भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार अभिनेत्री जिच्या किसींग सीनमुळे राडा झालेला…

तुझ्या ना तोंडाला सुमारच नाही असा डायलॉग हानायची वेळ आता आजच्या बॉलिवूड मधल्या किसींग सीन करणाऱ्या हिरो हिरोईनला आली आहे. चुम्मा,किस, पप्पी, चुंबन हे शब्द आता इतके नॉर्मल झाले आहेत की त्याबद्दल जास्त बोलण्यात मजा नाही.

( प्रत्येकाच्या गावात किसिंगला वेगवेगळे आणि वाढीव शब्द असतात, कमेंट मध्ये टाका ) तर आजकाल सिनेमात किसींग नॉर्मल झालेलं आहे पण मराठीत अजून तितका स्कोप नाहीय. (अपवाद आहेत काही ) बर तो विषय सोडा भारतातला पहिला किसींग सीन आणि त्यावरून झालेला राडा हा बॉलिवूडमध्ये फेमस आहे. त्याबद्दल आपण जरा डीटेलमध्ये पाहूया.

बॉलिवूडमध्ये रोमँटिक किंवा इंटीमेट सीन्स आले तर ते कसे दाखवायचे ( खरतर तेव्हाचे लेखक हे रोमँटिक सीन लिहायचे खरे पण ऐन वेळी कात्री लागायची आणि लेखनावर पाणी घालावं लागायचं ) मग त्या इंटीमेट सीन्स ऐवजी दोन फुलं एकमेकाला धडकायची आणि थरथर करायची किंवा दोन पक्षी एकत्र येऊन चोचीत चोच असा किसींग सीन क्रिएट करायचे म्हणजे अशा गोष्टी आता पाहिल्यावर हसू येतं पण तेव्हा असे सीन घडवून आणण म्हणजे एक मोठं दिव्य मानल जायचं. 

तेव्हाचा काळ हा बोल्ड सीन्स दाखवू शकत नव्हता कारण सिनेमा हा विषय तितका प्रगत झालेला नव्हता उलट त्याकडे वाईट म्हणूनच बघितलं जायचं. पण त्या काळात एका हिरोने आणि हीरोइनने सगळ्यात मोठा किसींग सीन दिला होता आणि मोठा गदारोळ झाला होता.

१९३३ साली एक सिनेमा आला होता आणि त्याचं नाव होतं कर्मा. या सिनेमात देविका राणी आणि हिमांशू रॉय होते आणि या दोघांनीच तो ऐतिहासिक किसींग सीन दिला होता तोही एक दोन नाही तर तब्बल ४ मिनिटांचा. बॉलिवूडमधल्या नामांकित किसींग सीन्सला भारी पडणारा असा हा सीन होता..

 भारतीय सिनेमात पहिल्यांदा दाखवला गेलेला हा किसींग सीन होता. जसा हा सिनेमा रिलीज झाला आणि या किसींग सीनवरून वादविवाद सुरू झाले.

 देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया कारण एवढं धाडसाचं काम त्यांनी केलय.

देविका राणी या १९३०-१९४० च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. भारतीय सिनेमात पहिल्यांदा किसींग सीन करणाऱ्या त्या अभिनेत्री होत्या. आपल्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये देविका राणी यानी बरेच बोल्ड सीन्स दिले होते. खरतर देविका राणी या भारतात जन्मल्या आणि नंतर मात्र शिक्षणासाठी त्या इंग्लंडला निघून गेल्या आणि तिथेच त्या मोठ्या झाल्या आणि तिथल्या संस्कृतीत वाढल्या. त्यामुळे त्यांचा बोल्डनेस साहजिकच होता. त्यांना किसींग सीन्स मध्ये सहाय्य करणारे हिमांशू रॉय हे त्यांचे पती होते. हिमांशू रॉय हे प्रोड्युसर होते.

पण त्याहूनही जास्त चर्चा देविका राणी आणि हिमांशू राय यांच्या ४ मिनिटांच्या चुंबन दृश्याची होती. त्यावेळी भारतातील तसेच येथील चित्रपटसृष्टी अशा दृश्यासाठी तयार नव्हती. यामुळेच देविका राणी आणि हिमांशू राय यांचा किसिंग सीन पडद्यावर दाखवला गेला तेव्हा गोंधळ झाला. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात लांब किसिंग सीन आहे. 

या सीनमुळे देविका राणीवर त्यावेळी बरीच टीका झाली होती. त्या सीनवर बराच वाद झाला असला तरी त्याची खरी कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

देविका राणी आणि हिमांशू रॉयवर चित्रित करण्यात आलेला किसींग सीन काही तितका उत्कट लिप-लॉक सीन नव्हता. वास्तविक, दृश्यानुसार, चित्रपटात हिमांशू रायच्या पात्राला साप चावलेला असतो. त्यानंतर तो कोलमडून पडतो. देविकाचे पात्र त्याला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. या अफेअरमध्ये देविका राणी हिमांशू रायवर चुंबनाचा वर्षाव करते.

यादरम्यान ती त्याला लिप किस करते. हे चुंबन त्यावेळच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात धाडसी दृश्य होते, जे पाहून सर्वांचे श्वास थांबले होते आणि हे आपण काय पाहिलं असे आविर्भाव लोकांचे होते. टीका बरीच झाली लहान मुलांना हे दाखवायचं का आम्ही ? लाजा सोडल्या, संस्कृती धोक्यात वैगरे अशी शेरेबाजी आणि टीका सुरू होत्या.

पण त्याकाळी इतक्या धाडसाने देविका राणी आणि हिमांशू रॉय यांनी हा सीन वठवला होता की थेट सीन अजरामर झाला…..

दिलीप कुमार यांना इंडस्ट्रीत आणण्याचे श्रेय देखील देविका राणी यांना जाते. दिलीप कुमार डॉ. मसानी यांच्यासोबत बॉम्बे टॉकीजच्या स्टुडिओत गेले होते. जेथे देविका राणीने त्यांना विचारले की तुम्हाला अभिनेता व्हायचे आहे का?  यासाठी तुम्हाला दरमहा १ हजार ५०० रुपये पगार मिळेल असंही सांगितलं. त्यानंतर देविका राणीने दिलीप कुमार यांची ओळख अशोक कुमार यांच्याशी करून दिली आणि यांना अभिनेता म्हणून घ्यावे अशा सूचना देविका राणी यांनी केल्या होत्या.  

 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.