अमेरिकेतल्या एका लॅबमध्ये डेडबॉड्या साठवून परत जिवंत करण्याचं काम सुरुयं

जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते, पण ही टर्म जन्म आणि मृत्यूबाबत लागू होऊ शकत नाही. त्यातही मेल्यानंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी तर नाहीच नाही. पण आसपासचे बरेचसे भोंदू बाबा मेलेल्या व्यक्तीला परत जिवंत करण्याची आश्वासन देतात. आता तुम्ही म्हणाल भिडू काय बोलतोय.. ह्या तर झाल्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी. 

होय ह्या गोष्टी अंधश्रद्धेच्या आहेत, भिडू सुद्धा या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि समर्थन तर त्याहून नाही. पण ह्याच मेलेल्या माणसाला जिवंत करण्याच्या गोष्टी जर वैज्ञानिक करत असतील, तर… तर काय यावर दोन प्रश्न तयार होतील. एक म्हणजे असलं संशोधन करणारी मंडळी खरचं संशोधक आहेत का? आणि दुसरं म्हणजे अश्या गोष्टी खरचं होतील का?

आता संशोधकांचं बोलायचं झालं तर थेट महासत्ता असलेल्या अमेरिकेतील हे संशोधक आहेत. जे अशा टेक्नॉलॉजीवर काम करतायेत ज्याच्या मदतीने मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. गोष्ट जरा न पटणारी आहे, पण गेल्या कित्येक वर्षांपासून यावर काम होतंय. 

आता पुन्हा या विषयावर बोलायचं निमित्त म्हणजे सोशल मीडियावर एका लॅबचे फोटो व्हायरल होतायेत, ज्यात मोठं- मोठ्या टाक्या दिसतायेत, ज्यावर क्रायोनिक्स (Cryonics) असं लिहिलंय. सोबतच भयानक फॉन्ट मध्ये लाल अक्षरात असं लिहिलंय कि, ‘मृतदेहांना जिवंत करण्याचे काम सुरू आहे.’ हे सगळं बघून तुम्ही कदाचित खोटी बातमी म्ह्णून दुर्लक्ष कराल, पण भिडू हे खरयं.

तस पाहायचं झालं तर मेडिकल फिल्ड फार पुढे गेलीये. कोणी कल्पना सुद्धा केली नसेल, अशा टेक्निक डेव्हलप होतायेत. अशीच सध्याची एक चर्चेत टेक्नॉलॉजी म्हणजे क्रायोनिक्स. जिच्या मदतीने मृत शरीरानं पुन्हा जिवंत केलं जाऊ शकत. अमेरिकेत या टेक्नॉलॉजीला क्रायोनिक्स म्हणतात. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या फोटोमधली लॅब अमेरिकेतल्या अ‍ॅरिझोना येथे तयार करण्यात आलीये. जिथे या टेक्नॉलॉजीच्या मदतीने मृत शरीराला पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरु आहे. क्रायोनिक्सच्या टेक्निकसाठी कित्येक मृतदेह या लॅबमध्ये ठेवण्यात आलीत. 

आता या क्रायोनिक्स टेक्निकबद्दल बोलायचं झालं तर, ही  अशी टेक्निक आहेत ज्यात मृतदेह अतिशय थंड तापमानात ठेवला जातो. यामुळे मृत्यूनंतर अनेक वर्षे शरीराला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. हे मृतदेह १९६ डिग्री सेंटीग्रेडमध्ये साठवलं जात. त्याआधी शरीराच्या आत एक रसायन टाकलं जात, जे बॉडी जसं जशी थंड होते तसं शरीरात पसरत आणि शरीर विघटन होण्याची प्रक्रिया थांबवत. या संपूर्ण प्रक्रियेला ‘क्रायोप्रिझर्वेशन’ म्हणतात.

अशा परिस्थितीत फ्युचरमध्ये जेव्हा कधी अशी पुन्हा जिवंत करण्याची टेक्निक येईल, तेव्हा त्या टेक्निकच्या मदतीने त्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल.  म्हणजे लॅबवाले सुद्धा अशा टेक्निकची फक्त आशाचं करतायेत. किंवा एकप्रकारे आपण असंही म्हणू शकतो कि, मृतदेश पुन्हा जिवंत करण्याच्या नावाखाली नुसता उद्योग सुरु आहे.

आता बऱ्याच जणांना यावर विश्वास नाहीये, लोक पुन्हा जिवंत होतील याची कुठलीच गॅरंटी स्वतः लाभला सुद्धा नाहीये. तर मेडिकल क्षेत्रातले बरेच जण अशा प्रकारावर टीका करतायेत.

पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या लॅबमध्ये ठेवण्यात आलेल्या मृतदेहांपैकी कित्येक जण हाय क्लास श्रीमंत लोक  आहे, ज्यांनी आपला मृत्यू होण्याआधीच मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होऊ या आशेने आपले मृतदेह लॅबकडे देऊन टाकलेत. हाईट म्हणजे  त्यासाठी त्यांनी लॅबला मोठी रक्कम सुद्धा दिलीये. 

या टेक्निकबद्दल तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, शंभर वर्षांपूर्वी चंद्रावर जाऊ असा विचार कोणी केला नव्हता, ती गोष्ट म्हणजे अशक्य वाटायची. पण आज ते घडलंय. त्यामुळे अशी सुद्धा अपेक्षा कारण चुकीचं नाही कि, कोणतीतरी टेक्निक येईल जी मृतांना जिवंत करेल.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.