कोरोनाच्या संकटात ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केलेलं कार्य इतिहास कधीच विसरू शकणार नाही..

देशात कोरोना विषाणूमुळे एकच खळबळ उडालीये. साथीच्या या दुसऱ्या लाटेत वाढत्या संख्येबरोबर आरोग्य सुविधांचा तुटवडा भासू लागलाय. ऑक्सिजन अभावी मृतांच्या संख्येत वाढ होतेय. देशातील बहुतेक राज्यांची हीच परिस्थिती आहे. केंद्राकडून दिली जाणारी मदत देखील अपुरी पडू लागलीये.  अश्या बिकट परिस्थितीत दोन मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात पुढे केला असून इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे म्हंटल आहे.

 ओडिशा सरकार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांनी  ऑक्सिजन पुरवण्याचे दिले आश्वासन 

२२ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी  इतर राज्यांना  मदत करण्याविषयी बोलले आहे . या संदर्भात ओडीसा  सीएम कार्यालयाकडून  एक ट्विट देखील जारी करण्यात आले आहे.

या ट्विटमध्ये म्हटलं गेलं की,  कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेत युद्धासारखी परिस्थिती आहे. कोविडशी सुरु असलेल्या लढयात ओडिसा  सर्व राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करतील. त्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे देखील समाविष्ट आहे, जेणेकरून या आपत्कालीन परिस्थितीत इतर राज्यांना मदत करता येईल.

ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सूचनेनंतर २२ एप्रिल रोजीच ओडिसा  पोलिसांनी एडीजी (कायदा व सुव्यवस्था) वाय.के. जेठवा यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अधिकारी नेमला, ज्यामुळे इतर राज्यांच्या गरजांसाठी ऑक्सिजनने भरलेल्या वाहनांच्या सुरळीत हालचालीवर नजर ठेवता येईल. ज्या राज्यात ऑक्सिजनची कमतरता आहे तेथे ऑक्सिजन सहजपणे पोहोचविता येईल, यासाठी राज्यातील पोलिस ग्रीन कॉरिडोरवर काम करत आहे. म्हणजेच  ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांना कोणतेही जाम किंवा अडथळा येणार  नाही.

आपल्या  कोट्यासाठी ऑक्सिजनचा त्वरित पुरवठा केल्याबद्दल महाराष्ट्र आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन पटनाईक यांचे आभार मानले 

 

२२ एप्रिल रोजी संध्याकाळी ओडिशाच्या अंगुलहून २० टन मेडिकल ऑक्सिजनची पहिली खेप विशाखापट्टणमला रवाना झाली. दुसर्‍या दिवशी अर्थात २३  एप्रिल रोजी सकाळी दोन टँकर अंगुलमधून विशाखापट्टणमला रवाना झाले.

अंगुलहून विशाखापट्टणमला जाणारा ऑक्सिजन जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड (JSPL) पुरवत आहे. ग्रुपचे प्रमुख नवीन जिंदाल यांनी ट्वीट करत सांगितले कि,  आमच्या अंगुल प्लांटमध्ये ५०० टन पेक्षा जास्त लिक्विड ऑक्सिजन तयार आहे. याशिवाय गरजू  सरकारांना  आम्ही दररोज १०० टन लिक्विड ऑक्सिजन पुरवू  शकतो. याच साखळीत आम्ही २२  एप्रिल रोजी तेलंगणाला २० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन पाठविला आहे. तर २३ एप्रिल रोजी पुन्हा तेलंगणा आणि मध्य प्रदेश बरोबरच दिल्ली एनसीआरच्या मेदांता, आर्टेमिस आणि बत्रा रुग्णालयांना ऑक्सिजन पाठवू.

आंध्रप्रदेश धावला  महाराष्ट्राच्या मदतीला 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. रेमेडीसिव्हीर, खाटा, लस, ऑक्सिजन तसचं व्हेंटीलेटरसाठी राज्याला केंद्राकडे हात पसरावे लागत आहे.  अश्या परिस्थितीत आंध्रप्रदेश  महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली. महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा केल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी गडकरींच्या  विनंतीचा मान राखला आणि  महाराष्ट्राला ३०० व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली.

गडकरींनी ट्वीट करत  दिली  माहिती 

दरम्यान, कोरोना तडाख्यात सापडलेल्या महाराष्ट्राला दररोज १५५० मे. टन ऑक्सिजनची आवशक्यता असते. तर सध्याला  ३०० – ३५० मे. टन ऑक्सिजन राज्याला बाहेरून मागवावा लागत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे  ११०० व्हेंटीलेटरची मागणी केली आहे. 

हे ही वाचा भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.