जगभरात पसरलेले अफगाणिस्तानबद्दलचे हे ५ गैरसमज आपल्या मनातून काढले पाहिजे.
भारत आणि आपले परराष्ट्र धोरण विश्लेषक भारताच्या सीमापार हिंदुकुश पर्वतरांगांवर अफगाणिस्तानात काय घडत आहे याबद्दल चिंतित असल्याचे दिसून येतात. बरं असंही काही नाहीये कि तिथे होणाऱ्या सर्व घटना अनपेक्षित घडत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य बाहेर पडल्यावर तालिबान शिरजोर होणार हे सगळ्यांना ठाऊकच होतं.
तसही अफगाणिस्तानला भारतच नाही तर संपूर्ण जग एका साच्यात ढकलून सोडला आहे. त्यांच्या बद्दल अनेक समज गैरसमज दंतकथा पसरलेल्या असतात.
कोणते ५ गैरसमज/दंतकथा आहेत ?
दंतकथा १ – अफगाणिस्तानवर कधीही परदेशी आक्रमण झाले नाही.
अफगाणांनी विशेषतः पश्तूनने नेहमीच परकीय आक्रमकांना पराभूत केले आहे. अफगाण लोकांच्या प्रतिकारशक्तीबद्दल (युद्धातील प्रतिकारशक्ती) बरेच काही बोलले, लिहिले जाऊ शकते. त्यात लंडन आणि मॉस्को या दोघांनाही अफगाणांच्या हातून पराभव झाला असल्याने, ती एक अजिंक्य जमीन आहे या वस्तुस्थितीला खूप महत्त्व दिले जाते.
परंतु अचमेनिदपासून ते मौर्य, ग्रीक, अरब, मंगोल आणि मोगलांपर्यंत, अफगाणिस्तानने अनेक वेळा आक्रमणांची आणि आक्रमणकर्त्यांची गर्दी पाहिली आहे. सर्व आक्रमणकर्त्यांप्रमाणेच, प्रत्येकाने या देशाच्या संस्कृती आणि मानसशास्त्रात काहीतरी नवीन जोडले आहे. अधिक शक्तिशाली प्रतिस्पर्धी उदयास येईपर्यंत किंवा तो स्वत: खचून जाईपर्यंत तरी त्याला कुणीही हरवू शकत नाही.
दंतकथा २ – अफगाणिस्तान ही ‘साम्राज्यांचे कबर’ आहे.
अफगाणांनी साम्राज्यवादी युरोपच्या महान शक्तींना पराभूत केल्यापासून, अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांची कबर’ म्हणून लोकप्रिय आणि भावनात्मक प्रतिष्ठा देण्यात आली आहे. तथापि, अफगाणिस्तानवर प्रदीर्घ काळ असेलेला भारतीय कब्जा आणि शेवटी देशाच्या फाळणीच्या तपशीलांमुळे हा समज देखील खोटा ठरला आहे.
अफगाणिस्तानमध्ये खूप पूर्वी, मारवाडचे महाराजा जसवंत सिंग यांनी जवळजवळ एक दशक कंदाहारवर राज्य केले होते.
ते १६७८ मध्ये जमरुद येथे मरण पावले. त्यानंतर मे १८३४ मध्ये पंजाब सैन्याने अजिंक्य शीख योद्धा हरिसिंग नलवा यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आणि त्याचे बरेच प्रदेश ताब्यात घेतले जे परत कधीही परत केले गेले नाहीत. अफगाणिस्तान मूळ स्वरूपात सिंधू नदीपर्यंत होता, ज्यात पेशावरचा प्रमुख समावेश होता.
त्यामुळे जर हरिसिंग नलवा आणि महाराजा रणजीत सिंग यांची लष्करी शक्ती नसती तर आजचा पाकिस्तान क्षेत्रफळाने खूपच लहान असला असता.
दंतकथा ३ – अफगाणिस्तान हे एका मोठ्या खेळाचे रंगमंच होते
१९ व्या शतकातील लंडन आणि सेंट पीटर्सबर्गमधील सर्व जेंटलमन्स क्लब अफगाणिस्तानातील सर्व प्रकारच्या हेरगिरी उपक्रमांविषयी अफवा, कथा आणि मिथकांनी भरलेले होते. खरं तर, या तथाकथित ‘द ग्रेट गेम’ने १९ व्या शतकात भारत आणि अफगाणिस्तानला एकत्र बांधले होते, जसे की ते जवळजवळ हजार वर्षांपूर्वी व्यापारांमुळे आणि आक्रमणाद्वारे जोडले गेले होते.
वास्तविक हा ‘सामना’ अफगाणिस्तानमध्ये खेळला जात होता पण त्याचा ‘स्कोअरबोर्ड’ भारतासाठी निश्चित करण्यात आला होता. ही संपूर्ण ‘टूर्नामेंट’ भारताशी निगडीत होती कारण ती युरोपसाठी सर्वात मोठे शाही पारितोषिक होते.
दंतकथा ४ – मुजाहिदीन हा डिसेंबर १९७९ च्या सोव्हिएत आक्रमणाला दिलेल्या प्रतिसादाचा एक परिणाम होता
१९ व्या शतकापासून इथे चालू असलेल्या खेळाचे ‘खेळाडू’ नक्कीच बदलले आहेत पण यामागची दंतकथा अजूनही कायम आहेत. त्यापैकी एक आता खेळाच्या मुख्य सहभागींविषयी आहे, जसे की तालिबान हा शुद्ध मिशनरी आहे जो पवित्र मिशनवर आहे.
तालिबान हे सोव्हिएत आक्रमणाच्या काळात सीआयए-आयएसआयने पैसे देऊन पाळलेल्या मुजाहिदीनचे उत्पादन नाहीय. त्याच्या मूळ उत्पत्तीचे घटक खरेतर १९७३ मध्ये दिवंगत झुल्फिकार अली भुट्टो यांच्या फसवणुकीच्या पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयात नवीन ‘अफगाण सेल’ च्या स्थापनेशी संबंधित आहेत.
अफगाणिस्तानातील बंडखोरांना सशस्त्र करण्याची प्रक्रिया पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या व्यापक पैन-इस्लामिक दृष्टिकोनातून काबूलला त्याच्या ‘पश्तूननिस्तान’ मोड आणि भारताशी असलेली जवळीक यामुळे सुरू झाली. सीआयएने त्याचा निधी सोव्हिएत आक्रमणाच्या सहा महिने आधी डिसेंबर १९७९ मध्ये सुरू केला.
तालिबानचा सध्याच्या स्वरूपात १९९४ मध्ये बेनझीर भुट्टोच्या कारकीर्दीत जन्म झाला. खरी गंमत म्हणजे दोन्ही प्रकरणांमध्ये मेजर जनरल नसरुल्ला बाबर (निवृत्त) या प्रकरणांना जन्म देणाऱ्या दाईच्या भूमिकेत होते.
दंतकथा ५ – अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जाचा खरा विजेता पाकिस्तान आहे.
तालिबानचे एकसंध अस्तित्व नसले आणि ते काळाच्या गरजेनुसार विविध आदिवासी गटांच्या सरदारांना आकर्षित करते आणि दुरही करत असते, परंतु तरीही तो मुळात पश्तूनचा एक गट आहे.
ज्याप्रमाणे आपल्यापैकी बरेच भारतीय अजूनही फाळणीच्या वेदना सहन करत आहेत, पश्चातापामुळे ग्रस्त आहेत, त्याचप्रमाणे पश्तूनवासी देखील डुरंड सीमा रेषेमुळे नाराज आहेत ज्यामुळे त्यांची माती अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये विभागली जाते. हा खटकणारा मुद्दा इस्लामाबादशी त्यांच्या संबंधात नेहमीच अडथळा म्हणून राहील आणि संभाव्यपणे पाकिस्तानला दोन आघाडीच्या युद्धामध्ये ढकलू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही.
हे हि वाच भिडू :