भारताचे लष्कर प्रमुख इटलीतल्या स्मारकाचे उद्घाटन करणार, पण या स्मारकाचा इतिहास काय ?

लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे सद्या ब्रिटन आणि इटलीच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान, ते इटलीची राजधानी रोमपासून सुमारे १४० किमी अंतरावर असलेल्या कॅसिनोमध्ये इंडियन आर्मी मेमोरियलचे उद्घाटन करतील.

तुम्ही म्हणाल आता, इटलीमध्ये आपल्या सैन्यांचे स्मारक कसं काय ? आणि त्याचं उद्घाटन भारतीय लष्कर प्रमुख कसं काय करतायेत?

त्याचा इतिहास असा आहे कि,  हे स्मारक दुसर्‍या महायुद्धात शहीद झालेल्या ३१,००० हून अधिक राष्ट्रमंडल सैनिकांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे.ज्या सैनिकांनी या युद्धात इटलीची साथ दिली होती. 

१९३६ मध्ये बेनिटो मुसोलिनीच्या कारकीर्दीत इटली नाझी जर्मनी ची साथ देत होता. त्यानंतर १९४० मध्ये दुसर्‍या महायुद्धात ते अलाइड फोर्सच्या विरोधात होता. याच दरम्यान, १९४३ मध्ये जेव्हा मुसोलिनीची सत्ता गेली आणि इटलीने जर्मनीविरुद्ध युद्ध करणार अशी घोषणा केली.

यानंतर, माँटे कॅसिनोच्या युद्धात इटलीला फॅसिस्ट सैन्यापासून वाचवण्यासाठी आपले भारतीय सैनिक पोहचले.

या युद्धात हजाराहून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले.

१९४० च्या दशकात भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती आणि याच दरम्यान भारतीय सैन्यांनी दोन्ही महायुद्धात सहभाग घेतला होता.

भारतीय सैन्यांसोबत युरोपियन सैनिकांचा देखील यात समावेश होता. यात मुख्य भूमिका होती ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेची ज्यात भारतीय आणि युरोपियन सैनिकांची भरती केली जात होती. काही वृत्तानुसार, सप्टेंबर १९४३ ते एप्रिल १९४५ या काळा दरम्यान सुमारे ५०,००० भारतीय सैनिकांनी इटलीसाठी युद्धात उडी घेतली होती.

‘इंडियन आर्मी इन वर्ल्ड वॉर २’ या पुस्तकात कौशिक रॉय यांनी नमूद केलं कि,  दुसऱ्या महायुद्धात सर्वात मोठी स्वयंसेवक सेना होती ती भारतीयांची,  यात २० लाखाहून अधिक सैनिकांनी भाग घेतला होता.  १९४५ पर्यंत तर अलाइड फोर्सेसचा विजय झाला होता आणि हिटलरचा ही अंत झाला होता.

इकडे भारतही स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होता आणि आता स्वातंत्र्य मिळण्याचे संकेतही मिळत गेले. काही भारतीय इतिहासकार म्हणतात देखील कि,

महायुद्धात लाखो भारतीयांनी सहभाग घेतला होता पण त्यांचा इतिहासात म्हणावा तितका महत्वाचा उल्लेख आढळत नाही. त्यांनी दिलेल्या योगदानाला कमी लेखण्यात तर आलंच तसंच भारतीयांच्या योगदानाकडे दुर्लक्षही केलं गेलं.

कॉमनवेल्थ वॉर ग्रॅव्ह्स या वेबसाईटवर आढळलेल्या उल्लेखात म्हंटले आहे कि, कॅसिनो युद्धाच्या कब्रिस्तानच्या साठीची जागा १९४४ च्या जानेवारी मध्ये निवडण्यात आली होती. या  कॅसिनो वॉर कब्रिस्तान मध्ये दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या ४,२६६ राष्ट्रमंडल सैनिकांना दफन करण्यात आले आहे. दफन केलेल्या सैनिकांपैकी २८४ सैनिक अज्ञात आहेत.

तिथे ९०० हून अधिक भारतीय सैनिकांचे अंत्यसंस्कार केले होते, त्या सर्व सैनिकांचे स्मरण केले जाते.

भारतीय सैन्यांचे हे स्मारक लुई डी सोइसन्स यांनी डिझाइन केले होते आणि या स्मारकाचे अनावरण फील्ड मार्शल द आरटी यांनी केले.

तसेच ब्रिटिश मिलिट्री हिस्ट्री नुसार, इटलीच्या या मोहिमेमध्ये भारतीय तिन्ही पायदळ विभागातील सैनिकांनी भाग घेतला. इटलीमध्ये पोहचणारा पहिला विभाग हा भारतीय पायदळ विभाग होता. १९४१ मध्ये ब्रिटिशांनी या देशांवर आक्रमण केल्यावर त्यांनी इराक आणि इराणमध्ये कारवाई केली. चौथा  भारतीय विभाग डिसेंबर १९४३ मध्ये उत्तर आफ्रिकेतून इटलीला आला. १९४४ मध्ये, ते कॅसिनोमध्ये तैनात केले गेले.

आणि अहमदनगरमध्ये १९४१ मध्ये दहावा भारतीय विभाग स्थापन करण्यात आला, जो १९४४ मध्ये इटलीला गेला.

त्यादरम्यान पंजाब आणि भारतीय मैदानांवरील सैनिकांना बऱ्याच प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला होता. त्यात नेपाळच्या गोरखा सैनिकांनीही मुसळधार पाऊस आणि गोठलेल्या पर्वतांच्या प्रदेशात कित्येक रात्र आणि दिवस काढले होते.

तरीही तिन्ही भारतीय दलातील सैनिकांनी इटलीमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केली. या सैनिकांवर अलाइड आणि एक्सिस कमांडर्सनी मात्र सन्मानपूर्वक पाहिले आहे. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.