भारत विरुद्ध पाकिस्तान : कोणाचं सैन्यदल सर्वात ताकदवान, वाचा.

जागतिक पातळीवर भारतीय सैन्याचा उल्लेख चौथ्या क्रमांचे सक्षम सैन्य म्हणून केला जातो मात्र याच यादीत पाकिस्तानच्या सैन्याचा उल्लेख १७ व्या क्रमांकावर करण्यात येतो. 

भारताकडे असणारी शस्त्र, लढाऊ विमाने, आणि नौदलाची ताकद ही सर्वच पातळीवर पाकिस्तान पेक्षा अधिक आहे. भारतीय सैन्याच्या ताकदीचा हा तपशील वाचला तर पाकिस्तानचे सैन्य भारतीय सैन्यापुढे टिकू शकणार नाही हे सहज लक्षात येत.

आपण पाहूया भारत आणि पाकिस्तान यांपैकी कोणत्या सैन्य जास्त सक्षम आहे. 

सैन्यासाठीचे बजेट. 

इंटरनॅशनल इंस्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या मते, 2018 मध्ये भारताने 1.4 दशलक्ष सैन्यासाठी चार ट्रिलियन रुपयांची तरतूद बजेट मध्ये केली होती. पाकिस्तानने 6 लाख 53 हजार 800 सैनिकांसाठी 1.26 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांची तरतूद केली होती. 2018 मध्ये त्यांना परकीय लष्करी सहाय्याने 100 मिलीयन डॉलर्स मिळाले आहेत.

क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्र.

दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र सक्षम बॅलिस्टिक मिसाइल आहेत. भारतात ब्रह्मोस मिसाइल आहे. त्याची श्रेणी 300 किमी आहे. हे एक क्रूझ मिसाइल आहे. हे एखाद्या लष्करी विमानाप्रमाणे आहे. ते जमिनीच्या पृष्ठभागाच्या खूप जवळ जाते त्यामुळे शत्रू रडार पकडू शकत नाहीत.

अग्नी ३ ही भारतीय मिसाईल ५०००  किमी ते ३००० किमीपर्यंत हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. भारताकडे 9 प्रकारचे ऑपरेशनल मिसाइल आहेत.  ज्या पाकिस्तानच्या मसाईल पेक्षा अधिक सक्षम आहेत. चीनच्या सहाय्याने तयार केलेल्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र प्रोग्राममध्ये मोबाईल शॉर्ट आणि मध्यम श्रेणीचे शस्त्रे आहेत. पाकिस्तानकडील सर्वात लांब अंतराची शाहीन २ ही मिसाइल 2000 किमीपर्यंतचाच प्रवास करू शकते.

सैन्य दल. 

आयआयएस नुसार, भारताकडे 1.2 दशलक्ष इतके बलाढ्य सैन्य आहे, 3 हजार 565 पेक्षा जास्त रणगाडे, 3 हजार 100 इन्फंट्री लढाऊ वाहने आणि 9,719 तुकड्या आहेत. भारताकडे K 9 आणि M777 सारख्या बंदुका देखील आहेत. यांची ताकद एखद्या तोफेइतकी आहे. ६७ किमी प्रतितास इतका त्यांचा वेग आहे.

पाकिस्तानची सेना आपल्या तुलनेने खूप लहान आहे. त्यांच सैन्यबळ 5 लाख 60 हजार इतकंच आहे. त्यात 2 हजार 496 रणगाडे, 4 हजार 472 आर्टिलरी गन, 375 स्वयं-चालित होटिझर्स (लहान तोफा) आहेत.

हवाई दल. 

1 लाख 27 हजार 200 कर्मचारी आणि 814 लढाऊ विमानांसह, भारताचे वायुदल खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारताकडे मिराज, MZ429, जगुआर, तेजस अशी युद्ध विमाने आहेत. भारतीय हवाई दलाकडे २५० सुखाई फायटर जेट आहेत. हे जगातील उत्कृष्ट फायटर जेट मानले जातात.

चीनच्या मूळ एफ-7 पीजी आणि अमेरिकन एफ-16 फाइटिंग फाल्कन जेट्ससह पाकिस्तानमध्ये 425 लढाऊ विमान आहेत.

नौदल.

भारताच्या नौदलात एक विमान वाहक, 16 पाणबुडी, 14 डीस्ट्रोयरस, 13 फ्रिगेट्स, 106 गस्त व तटीय लढाऊ जहाजे आणि 75 लढाऊ विमानांचा समावेश आहे. यामध्ये 67 हजार 700 कर्मचारी आहेत, ज्यात मरीन आणि नौदल वैमानिकांचा समावेश आहे. पाण्यात मिसाईल वापरून हल्ला करण्यसाठी भारतीय सैन्याच्या ताफ्यात k4 एसएलबीएम नावाची मिसाईल देखील आहे.

पाकिस्तानकडे मात्र फक्त 8 पाणबुड्या, 17 जहाजे आणि 8 लढाऊ विमान आहेत.

सेकंद स्ट्राईक कॅपेब्लीटी

पाकिस्तान ने अणुवस्त्र वापर करून सर्व भारतीय तळ उध्वस्त केले तरी भारतीय सैन्य सक्षमरित्या उत्तर देऊ शकत. कारण भारतीय सैन्याकडे सेकंद स्ट्राईक कॅपेब्लीटी आहे. अर्थात पाण्याच्या आतून पाणबुडीचा उपयोग करून आपले सैन्य अणुवस्त्र हल्ला करू शकत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.