त्याकाळात चर्चा होती ,सलमान खानपेक्षा भारी बॉडीबिल्डर आलाय.

सलमान खानचा नवीन ट्रेलर बघितला काय? भाऊ पन्नास वर्षाचा झाला तरी अजून बिल्डर हाय. तर तो काळ होता जेव्हा सल्लू खरोखर तरुण होता. अजून ऐश्वर्या त्याला सोडून जायची होती.  पिक्चर मध्ये शर्ट काढला तर सिक्स पक दाखवायला व्हीएफएक्स करायला लागत नव्हत. भावाचा प्राईम टाईम म्हणाओ.

अशात एक पिक्चर आला, तुम को ना भूल पायेंगे. विसरला नसालचं. यात सल्लू बरोबर आहे दिया मिर्झा आणि सुश्मिता सेन. (अशी चर्चा होती की ऐश्वर्याच्या डेट्स मिळाल्या नाहीत म्हणून तिच्यासारख्या दिसणाऱ्या दिया मिर्झाला घेतलं होत. एका सीन मध्ये सलमान ऐश्वर्याच्या फोटोपुढे आपल्या प्यार का इजहार करताना पण दाखवलं आहे. असो)

यात सल्लुची मेमरी लॉस झालेली असते,  ठाकूर फॅमिलीने तू आमचाच मुलगा हायस असं सांगून गंडवलेलं असत, तो खर तर भारतातला नंबर एकचा शुटींग चॅम्पिअन असतो, फावल्या वेळात धोतरावर शूज घालून तो वर्तमानकाळात दिया मिर्झा बरोबर बिंदिया चमके चुडी खनके आणि भूतकाळात सुस्मिता सेन बरोबर  पब मध्ये दंड दाखवत क्यू चमके तेरी चुडी असली गाणी म्हणत असतो.

Yeh Bekhudi Deewangi Lyrics Tumko Na Bhool Paayenge

तर अशा या सलमानला इंदर नावाचा मित्र असतो पण पैशासाठी आणि सुस्मिता सेन साठी त्यान सलमानला मारलेल असत आणि त्यात त्याची मेमरी गेलेली असते. (स्पॉइलर अलर्ट , सांगितलेलं बर बाबा नाही तर नंतर शिव्या घाल्तायसा)

तुमको ना भूल पायेंगे या सिनेमाचं वैशिष्ट्य काय विचारलं तर तुम्हाला सांगतो की यात सलमान खानन सगळ्यात जास्त बॉडी दाखवली होती. निम्मा पिक्चर तो उघडाच होता म्हणा की. प्रत्येक सीन मध्ये त्याला शर्ट काढायचं कारणच लागत होत. कधी फायटिंग म्हणून कधी गाण्यात डान्स करताना तर कधी अंगावर लागलेल्या गोळ्या दाखवायला.

एवढ सगळ झालं तर शेवटच्या सीन मध्ये बॉडी दाखवण तर त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.

पण कहाणी मै ट्विस्ट. या पिक्चरच्या साईड हिरो कम पार्टटाईम व्हिलन म्हणजेच इंदरची बॉडी त्याच्या पेक्षा भारी होती. त्याकाळात सलमानला भारी असणारा बॉडीबिल्डर म्हणून या अॅक्टरची ओळख झाली.त्याचं खरोखरच नाव पण इंदर कुमार होत. 

या शेवटच्या सीन मध्ये सलमानला इंदर कुमार कुत्र्यासारखा मारतो. त्याचं लाडकं ब्रेसलेट पळवतो,(होय या सिनेमामध्ये सलमानच ब्रेसलेट आणि त्याच्या गळ्यातल पुरोगामी हिंदू मुसलमान एकतेच लॉकेट यांचे सुद्धा महत्वाचे रोल होते.) त्याच्या छातीत खिळा घुसवतो. सलमानचे हाल बघवत नव्हते. शेवटी व्हिलनला हरावे लागते फक्त एवढ्याच कारणासाठी इंदर कुमार मरतो नाही तर पूर्ण फाईट मध्ये सलमानला इंदर भारी पडला होता.

इंदर कुमार आपल्या डॅम इट इन्स्पेक्टर महेश जाधव उर्फ महेश कोठारे यांचा फाईड होता.

माझा छकुला जेव्हा हिंदीत मासूम बनून आला त्यात तो हिरो होता. मासुमच्या पोराच्या टुपी टुपी टपटप पुढ याला कोण किंमत दिली नाही. पुढ खिलाडीयोंका खिलाडी वगैरे सिनेमामध्ये हिरोच्या मित्राची भूमिका मिळाली आणि तो त्यातच रमून गेला. तुमको ना भूल पायेंगे मध्ये लोकांना कळाल असा कोणी तरी कलाकार आहे ते.

सलमान इंदर कुमार कडून किती जरी मार खाऊ दे खऱ्या आयुष्यात कही प्यार ना हो जाये या सिनेमापासून तो सलमानचा चांगला मित्र बनला होता. त्याला बरीच काम मिळू लागली. क्युंकी सांस भी कभी बहु थीमध्ये जगप्रसिद्ध मिहीरचा रोल काही दिवसासाठी त्याने केला. सलमानच्या कृपेन तसं त्याच बर चालल होत.

inder

पण एक दिवस मसीहा सिनेमाच्या शुटींग वेळी हेलीकॉप्टरच स्टंट करताना त्याचा मोठा अॅक्सिडेंट झाला. (असं म्हणतात असला स्टंट स्वतः स्वतः करण्याचा सल्ला सुद्धा त्याला सल्लूने दिला होता.)

इथून त्याचे बुरे दिन सुरु झाले. डॉक्टरांनी त्याला तीन वर्षाची बेड रेस्ट सांगितली. त्याच्या करिअरला मोठा सेटबॅक बसला. सलमान खान परोपकार स्कीम मधून त्याला वॉटेड मध्ये रोल मिळाला , पिक्चर सुपरहिट झाला पण इंदर कुमारला काही फायदा झाला नाही. तिथून पुढे फक्त चुकीच्या कारणासाठीच तो चर्चेत राहिला.

२०१४मध्ये त्याच्यावर एका स्ट्रगलर अभिनेत्रीने आरोप केला की इंदर कुमारने माझ्यावर बलात्कार केला आहे. इंदर कुमार म्हणाला आमचे शारीरिक संबंध होते पण मी कधीच बलात्कार केला नाही. त्याच्यामते त्या मुलीला इंदरकुमार आपल्या बायकोकडे परत गेला म्हणून बदला घेण्यासाठी ही केस केली.

असो , या मिटू प्रकरणात तो दोषी ठरला. त्याच्या मदतीला इंडस्ट्रीचा भाई आला नाही ना कोणीच आल नाही. (फक्त डॉली बिंद्रा आली होती)

अशातच एक दिवस बातमी आली की इंदर कुमार मेला. त्याचा दारू पिऊन सुसाईड करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. पण त्याच्या बायकोने नंतर सांगितले की इंदर कुमारचा मृत्यू हार्ट अटकने झाला असून त्याने तो व्हिडिओ गंमत म्हणून बनवला होता.

तुमको ना भूल पायेंगेमध्ये सलमान ला फाईट देणारा हा हिरो आपल्या चुकांमुळे कायमचा विस्मृतीत गेला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.