पेट्रोल – डिझेलच्या दर वाढीचा फटका आता कॉमन मॅनच्या प्रवासावर सुद्धा…

गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल -डिझेलच्या किमतीत सतत दरवाढ होतेय. म्हणजे किमती पार शंभराच्या वर पोहोचल्यात. यामागचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमती असल्याचं बोललं जातंय. ज्याचा परिणाम अर्थातच कॉमन मॅनच्या खिश्यावर झालाय. यामुळे गॅस सिलिंडर, खायचं तेल, सिएनजी या आपल्या  दररोजच्या वापरातल्या गोष्टींच्या किमतीसुद्धा महागल्यात.

आता या सगळ्या महागाईला कंटाळून तुम्ही जरा रिलॅक्स व्हायला म्हणून बाहेर जायचा प्लॅन आखत असालं, “तो भाई रुको जरा सबर करो..” कारण तुमचा प्रवास सुद्धा महाग होणार आहे. म्हणजे कसं पेट्रोल डिझेल वाढल्यामुळं हा कॉमन मॅन सरकारी बस आणि एसटीकडे वळाला पण, आता त्याचं एटीच्या भाड्यातही वाढ होणार आहे. 

महाराष्ट्रचं बोलायचं झालं तर डिझेलच्या किमतीने शंभरी गाठलीये, त्यामुळे एसटीला सध्याच्या भाड्यात डिझेलचा खर्च काय परवडेना झालाय. त्यात कोरोना महामारीनंतर सरकारी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या पार निम्म्याच्या खाली गेलीये. ज्यामुळे इंधन आणि देखभालीचा खर्चचं रोजच्या उत्पन्नातून कसाबसा निघतोय.  त्यात कर्मचाऱ्यांचे पगार अजून झाले नाहीत. एसटी प्रशासनाने पगारासाठी पुन्हा राज्य सरकारकडेच आर्थिक मदतीची मागणी केली, पण याचा फारसा परिणाम झाला नाही.  या सगळ्या गोष्टींमुळे एसटी विभागाचं कंबरडं मोडलयं.

त्यामुळे प्रशासनाकडून एसटीच्या तिकिटात १७ ते १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवला गेलाय. जेणेकरून डिझेल दरवाढीमुळे दररोज दोन कोटी रुपयांनी वाढलेला खर्च भरून निघेल. याबाबत सरकारही लवकरच निर्णय घेणार असल्याचं समजतंय.

याबाबत अधिक माहितीसाठी बोल भिडूने एसटी महामंडळ विभागाच्या काही कर्मचाऱ्यांशी  बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. एका कर्मचाऱ्याने उद्याच्या सुट्टीचे कारण देत, प्रश्नाची उत्तर देणं टाळलं आणि सोमवारी या प्रस्तावावर चर्चा करणार असल्याचं म्हंटल. 

आता तसं पाहायचं झालं तर, यावर्षीच्या जुलै महिन्यातचं एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात सहा किलोमीटरनंतर किमान पाच रुपयांची भाडेवाढ करण्यात यावी असं म्हणतात गेलं होत. म्हणजे १०० किलोमीटरच्या प्रवासासाठी जवळपास २० ते २५ रुपये भाडेवाढ होणार असल्याचं म्हंटल जात होत.

त्यावेळीही डिझेलच्या किमती वाढतच होत्या, पण आत्ताच आकडा त्यामानानं कमी होता. त्यामुळे सध्याच्या किमती पाहता भाडेवाढ होणारचं असं स्पष्ट चित्र दिसतंय.  कारण २-३ वर्षांपूर्वीच जेव्हा डिझेलच्या किमती ७१ रुपयांच्या वर गेल्या होत्या, तेव्हा महामंडळाने  भाड्यात जवळपास १८ टक्के वाढ केली होती.

आता सध्याच्या कोरोना परिस्थितीत प्रवाशांच्या आकड्यावर नजर टाकली तर, सध्या दररोजच्या प्रवाश्यांची संख्या २४ ते २५ लाख इतकीचं आहे, ज्यातून ११ कोटींच्या आसपास उत्पन्न मिळतं. पण कोरोनाच्या आधी एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या जर पहिली तर ती ६५  लाखांच्या आसपास होती, ज्यातून २०- २२ कोटी रुपये मिळायचे. म्हणजे २२ कोटी ते आता डायरेक्ट ११ कोटी म्हणजे उत्पन्न पार निम्म्याने कमी झालंय.

सध्याचे ११ कोटी हे फक्त डिझेल आणि  देखभालीवरचं खर्च होतात त्यामुळे बाकी काही उरतचं नाही. परिस्थिती तर इतकी बिघडलीये कि, एसटी महामंडळ राज्य सरकारनचं चालवायला घ्यावं, अशी मागणी होत असल्याचं एका वृत्तसंस्थेने म्हटलंय.

आता या एसटीच्या दरवाढीच्या प्रस्तावाचं काय होतंय, ते पाहणं तर महत्वाचं ठरणाचं आहे. पण यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा प्रवासही खिसा चेक करूनचं करावा लागणार एवढं मात्र नक्की… 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.