकी कसा बनतो वगैरे ची एक बॅक स्टोरी देखील आहे. शाहरुख त्याला कसा हरवतो आणि देशावर आलेलं संकट निभावून नेतो अशी हि या सिनेमाची स्टोरी.
पिक्चर आला सुपरहिट देखील झाला. पण पुढच्या काळात फराहने आपल्या मुलाखतीमध्ये केलेल्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या,पण तिने कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं.
मैं हूं ना हा’ चित्रपटात शाहरुख खान, झायेद खान, सुनील शेट्टी, सुष्मिता सेन आणि अमृता राव यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटात आधी आर्मी ऑफिसर असलेला सुनील शेट्टी अर्थात राघवन नंतर खलनायक बनतो. या चित्रपटात शाहरुख खान अर्थात मेजर रामप्रसादने भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या लष्कराच्या जवानाची भूमिका साकारली होती.
हे हि वाच भिडू
- बाॅलिवूडमध्ये आयटम डान्स करणारी पहिली नृत्यांगना म्हणजे कुकू मोरे
- खरंचं अपना भिडू जग्गू दादा सोनी चॅनेलचा मालक आहे का?
- सिनेमात संगीत देतो म्हणून पोरी नकार द्यायच्या, टेलर आहे म्हणून सांगितलं आणि लग्न ठरलं..