इतके दिवस क्षेपणास्त्र आयात करणारा भारत आता ब्रम्होस दुसऱ्या देशाला विकणार आहे

”युद्धाची तयारी करूनच आपण जगात शांतता प्रस्थपित करू शकतो हे कटू असलं तरी सत्य आहे” 

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. जवळपास सगळ्या देशांनी हे सत्य मानले आहे. यातूनच जगात जवळपास १.३ ट्रिलियन डॉलरचं डिफेन्स मार्केट आहे. भारत आजपर्यंत या डिफेन्स बाजारात एक मोठा आयतदारच होता.

 मात्र हळू हळू भारत निर्यातही करू लागलाय.

 २०२०-२१ या वर्षात भारतानं आठ हजार कोटींच्यावर डिफेन्स रिलेटेड सामानाची निर्यात केली आहे.

फिलपीन्सकडून आता भारताला ३७४ दशलक्ष डॉलरची ऑर्डर आली आहे. फिलपीन्सनं त्यांच्या नेव्हीसाठी ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची मागणी भारताकडे केली आहे. गेल्या वर्षी, दोन्ही देशांनी केलेल्या संरक्षण करारारामुळं भारताकडून फिलिपाइन्सला संरक्षण उपकरणे निर्यात करणे शक्य झाले होते. मात्र करोनामुळं ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या ऑर्डरला विलंब होत होता.

भारत पहिल्यांदाच ब्रह्मोसच्या रूपानं क्षेपणास्त्र एक्स्पोर्ट करणार आहे. 

फिलपीन्सनं भारताकडून ही हे क्षेपणास्त्र घेण्यास प्रमुख कारण आहे की, कमी किंमतींत बेस्ट क्वालिटी देण्याची भारताची क्षमता.  यातील चीन अँगलही तेवढाच महत्वाचा आहे. सध्या दक्षिण चिनी समुद्रात चीन जी कुरघोडी करत आहे त्याचा परिणाम फिलपीन्सवर ही होत आहे.

दक्षिण चिनी समुद्रातील फिलपीन्सच्या हद्दीतील अनेक बेटांवर चीन आपला दावा सांगतंय.

 अनेकवेळा चीन आणि फिलपीन्सच्या नेव्ही एकमेकांसमोर ठाकल्या होत्या. चीनच्या या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील संबंध वाढत आहेत. ब्राम्होस मिसाइलची ऑर्डर हे या दृष्टीनं महत्वाचं पाऊल मानण्यात येतंय.

दक्षिण समुद्रातील इतर देश व्हिएतनाम आणि इंडोनेशियासह या देशांनीही भारताकडून ब्रह्मोस खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. 

तसेच या मिसीएलचे प्रात्याक्षिक भारतने संयुक्त अरब एमिरातला पण दाखवले होते.

२००१ मध्ये जेव्हा देशात अटल बिहारी वायपेयी यांचं सरकार होत. तेव्हा जहाजावरून, पाणबुडीतून, यांस जमिनीवरून वा हवाई विमानातून अशा विविध ठिकाणांहून मारा साध्य करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ या अद्ययावत अशा क्रूझ मिसाईलच्या निर्मितीच्या कार्याची सुरुवात झाली होती. 

रशियाशी सहकार्य करून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे नाव भारतातील ‘ब्रह्मपुत्रा’ नदी व रशियातील ‘मोस्क्वा’ नदी यांच्या नावावरून ब्राह्मोस असं ठेवण्यात आलं आहे.

 भारताची संरक्षण संबंधातील संशोधन करणारी डीआरडीओ ही संस्था व रशियाची एनओपीएम ही कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘ब्रह्मोस’ची डेव्हलोपमेंट चालू आहे.

संरक्षण मंत्रालय सक्रियपणे निर्यातीला प्रोत्साहन देत आहे.

 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मित्र राष्ट्रांशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारताने बनवलेल्या डिफेन्स साधनांचा मुद्दा मांडतात. 

तसेच स्वदेशी शस्त्रास्त्रांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातील भारतीय दूतावासाला निधीही मंजूर करण्यात येतो. त्याचबरोबर सरंक्षक साधनांची निर्यात सुलभ करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. याचाच परिणाम भारताच्या वाढत्या डिफेन्स निर्यातीवर दिसत असल्याचे जाणकार सांगतायत. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.