थंडी सहन होईना म्हणून चीननं भारताच्या बॉर्डरवर रोबो आर्मी उभी केलीये

सध्या कडाक्याच्या थंडीचा मोहोल आहे. रात्रीचा आणि सकाळचा विषय तर सोडाच पण भर दुपारी सुद्धा स्वेटर घालून बसायची वेळ आलीये. आता आपल्या इथंच एवढी बेक्कार अवस्था आहे. तर काश्मिरात आणि लडाखमध्ये काय असेल याचा साधा विचार करून सुद्धा कापरं भारतयं.

पण या गोठवणाऱ्या थंडीत सुद्धा आपले भारतीय सैनिक बॉर्डरवर तैनात आहेत ते आपल्या सुरक्षेसाठी. चिनी सैनिकांना ‘काटे कि कट्टर’ देण्यासाठी भारतीय  सैनिक कुठल्याही परिस्थिती तिथे आपलं कर्तव्य बजावतात. पण या ड्रॅगनच्या सैनिकांना ही थंडी सोसवणं  पार अवघड जातंय.

पीएलएचे हजारो सैनिक अक्साई चिनच्या गोठवणाऱ्या थंडीचा आणि कमी ऑक्सिजनचा सामना करायला फेल ठरतायेत. ज्यामुळे चीनला तीन वेळा आपला कमांडर बदलायला लागलाय. एवढंच नाही तर बऱ्याच  चिनी सैनिकांचा मृत्यू सुद्धा झालाय. ज्यात चिनी लष्कराच्या सर्वात मोठ्या वेस्टर्न थिएटर कमांडचे कमांडर झांग जुडोंग याचा सामावेश आहे. त्यामुळे सैनिकांबाबत आणखी रिस्क उचलणं  परवडणार नाही.

यावर तोडगा म्हणून ड्रॅगनने बॉर्डरवर  रोबोट आर्मी तैनात केलीये. मशिनगनने लेस असलेले हे रोबोट तिबेटच्या उंच भागात गस्त घालताना पाहायला मिळतायेत. त्यातले बहुतेक तर  भारताला लागून असलेल्या बॉर्डरवर तैनात आहेत.

पीएलएने ८८ शार्प क्लॉ मानवरहित ग्राउंड व्हेइकल्स तिबेटमध्ये पाठवण्यात आलीत. त्यातली ३८ पश्चिम भागात आहेत.  माहितीनुसार शार्प क्लॉ UGV चा वापर अवघड प्रदेशात शोध मोहीम, गस्त, शस्त्रे वाहतूक आणि लॉजिस्टिक कामासाठी केला जाऊ शकतो.

तिबेटमध्ये रोबोटाइज्ड Mule -२०० सुद्धा आहे. ज्याला झोंग तियान झू काँग टेक्नॉलॉजी होल्डिंग्सद्वारे तयार करण्यात आलंय. त्याची रेंज ५० किमी एवढी आहे. एखाद्या अवघड भागात सुद्धा ते चांगल्या प्रकारे नेव्हीगेट करू शकतो. आणि एका वेळी सुमारे २०० किलो दारूगोळा आणि शस्त्रे वाहून नेऊ शकतो. यावर लांबूनही नियंत्रण ठेवले जाऊ शकते.  PLA कडे तिबेटमध्ये १२० Mule-२००s आहेत.

मानवरहित वाहनांव्यतिरिक्त, PLA कडे VP-२२ माइन रेझिस्टंट अॅम्बुश प्रोटेक्टेड व्हेईकल आहे. हे सैन्याच्या वाहतुकीसाठी  किंवा रुग्णवाहिका म्हणून वापरले जाऊ शकते. VP-२२ एका वेळी सुमारे १५  प्रवासी घेऊन जाऊ शकते. असे तिबेटमध्ये ७० VP-२२ आहेत त्यातले ४७ हे पश्चिम भागात आहेत.

विशेष वाहनांसह, जवळपास २०० लिंक्स ऑल-टेरेन वाहने दिसली आहेत, त्यापैकी सुमारे १५० लडाखच्या जवळच्या भागात आहेत. ते सैन्य आणि पुरवठा हस्तांतरित करण्यासाठी आणि अवजड शस्त्रे किंवा हवाई संरक्षण शस्त्रांसाठी एक व्यासपीठ म्हणून वापरले जाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे ती धोकादायक आणि खराब रस्त्यांवरही धावू शकतात. यात तोफखाना, जड मशीन गन, मोटार आणि मिसाईल लॉन्चर  देखील बसवले जाऊ शकतात.

आता एवढी सुसज्ज मिलिट्री असली तरी आपण सुद्धा काही कमी नाही. आपल्या कडे असलेल्या हत्यार, लढाऊ विमानांची बऱ्याचदा ड्रॅगनचा फडशा पाडलाय. आणि आपले भारतीय जवानांचा तर काही विषयच नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.