आजोबांचं स्वप्न पूर्ण करत दोघा बहीण भावांनी inc 5 ब्रँड उभा केला….

तर आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा शूज ब्रँडची यशोगाथा ज्याला उभारलं एका बहीण भावांच्या जोडीने आपल्या आजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी. Inc 5 शूज कंपनी जो आज घडीला मार्केटमधला सगळ्यात मोठा ब्रँड मानला जातो.

आदिदास,नाईके अशा तगड्या ब्रँडला तगडी फाईट देणारा ब्रँड म्हणून inc 5 शूजला ओळखलं जातं.

Inc 5 शूज कंपनीचे फाउंडर आहेत अलमास नंदा आणि अमीन विरजी. या दोघा भावा बहिणींनी आपल्या आजोबाच्या साध्या शूज कंपनीचा ब्रँड केला आणि आज घडीला तो ब्रँड करोडोंची उलाढाल करतोय. Inc 5 हा अगोदर रिगल शूज कंपनी पासून या ब्रँडची सुरवात होती. रिगल शूजची सुरवात अलमास नंदा आणि अमीर विरजी यांच्या आजोबांनी 1954 साली केली होती जेव्हा त्याकाळी शूज हे एकदम बेसिक आणि व्यापारी दृष्टीने बनवले जायचे. कारण त्याकाळी फॅशनचा ट्रेंड आलेला नव्हता.

आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत अलमास नंदा यांनी भावाच्या साथीने 1998 साली मुंबईतील फेमस शॉपिंग सेंटर हिरा पन्नामध्ये एक छोटंसं दुकान विकत घेतलं आणि आपला व्यवसाय तिथं थाटला. फॅशनेबल फुटविअरबद्दल भरपूर माहिती काढली. फुटविअर फॅशनेबल तर हवंच पण वापरकर्त्याला ते कम्फर्टेबल सुद्धा असावं याबद्दल त्यांनी माहिती काढली. त्यांनी भविष्याचा विचार करत महिलांच्या फुटविअर बाबत रिसर्च करत विविध स्टायलिश फुटविअर लॉन्च केले.

Inc. 5 शूज कंपनीच्या फाउंडर लोकांनी सुरवातीला नवीन व्यवसाय टाकल्यावर येणाऱ्या सगळ्या अडचणींचा सामना केला. यामध्ये प्रमुख होतं एका चांगल्या कम्फर्टेबल ,स्टायलिश आणि ट्रेंडिंग फुटविअर बनवण्यासाठी भारतात चांगल्या मटेरिअलचे कंपोनेंट्स मिळणं अवघड होतं, त्यामुळे तळवे, बकल्स आणि हिल्स त्यांनी इटलीमधून आयात करायला सुरुवात केली. आज घडीला त्यांची कंपनी चीन, तैवान आणि व्हिएतनाम मधून जास्तीतजास्त मटेरियल आयात करते.

Inc. 5 शूज कंपनी 1998 ला सुरू करून 2001 साली दोघा भावा बहिणीने आपल्या आजोबांची रिगल शूज कंपनी विलीन करत inc. 5 प्रायव्हेट लिमिटेड अशी शूज कंपनी उभारली.

आज घडीला inc. 5 कंपनीचा टर्न ओव्हर करोडो रुपयांचा आहे आणि कंपनीने कोलकाता, दिल्ली,बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, लखनऊ आणि पुणे अशा शहरांमध्ये आपला जम बसवत 54 एक्सक्लुजीव स्टोर्स आणि 300 सेल्स काउंटर सुरू केले आहेत.

आज घडीला inc. 5 कंपनीचे शूज श्रीलंकेला निर्यात केले जातात. ऑनलाइन ब्रँडमध्येसुद्धा inc. 5 आघाडीवर आहे. Myntra, फ्लिपकार्ट, ऍमेझॉनवरसुद्धा सगळ्यात जास्त ग्राहक हे inc 5 चेच आहेत. आपल्या आजोबांच्या कंपनीला ब्रँड या दोन भावा बहिणीने बनवलं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.