२०२२ मधल्या ६ घटना ज्या भविष्यात ऐतिहासिक घटना म्हणून सांगितल्या जातील.

२०२२ हे वर्ष आता संपत आलंय. २०२२ मध्ये बरंच काही घडलंय. म्हणजे अगदी जागतिक पातळीवर बऱ्याच घटना घडल्या. आता अनेक घटना तर, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण घडल्या असतीलच. पण, तुमच्या-माझ्या आयुष्यातल्या घटनांना विचारतं तरी कोण?

म्हणून बघुया, २०२२मध्ये जागतिक पातळीवर घडलेल्या ६ मोठ्या घटना:

२०२२ म्हटलं की, सगळ्यात आधी कुणाच्याही डोक्यात पहिला विषय येईल तो म्हणजे रशिया-युक्रेन युद्धाचा…
साधारण २४ फेब्रुवारी रोजी सुरू झालेला हा वाद थोडक्यात आटपेल असं वाटत होतं. पण आता २०२२ संपत आलं तरीही हे युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही. या युद्धावेळी अनेकदा तर, असे क्षण आले की, संपुर्ण जगालाच धडकी भरवली.

जसं की, ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादीमीर पुतीन यांनी अणुहल्ल्याची दिलेली धमकी’, ‘एकतर युक्रेन हार मानेल किंवा मग, संपुर्ण जगाला परिणाम भोगावे लागतील’ हे वक्तव्य. यामुळे पृथ्वीचा अंत होतोय की काय अशी शंका सर्वांच्याच मनात येऊन गेली असणार. याशिवाय, हे युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये… आता भविष्यात हे युद्ध किती रौद्ररूप धारण करतंय ते तर भविष्यातच कळेल, पण हे युद्ध भविष्याच इतिहासाच्या पुस्तकात दिसेल हे मात्र नक्की.

दुसरी घटना म्हणजे रॉजर फेडरर याने घेतलेली रिटायरमेंट.
रॉजर फेडरर म्हणजे कोण तर, क्रिकेटमध्ये जसा सचिन, फूटबॉलमध्ये जसा रोनॅल्डो किंवा मेस्सी तसा टेनिसमध्ये हा रॉजर फेडरर. टेनिसच्या चाहत्यांमध्ये रॉजर हा देवाच्या स्थानी आहे. यंदा १५ सप्टेंबर २०२२ रोजी त्याने रिटायरमेंट अनाऊंस केली.
२००३ साली त्याने पहिल्यांदा ग्रँड स्लॅमचं विजेतेपद मिळवलं. आणि रिटायर होईपर्यंत त्याच्या नावावर २० वेळा ग्रँड स्लॅमचं विजेतेपद आहे.

एलॉन मस्क याने ट्विटर विकत घेतलं.
ज्याला आयुष्यात खूप काही करायची इच्छा आहे असा जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक असलेला एलॉन मस्क याने ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यानंतर त्याने ट्विटरमध्ये अनेक बदल केले. कामगारांची कपात केली आणि आता त्याने ट्विटरच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं का याबाबत लोकांनाच विचारलं.

मेस्सीनं अखेर फिफा वर्ल्ड कप मारलाच.
लियोनेल मेस्सी हा त्याच्या फूटबॉल करीअरमधला अखेरचा फिफा वर्ल्ड कप खेळणार आहे अश्या बातम्या होत्या. त्यात मेस्सीने आजवर एकदाही फिफा वर्ल्ड कप जिंकला नव्हता. त्यामुळं, मेस्सीनं म्हणजेच यंदाचा वर्ल्ड कप जिंकावा अशी फक्त त्याच्याच फॅन्सची नाही तर, जवळपास सगळ्याच फूटबॉल चाहत्यांची इच्छा होती.

फिफाच्या फायनल मॅचमध्ये अर्जेंटिना च्या समोर फ्रांसचं आव्हान होतं. मॅच अगदी चुरशीची झाली… ९० मिनीटं झाली, एक्स्ट्रा टाईम संपलं आणि स्कोअर होता ३-३. आता मेस्सीच्या फॅन्सच्या ह्रदयाची धडधड आपोआप वाढली होती. पेनेल्टी शूटआऊटमध्ये मग, ४-२ असा स्कोअर केला आणि मेस्सीची अर्जेंटिना जिंकली.  एम्बाप्पे एकटा अक्ख्या अर्जेंटिनाला नडला खरा, पण मेस्सीचं वर्ल्ड कपचं स्वप्न पुर्ण झालं आणि २०२२ हे वर्ष फूटबॉलच्या इतिहासाच्या पुस्तकात असरामर झालं.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले.
ऑक्टोबर २०२२ मध्ये ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. आता ही घटना भारतासाठी फार महत्त्वाची आहे. कारण, ऋषी हे भारतीय वंशाचे आहेत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसणारी पहिली भारतीय वंशाची व्यक्ती म्हणून ऋषी सुनक हे लक्षात राहतील.

जॉनी डेप आणि अंबर हेर्ड यांचा डायवोर्स
आता कुण्या अभिनेता-अभिनेत्रीचा डायवेर्स होणं ही काही नवल करण्यासारखी बाब नाहीये. पण यात मुद्दा असाय की, त्यांचा डायवोर्स हा २०१६ मध्येच झाला होता. २०२२ मध्ये अंबर हेर्ड हिने जॉनी डेपविरोधात केस केली. या केसमध्ये जॉनी डेपने तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याचे आरोप होते.
ही केस जॉनी डेपनं जिंकली.

आता केस जिंला तो हॉलीवूडचा अभिनेता. आणि आपल्याकडच्या पोरांनीच ‘ठुकरा के मेरा प्यार’ गाण्यावर त्याच्या रील बनवल्या. आता ही घटना कधी पुस्तकात छापली जाणार नाही पण, सख्त लौंड्यांच्या डोक्यातून ही घटना कधीच जाणार नाही आणि ते या घटनेला कुणालाच विसरूसुद्धा देणार नाहीत येवढं नक्की.

या ६ घटनांपैकी, काही घटना इतिहासाच्या पुस्तकातही छापल्या जातील तर, काही घटना आपल्याकडची पोरं तोंडानं सांगून सांगूनच अजरामर ठेवतील. पण, या सहा पैकी सहा घटना या अजरामर होणार आणि भविष्यात सांगितल्या जाणार हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.