पाकिस्तानच्या घरात घुसून हा हल्ला कधी? कुठे? आणि कसा? करण्यात आला..

सध्या पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये उच्चस्तरिय लष्करी अधिकाऱ्यांची मिटींग चालू आहे. पाकिस्तानच्या जियो न्यूजच्या बातमीनुसार पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, सचिव या मिटींगमध्ये सहभागी झाले असून पाकिस्तान भारताच्या हल्याला आंतराष्ट्रीय पातळीवर घेवून जाणार आहे. 

हि झाली पाकिस्तानची अवस्था. आज सकाळी बातमी आली की भारतीय वायुदलाने मोठी कारवाई करत पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं. मिराज विमानामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याच सांगण्यात येत आहे. 

पहिला प्रश्न हल्ला कधी करण्यात आला. 

ANI च्या माहितीनुसार सकाळी २६ फेब्रुवारीच्या 3.30 मिनीटांनी हि कारवाई करण्यात आली. 

Screenshot 2019 02 26 at 10.59.13 AM

हल्ला नेमका कुठे करण्यात आला आहे. 

पाकिस्तानच्या बालाकोट, चकौती आणि मुज्जफराबाद येथील आतंकवाद्यांच्या तळांवर हि कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणांवर जैश ए मोहम्मद चे दहशतवादी तळ असल्याची माहिती समोर येते. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सैन्य जैश ए मोहम्मदच्या तळांवर लक्ष ठेवून होतेच. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामाचा भ्याड हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरमधील १३ दहशतवादी ठिकाण आपल्या रडारवर घेतली होती, त्यातील काही दहशतवादी ठिकाणांना भारतीय वायुदलाने टार्गेट केल्याच सांगण्यात येत आहे. 

दरम्यान हे बालाकोट पाकिस्तान मधील की पाकव्याप्त काश्मीर मधील यांच्या चर्चा चालू आहेत. बालाकोट पाकव्याप्त काश्मीरमधील भाग असेल हा प्रतिकात्मक स्वरुपाचा हल्ला आहे अस म्हणता येवू शकत आणि जर बालाकोट हा पाकिस्तानचा भाग असेल तर हा हल्ला मात्र पाकिस्तानवरचा हल्ला म्हणता येवू शकतो अस तज्ञ सांगत आहेत. 

हल्याची माहिती कोणी समोर आणली. 

Screenshot 2019 02 26 at 11.19.56 AM
https://twitter.com/OmarAbdullah?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1100247694474326016&ref_url=https%3A%2F%2Fwww.bbc.com%2Fmarathi%2Finternational-47366891

भारताकडून अशाप्रकारची कारवाई करण्यात आल्याचं, पाकिस्तानचे आर्मी प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफुर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. सकाळी पाचच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी हि माहिती दिली. 

Screenshot 2019 02 26 at 11.21.41 AM

वायुसेनेमार्फत करण्यात आलेल्या या हल्यात एकूण 12, मिराज 2000 या फायटर प्लेनचा वापर करण्यात आला आहे.  

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.