आता पाकिस्तानच्या युट्युब चॅनेलवर भारत सरकारचा सर्जिकल स्ट्राईक सुरु झालाय

पाकिस्तानला भारताविरोधी कुरघोड्या करण्याशिवाय दुसरा कोणताच कामधंदा नसतो. मग ते कुठला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म असो किंवा सोशल मीडिया. आपण भारतापेक्षा कसे भारी आहोत हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो.  पण त्याचा हा प्रयत्न नेहमीच फेल होतो.

आता सुद्धा पाकिस्तानचे सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरुद्ध प्रयत्न सुरूच आहेत. ज्यावर आता भारतानेच हातोडा मारलाय. भारताने पहिल्यांदाचं अशा २० यूट्यूब चॅनेलची ओळख पटवून ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत, ज्या माध्यमातून पाकिस्तान भारतात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याचं काम करत होता. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यूट्यूबला लेखी आदेश दिल्याचे समजतंय.

आयटी कायद्यात नुकत्याच समाविष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आलीये. यात २० यूट्यूब चॅनेलसोबतचं २ वेबसाईटचा सुद्धा समावेश आहे. या चॅनेल आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून चालवल्या जात होत्या आणि त्या देशात भारतविरोधी प्रपोगंडा पसरवण्याचं काम करत होत्या.

एकीकडे जिथे इंटरनेट मीडियाशी संबंधित मल्टिनॅशनल कंपन्यांचा कल पारदर्शकता आणि बातम्यांच्या सत्यतेकडे असताना, बरीचशी मंडळी त्याचा मोठा फायदा घेतायेत.  मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातून भारताच्या विरुद्ध आणि खोट्या बातम्या पसरवणारे अनेक यूट्यूब चॅनेल चालवले जात आहेत.

म्हणजे एक ‘नया पाकिस्तान’ नावाचा ग्रुप आहे  जो १५ युट्युब  चॅनेल चालतो, ज्यांचं टार्गेट भारताविरोधी द्वेष पसरवणं आहे. हे सर्व चॅनेल बातम्यांच्या नावाखाली खोटेपणा दाखवण्याचं काम करतायेत. हाईट म्हणजे त्यांचा हा खोटारडेपणा खरा आहे असं दाखवण्यासाठी काही चॅनल्सनी तिथल्या लोकल न्यूज चॅनेलवर काम करणाऱ्या अँकरला आपल्यासोबत घेतलयं, त्यांच्या मदतीने ती लोक ह्या खोट्या बातम्या देतात. जेणेकरून जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं.

माहितीनुसार, भारताविरुद्ध अफवा आणि खोट्या बातम्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या चॅनेलमध्ये तालिबान आर्मी, मोदी इम्पोज इमर्जन्सी, द नेकेड ट्रूथ, जुनैद अली ऑफिशियल, मियां इम्रान अहमद, द पंच लाइन यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे चॅनेल पाहणारे थोडेथोडके नाही तर तब्बल ३० लाखांच्या आसपास आहेत.

सरकारला आधी या चॅनेलवर फक्त डाउट होता जो क्लियर करण्यासाठी त्यांनी सखोल तपास केला, त्या संबंधित पुरावे गोळा केले आणि नंतरच या चॅनेलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सेक्रेटरी अपूर्व चंद्रा यांनी तसे पत्र यूट्यूब आणि टेलिकॉम विभागाला दिले आणि हे चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या मदतीने भारतात पसरवला जात होता. हे चॅनल काश्मीर, कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा विरोध आणि अयोध्यासारख्या मुद्द्यांवर ‘खोट्या बातम्या’ चालवत होते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच सरकारने इंटरनेट मीडियासाठी इंटरमीडिएट गाईडलाईन लागू केले होते. ज्या अंतर्गत संस्थांवर जबाबदारी टाकण्यात आली होती की ते चुकीचा मॅसेज देणार्‍या अशा गोष्टी आणि चॅनेल लगेच ब्लॉक करतील. साहजिकच या अंतर्गत यूट्यूबला या चॅनल्सवर आधीच कारवाई करायची होती. या मार्गदर्शक तत्त्वानुसार, बातम्यांशी संबंधित मुद्दे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतील, असेही ठरवण्यात आले. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.