पचायला जरा जड जाईल पण बीफ एक्सपोर्ट करण्यात भारत टॉपच्या देशांमध्ये आहे.

उत्तरप्रदेशच्या निवडणूका चालू आहेत. होय! पार ७ राउंड असणार आहेत त्यामुळं भारतातल्या सगळ्या मोठ्या राज्यात निवडणुकीची एवढी लांबड लागली आहे. निवडणूक तशी पार वेगवेगळ्या मुद्यांवर लढली गेली पण सगळ्यात जास्त मुद्दा गाजतोय तो म्हणजे मोकाट जनावरांचा. यूपीत योगी सरकारनं पार राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून गो हत्येच्या कायद्याची अंमलबाजवणी केली. बाकी होती नव्हती ती कसर बहरून काढली गो रक्षकांनी. त्यांच्या भीतीनं म्हशींचीही कत्तलखाण्यात रवानगी करायला घाबरू लागले आहेत.

मग या मोकाट जनावरांनी अख्खीच्या अख्खी शेती फस्त करायला सुरवात केली. आणि यामुळंच आता या जनावरांचा मुद्दा निवडणुकीचा कळीचा मुद्दा बनला आहे. 

योगी सरकारला यामुळं प्रचंड रोषालापण सामोरं जावं लागतंय. संतप्त शेतकऱ्यांनी योगींच्या सभेत मोकाट जनावरं पण सोडली होती.

शेतकरी पुन्हा आता भाकड जनावरांची रवानगी कत्तलखाण्यात करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करू लागले आहेत. आता कत्तलखाना ऐकून आपल्यापैकी अनेकांच्या भावना दुखावल्या असतील पण विषय असा आहे की भारतात याधीपासूनच मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत.

 एवढाच नाही तर भारत बीफ एक्स्पोर्ट करण्यात जगात टॉपचा देश आहे.

आता बाहेरच्या देशात गाई म्हशींच्या अशा दोन्ही जनावरांच्या मांसाला बीफ म्हणतात. पण भारत सरकारच्या ऍग्रीकल्चर अँड प्रोसेसेड फूड एक्स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच अपेडा या एजन्सी नुसार भारत मात्र बीफमध्ये फक्त म्हशींच्या मांसाचं एक्स्पोर्ट होतं.

आणि त्यातच भारत जगातल्या टॉपच्या देशांमध्ये आहे. 

२०१४-१५ मध्ये तर भारत जगातला सगळ्यात मोठा बीफ एक्सपोर्टर ठरला होता. 

त्यांनतर भारतात उत्पन्न जरी जास्त बदललं नसलं तरी भारताचा क्रमांक मात्र खाली आला. अजून की इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे द प्रिंटच्या एक रिओर्टनुसार २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही भारताचं बीफ एक्स्पोर्ट करणं वाढतंच होतं. 

आता तुम्ही म्हणाल भिडू नुसता टॉप टॉपचा म्हणतोय पण बीफच्या व्यापारातून भारताला किती फायदा मिळतो.

तर भारतानं २०१४ मध्ये जवळपास २९ हजार कोटींचं म्हशीचं मांस निर्यात केलं होतं. २०२०-२१ मध्ये apeda च्या वेबसाइटनुसार हा आकडा आहे २३हजार ४६० कोटी रुपये. बासमती तांदळानंतर म्हशीचं मांस हे भारत एक्स्पोर्ट करत असलेला सगळ्यात मोठं प्रोडक्ट आहे.भारतातलं म्हशीचे मांस चविष्ट आणि स्वस्त असल्याने त्याला  मुख्यतः आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांकडून चांगली मागणी असते. तसेच तिथल्या लोकांकडे आता जास्तीचे पैसे येऊ लागल्याने प्राण्यांच्या प्रथिनांसाठी जेवणासाठी मागणी वाढत आहे. आणि त्याचा फायदा भारतीय एक्सपोर्टर उचलत आहेत.

त्यातच गोहत्येनंतर बीफच्या किंमतीत वाढ झाली असल्याने म्हशींना कत्तलखाना दाखवयाची संख्या वाढत आहे. इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रात गोहत्याबंदीनंतर कत्तलखान्यात म्हशीचं प्रमाण वाढलं होतं. पण त्याचं आपल्याला काय कारण

गाई हमारी माता है भैस का कौन सुनता है ..

म्हशींच्या  जाऊ द्या आपण आपल्या मूळ मुद्यावर येऊ. नुसतं मांसच नाही तर भारताने $३.६८ बिलियनचं लेदरही एक्स्पोर्ट केलं होतं. आणि भारत सरकारनं तर चामड्याचं उत्पादन दुप्पट करण्याचं उद्दिष्ट पण ठेवलं आहे. 

आता प्रश्न येतो मग कोणतं राज्य सगळ्यात जास्त बीफ उत्पादन करतं तर उत्तर आहे उत्तरप्रदेश. त्यानंतर मग पंजाब आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो.

हे कोटींची कमाई करणाऱ्या बीफ एक्सपोर्टस कंपन्यांचे मालक कोण आहेत ?

म्हशीच्या मांसाची भारतातील सर्वात मोठी निर्यातदार Allanasons Pvt Ltd ही कंपनी आहे. या कंपनीचे डिरेक्टर फौजान अलवी यांनी  २०१७ला उत्कृष्ट निर्यात कामगिरीसाठी सरकारी पुरस्कारही स्वीकारला होता. त्याच बरोबर हाझी झीर यांची अल हमद ही दुसरी सगळ्यात मोठी बीफ एक्सपोर्टींग कंपनी आहे.

आता लागलीच अनुमान काढायच्या आधी स्टोरी पुढं पण बघा. जसा आपला भारत विविधेतनं नटला आहे तशी बीफ कंपन्यांची ओनरशिपपण.

अल कबीर एक्सपोर्ट्स प्रा. लि बीफ एक्सपोर्टस करणारी ही कंपनी तेलंगणा राज्यातील रुद्रक गावात सुमारे ४०० एकरमध्ये पसरलेला भारतातील सर्वात मोठा कत्तलखाना चालवते.  

इकॉनॉमिक टाईम्सनुसार अल कबीरची स्थापना अतुल सबारवाल आणि गुलाम शेख यांच्या कुटुंबातील 50:50 च्या भागीदारीने झाली आहे.

त्याचप्रमाणे अल नूर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी सुनील सूद यांच्या मालकीची आहे. तर सुनील कपूर यांच्या मालकीची असलेली अरेबियन एक्सपोर्ट्स प्रा. लि.हे हे ही बीफ उद्योगातील मोठे प्लेअर आहेत. महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग अँड कोल्ड स्टोरेज प्रा. लि. हे ही मांस एक्स्पोर्ट मधलं प्रमुख नाव ज्यांचा एक कत्तलखाना सातारा तालुक्यातील फलटन इथं देखील आहे. त्याचे मला आहेत सनी खट्टर. म्हणजे पैसे बाकी जाती धर्म याचा विचार करून सगळेच छापत आहेत. 

त्यामुळं आता तुमच्यापुढं पूर्ण बीफ इकॉनॉमिक्स मांडलं. आणि यावरून तुम्हाला काय पटलं रे आम्हाला खाली कंमेंट करून जरूर सांगा.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.