कर्जबाजारी देशांची तुलना केली तर बांगलादेश पेक्षा आपली स्थिती खराब आहे.

कोरोनाची साथ अनेक संकटं घेऊन आली हे तर आपण पाहतच आहोत. या संकटात अनेकांनी आपले मित्र, नातेवाईक आई वडील गमावलेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे व्यवसाय ठप्प झाले, कित्येक नागरिक कर्जबाजारी झालीत. हे झालं प्रत्येकाचं वैयक्तिक पातळीवरचं नुकसान. पण राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरची स्थिती काय वेगळी नाहीये..तीही तितकीच वाईट झाली आहे. भारतासोबतच अनेक मोठाले देश कर्जबाजारी झाले आहेत.

या कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे काही अपवाद देश सोडलीत तर प्रत्येक देशांवर कर्जाचे ओझे आहे. 

भारतावर देखील हे संकट कमी नाहीये, खरं तर संकटांची मोठी दलदल म्हणलं तरी अतिशियोक्ती ठरणार नाही. एकीकडे या कोरोनाच्या साथीमुळे नागरिकांचे बळी जातायेत तर दुसरीकडे ठप्प झालेल्या बाजापेठा अन उत्पन्नात झालेली घट अशा दुहेरी संकटाशी सगळेच सामना करतायेत. 

याचबरोबर आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी खर्चात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. या सर्व कारणांमुळे जगभरातील सरकारांवर परकी कर्जाचा बोजाही वाढला आहे.

आता भारतसोबतच आपल्या शेजारच्यांबद्दल बोलायचं झालं तर यात येणारे देश म्हणजे,  बांगलादेश, पाकिस्तान, चीन.  कर्जबाजारी देश म्हणून आपली आणि शेजारच्या देशांची तुलना करायची झाल्यास सर्वात वरचा नंबर लागतो तो चीनचा ! चीन देशावर सर्वाधिक कर्जाचा बोजा आहे असं समोर आलंय.

देशांतर्गत एकूण उत्पन्नाच्या व्याप्तीनुसार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून असलेल्या चीनची अर्थव्यवस्था देखील खिळखिळी झाली आहे. 

उत्त्पन्नच्या बाबतीत नेहेमीच टॉपला असलेल्या  चीनवर भलं मोठं कर्ज आहे. 

 चीनवर १३ हजार ०९.०३ अब्ज डॉलर एवढे उच्चांकी परकी कर्ज आहे. गेल्या काही दशकांत चीनने आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. पण त्याचबरोबर कर्जात देखील अवाढव्य वाढ होत गेली. चीन  सरकारकडून बरेच प्रयत्न करूनही हे कर्ज आवाक्याबाहेरचे झाले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) वर्ल्डर्डोमीटरवरील नोंदीनुसार लोकसंख्येत चीन जगात प्रथम क्रमांकावर आहे. सुमारे १४४ कोटी ७४ लाख ४८ हजार २२८ एवढी चीनची लोकसंख्या आहे. याची कर्जाची सांगड घातल्यास प्रत्येक चीनी नागरिकावर ८९७१.७४ डॉलरचे कर्ज आहे. 

चीनच्या खालीखाल पाकिस्तानचा नंबर येतो…

आधीपासूनच डळमळीत अर्थव्यवस्था असलेला पाकिस्तान तर कर्जाच्या डोंगराखाली दबून गेला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान इम्रान खान सरकारच्या कार्यकाळात सुमारे २० हजार अब्ज रुपयांचे नवे कर्ज पाकिस्तानने घेतलेय.  तर परकी कर्ज मिळून पाकिस्तानवरील टोटल कर्ज हे ५० हजार अब्ज रुपयांवर पोहचलाय.

डॉलरमध्ये ही रक्कम अंदाजे २८३ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. वर्ल्डर्डोमीटरनुसार पाकिस्तानची सध्याची लोकसंख्या २२ कोटी ७१ लाख ४१ हजार ५२३ आहे. म्हणजे पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकावर साधारणपणे एक हजार २३० डॉलरची उधारी आहे.

आता तिसरा नंबर लागतो तो म्हणजे भारताचा !

 

ताज्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १३९ कोटी ९७ लाख ९१ हजार ६८  इतकी आहे.  मार्च २०२१ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांनंतर भारतावर परकी कर्जाची रक्कम हि ५७० अब्ज डॉलर इथपर्यंत पोहचली आहे. 

त्यात कोरोनाच्या काळातल्या आर्थिक वर्षात यात ११.६ अब्ज डॉलरची भर पडली. आता खोलात जाऊन आकडेवारी काढायचेच झाली तर प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर अंदाजे ४०७.१४ डॉलर एवढ्या कर्जाचा भार आहे.

पण भारतापेक्षाही बांगलादेशाची स्थिती चांगली आहे. 

भारताच्या मानाने आणि चीन, पाकिस्तान देशांच्या तुलनेने बांगलादेशवर सर्वांत कमी कर्ज आहे. भारतापेक्षा बांगलादेशची स्थिती चांगली असून उधारीचे प्रमाण अल्प आहे. बांगलादेश सुस्थितीत आहेच, तसेच बांगलादेशवर सुमारे ४५ अब्ज डॉलर एवढेच परकी कर्ज आहे. आकडेवारीनुसार तेथील प्रत्येकी नागरिकावर असलेल्या कर्जाची कडेवर सांगायची झाल्यास तेथील प्रतयेक नागरिकावर  साधारणपणे २६४.७० डॉलरचे कर्ज आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.