६२ वर्षांपासून सुटत नसलेलं गणित या भिडूने सोडवलं अन अमेरिकेचा टॉपचा पुरस्कार पटकावला
भारतीय व्यक्तींनी जगातल्या कितीतरी देशांमध्ये आपल्या कौशल्याने आणि कर्तुत्वाने भारत देशाचं नाव कमावलंय. आजकाल रोजच काहींना काही अशा सकारात्मक बातम्या कानावर येतात…खरंच अशा भिडूंचं खूप कौतुक वाटतं.
आज मी बोलतेय ते म्हणजे, निखिल श्रीवास्तव यांच्याबद्दल ! निखील हे भारतीय वंशाचे अमेरिकन गणितज्ञ आहेत. निखील हे त्यांच्या क्षेत्रासाठी निवडण्यात आलेल्या सर्वोत्तम लोकांपैकी एक आहेत. निखील हे कॅलिफोर्निया विद्यापीठात गणित शिकवतात. त्यांच्या कार्यात त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत.
निखिल श्रीवास्तव यांना अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने ऑपरेटर सिद्धांतातील पहिल्या-वहिल्या सिप्रियानी फॉयस पुरस्कारासाठी नामांकित केले आहे.
अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने निखिल श्रीवास्तव, अॅडम मार्कस आणि डॅनियन स्पीलमन यांची पहिल्या सिप्रियानी फॉइस पुरस्कारासाठी निवड केली आहे. या तिघांना 6 दशक जुने गणिताचे कोडे सोडवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतोय. अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने म्हटले आहे की, या तिन्ही गणितज्ञांनी त्यांच्या मूलभूत आकलनामुळे तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हि गणिताची समस्या सोडवली आहे.
निखिल श्रीवास्तव हे अमेरिकेतील गणित क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे, याआधीही त्यांनी अनेक प्रकारच्या गणितातील समस्या सोप्या करण्यासाठी पुरस्कार जिंकले आहेत. २०१४ मध्ये, त्याने जॉर्ज पोयला आणि मायकेल आणि शीला आयोजित असे मानाचे पारितोषिकं जिंकले आहेत.
या पुरस्काराबाबत ज्या बातम्या आल्यात त्यानुसार, या तिघांच्या मूळ कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे, ज्यामध्ये मॅट्रिसेसच्या विशिष्ट बहुपदी समजून घेण्याच्या पद्धती नव्या पद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुनरावृत्ती विलगीकरण पद्धत आणि बहुपदी जोडण्याची पद्धत, म्हणजे बहुपदी परस्पर जोडण्याची पद्धती देखील आहेत.
आता हि गणिती भाषा आपल्याला जास्त कळली नसली तरी सोप्यात सांगायचं झालं तर, ज्या गणितावर ६२ वर्षे उत्तर सापडलं नव्हतं त्यावर या तीन भिडूंनी डोकं लावलं आणि हे गणित अखेरचं सुटलं !
निखिल श्रीवास्तव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मॅट्रिक्स समजून घेणे आणि सोपे करण्यासाठी या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने तिन्ही गणितज्ञांना या पुरस्कारासाठी नामांकित करताना सांगितले की, गेल्या ६२ वर्षांपासून कायम असलेली समस्या त्यांनी एकत्रितपणे सोडवलीये.
पुरस्कारासाठी त्यांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर या तिघांनी आनंद व्यक्त केला तसेच तिघांच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. कडिसन-सिंगर समस्या सोडवण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या लोकांच्या वतीनेच त्यांना हा पुरस्कार स्वीकारायला आवडेल, असंही त्यात त्यांनी म्हणलं आहे.
तिन्ही गणितज्ञांनी रेखीय बीजगणित, बहुपदी आणि आलेख सिद्धांत यांच्यातील नवीन आणि खोल संबंध शोधून काढल्याचेही सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले. त्याच वेळी त्यांनी रामानुजन आलेखांमध्ये नवीन विस्तार सादर केले आहेत, जे इंटर-कनेक्टेड डेटा नेटवर्क्सची विस्तृत व्याख्या करतात.
हा जो सिप्रियानी ॲवार्ड त्यांना देण्यात येणार आहे. हा ॲवार्ड सिएटल येथे होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या गणिताच्या बैठकीत दिला जाणार आहे. या ॲवार्डच नाव सायप्रियन फॉइस असं आहे. सायप्रियन फॉइस हे ऑपरेटर थेअरी आणि द्रव यांत्रिकी क्षेत्रातील खूप मोठे आणि प्रभावशाली विद्वान होते. त्यांच्याच स्मरणार्थ आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २०२० पासून त्यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणि सोबतच त्या विजेत्याला पाच हजार अमेरिकन डॉलर्स देखील मिळतात.
बरं हि समस्या फक्त गणितापुरतीच नव्हती तर इंजिनिअर आणि क्वांटम फिजिक्स क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही गणितज्ञांप्रमाणे या समस्येला सामोरे जावे लागतं असायचे. पण शेवटी अभ्यासाच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर निखिल श्रीवास्तव, मार्कस आणि डॅनियल स्पीलमन यांनी हे गणित शेवटी सोडवलं आणि मूळ प्रॉब्लेमच सोल्व्ह झाला.
हे ही वाच भिडू :
- याच बाबाने जगाला गणिताच्या कोड्यात अडकवून ठेवणारं सुडोकू बनवलं होतं
- भिडू ! भारतीय वंशाचा एक माणूस आता थेट चंद्रावर दिसू शकतो.
English Summary: Indian-American mathematician Nikhil Srivastava among 3 selected for inaugural Ciprian Foias Prize.
Web Title: Indian-American Math Mastermind Nikhil Srivastava Solves Problem From 1959
Hat’s off! Pls show any example for this.we pleasent to watch it.
मी गेले एक दशक IT मधे कामाला आहे, केवळ रेखीय बीजगणित, आलेख सिद्धांत आणि बहुपदी हे शब्द वाचूनच थेट मराठी शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या, हुरूप आला. लेखकाच्या कष्टाचे आणि कटाक्षाचे मनःपूर्वक कौतुक.