गलवान खोऱ्यातल्या सैनिकांना ओळख न देणारं चीन आता त्यांना शहीद म्हणून घोषित करत आहे.

मागच्या वर्षी जून महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधल्या गलवान खोऱ्यात हिंसक संषर्घ झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. पण चीनने मात्र त्यांच्या ठार झालेल्या  ४५ सैनिकांबाबत अवाक्षरही काढलं नव्हतं.

या दरम्यान लडाखमध्ये चिनी सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती आणि याला भारतीय सैन्यांनी उत्तर दिले होते. दोन्ही देशांच्या दरम्यान तणाव वाढला होता.

मात्र घुसखोर आमचेच सैन्य आहेत हे चीन मान्यच करायला तयार नव्हतं.

उलट चीनने हा दावा फेटाळून लावला होतं कि तिथे त्यांचं सैन्य घुसखोर होतं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी एका बैठकीत चीनने ५ जवान ठार झाले असल्याची कबुली दिली होती. यामध्ये त्यांच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश होता.

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना (CPC) चे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ ने कबूल केले आहे की २०२० मध्ये गॅल्वान व्हॅलीमध्ये भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीच्या वेळी चिनी सैन्य मारले गेले होते. त्यापैकी एकाचे नाव चेन हॉंगजुन. अशाप्रकारे पहिल्यांदाच, चीनी मीडियाने त्यांच्या मृत सैनिकांचा गालवानमधील झालेल्या युद्धातील तपशील प्रसिद्ध केला आहे.

चीनी मीडिया म्हणतो की, क्यू फाबाओ नावाच्या त्यांच्या लष्करी अधिकाऱ्याला भारतीय सैन्याने वेढले होते.

‘सिन्हुआ’ या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, चेन हॉंगजुन त्यानंतर आपल्या दोन सैनिकांसह त्या दिशेने निघाला, पण यावेळी भारतीय सैन्य सतत दगडफेक करत होते.

चिनी मिडीयाचे म्हणणे आहे की, चेन हॉन्जुनने आपल्या शरीरावर हे सर्व सहन केले. चिनी माध्यमांचा असा दावा आहे की त्यांच्या बर्‍याच सैनिकांना भारतीय सैन्याने ‘वेढा’ घातल्यानंतर चीनच्या सैन्याने त्यांच्या बचावासाठी हल्ला केला.

चीनी मीडिया असेही सांगते की हॉंगजुनबरोबरच आपल्या सिनियरला संरक्षण देणारा चेन जेनग्राँग नावाचा सैनिकही ठार झाला होता. ‘सिन्हुआ’ च्या म्हणण्यानुसार, त्या वेळी चिनी सैनिक मरायचं तर एकत्र राहूनच असा विचार करीत होते आणि म्हणूनच ते कमी लोकांसह गल्वानमध्ये ‘विजय’ मिळवला होता.

चीनचा हा दावा खोटा आहे कारण

भारतीय सैन्याने त्यांना जून २०२० मध्ये त्यांचा प्रांत ताब्यात घेण्यास यशस्वीरित्या रोखले होते.

Xinhua नुसार, चीनी सैन्याच्या जवानांनी कर्तव्याचे पालन केले आहे. चेन होंगजुन आणि त्याच्या 4 साथीदारांनी बहादुरी दाखवत देशासाठी आपले जीव गमावले. आपण लोक काराकोरमच्या पहाडीवर तैनात असलेल्या चीनी सैनिकांना आणि या युद्धामध्ये मारले गेलेल्या इतर सैनिकांना मानसन्मान दिला गेला पाहिजे.

अर्थात, चिनी मिडिया म्हणतंय कि आम्ही नाही पण भारतानेच युद्धाची सुरुवात केली होती आणि त्यात आमचे सैन्य मारले गेले आहे.

या दाव्याला मात्र भारतातील विपक्षी नेते नाकारत आहेत. मात्र चीनमधील मृत सैनिकांच्या कुटूंबाने त्यांची छायाचित्र मिडीयामध्ये दाखवली देखील आहेत. हे त्यांच्या देशांमध्ये माहिती आहे. चेन ज्याप्रमाणे आपल्या पत्नीला गिफ्ट पाठवायचा. त्यांच्या आईने देखील केलेली वक्तव्य चित्रित झाले आहेत.

त्यांनी जाहीररीत्या या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना ‘नायक’ उपाधी देतात.

चीनने आपल्या रेजिमेंटल कमांडर क्यूई फाबाओ, सीमा संरक्षणसाठी वीर रेजिमेंटल कमांडर टाइटल, चेन होंगझुन बॉर्डर बचाव हीरो आणि चेन जियानग्रॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग झ्यूऑरन प्रथम श्रेणीच्या गुणवत्तापूर्ण व प्रतिष्ठित म्हणून त्यांच्या शहीद सैनिकांना सन्मानित केलं होतं.

चिनी सोशल मीडियावर २०२० च्या ऑगस्टमध्ये, या संघर्षात मारले गेलेल्या सैनिकांच्या कबरीचे तसेच चेन सियानग्रोंग यांच्या फोटो व्हायरल झाले आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.