यूपीमध्ये मॉडेलच्या उमेदवारीवरून नवीनचं वाद सुरू झालायं

सध्या देशात निवडणुकांची धामधूम आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सगळेचं पक्ष कसून तयारीला लागलेत.

त्यात नुकताच पंजाब आणि उत्तर प्रदेशात सगळ्या पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नाव सुद्धा जाहीर केलीत. त्यामुळे आता त्या राज्यात खऱ्या अर्थाने निवडणूकीला आणि राजकारणाला सुरूवात झालीये असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आता याचं उमेदवारीवरून उत्तर प्रदेशात नव्या वादाला सुरुवात झालीये.

म्हणजे झालं काय, जसं की सगळ्यांनाच माहितेय उत्तर प्रदेशातल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षाची कमान सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली यंदा महिला उमेदवारांना जास्त संधी देण्यात आलीये.

‘लडकी हू लढ सकती हू’ या बॅनरखाली काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक लढवतोय. अर्थात काय तर महिला सक्षमीकरणाचा संदेश काँग्रेस देऊ इच्छितोय. म्हणजे आकडेवारीवरून सांगायचं झालं तर 135 उमेदवारांपैकी 40 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आलीये.

यात साखळीत काँग्रेसने मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातून अभिनेत्री आणि मॉडेल अर्चना गौतम यांना उमेदवारी दिलीये. पण त्यांचं नाव जाहीर होताच एकचं खळबळ उडालीये. सोशल मीडियावर त्यांचे बिकनी फोटो आणि अभद्र भाषेचा वापर केलेले व्हिडिओ व्हायरल झालेत.

आता अर्चना गौतम बद्दल सांगायचं झालं तर अर्चनाचा जन्म १ सप्टेंबर १९९५ रोजी झाला. त्या मूळच्या मेरठच्या आहेत. आयआयएमटीमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर, मॉडेलिंग आणि अभिनयात करीयर त्यांनी मुंबईकडो वाटचाल केली.

2014 मध्ये ती मिस यूपी झाली असून तिने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2015 मध्ये तिने ग्रेट ग्रँड मस्ती या बॉलिवूड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी हसीना पारकर, बारात कंपनी, जंक्शन वाराणसी यांसारख्या चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत. तमिळ चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्याच वेळी, 2018 मध्ये अर्चनाने मिस बिकिनी इंडिया 2018 चा खिताबही जिंकला होता.

त्यामुळे आता जेव्हा अर्चनाने राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली तेव्हा वेगळाचं वाद तयार झालायं.

अखिल भारत हिंदू महासभा आणि संत महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणी यांनीही मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारावर असणाऱ्या अर्चना यामच्यावर जोरदार निशाणा साधत म्हटलं की,

“मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालेल्या पक्षाकडून काहीही अपेक्षा करता येत नाही. जर एखादी व्यक्ती सामाजिक जीवनात प्रवेश करत असेल, तर त्याने आपल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. पण , काँग्रेस ‘ हिंदू ‘ आणि ‘ हिंदुत्व ‘ यात फरक करते . मानसिक दिवाळखोर पक्षाच्या नेत्यांकडून काहीही अपेक्षा करू नये. उद्या ते एखाद्या गुन्हेगाराला उमेदवार म्हणून उभे करू शकतात आणि मते मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.’

एवढचं नाही अखिल भारत हिंदू महासभेचे राज्य प्रवक्ते अभिषेक ग्रेवाल म्हणाले की, असा उमेदवार हस्तिनापूरमधून जिंकला तर घंटाघरावर त्यांची मान कापून लटकवली जाईल.

दरम्यान या प्रकरणानंतर अर्चना गौतम सुद्धा गप्प बसल्या नाही. त्यांनी लगेच मिडीयासमोर आपलं मत मांडलंं. अर्चना गौतमने सांगितले की,

‘मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 होते. पण मी लोकांना विनंती करते की, मीडिया इंडस्ट्रीतील माझा पेशा माझ्या राजकीय कारकिर्दीत विलीन करू नका. हे सर्व माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. आता जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात प्रवेश करत आहे. तूम्ही मला जिंकायला मदत करा.”

आता तसं पाहिलं तर याआधी सुद्धा कित्येक अभिनेते आणि अभिनेत्रींनी राजकारणात प्रवेश केलाय. पण त्यांच्या उमेदवारीवरून असा प्रकार क्वचितच पहायला मिळाला. तरी आता निवडणूकीच्या धामधुमीत हा वाद आणखी किती चिघळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.