सफारी आली पण जिप्सी गेली ! 

भारतीय लष्कराच्या सेवेत दिमाखात चालणारी गाडी म्हणजे मारूती सुझूकीची जिप्सी. काही दिवसांपूर्वी माध्यमांमधून तुम्ही आत्ता टाटा सफारी स्टॉर्म भारतीय लष्कराच्या सेवेत असेल अशी बातमी आली. टाटा सफारी प्रेमींचा आनंद गगनात मावला देखील नसेल पण त्यामध्ये जिप्सी जाण्याचं देखील एक छोटसं दुखं का होईना आहेच की ! 

गेली २७ वर्ष भारतीय लष्कराच्या सेवेत असणाऱ्या जिप्सीचा तितकाच जबरदस्त इतिहास !

मारुती सुझुकी ने 1985 साली जिप्सीला भारतात लॉन्च केले होते. आणि 1991 साली ही गाडी देशाच्या लष्करी सेवेत दाखल झाली होती. भारतातली सर्वात कमी वजनाची एसयूव्ही अशी तिची ओळख होती. वाऱ्याच्या वेगाने धावणारी जिप्सी काश्मीर मधल्या दऱ्या पहाडांपासून ते राजस्थानच्या वाळवंटापर्यंत आणि बिहारच्या लालूच्या रस्त्यापासून ते विरप्पन च्या जंगलातल्या रस्त्यांपर्यंत आसेतु हिमाचल कुठेही आणि कसेही वापरता येईल अशी दणकट होती.

चारी चाकांना लिफ सस्पेंशन दिलेले असल्यामुळे गाडीला खड्डयांच्या रस्त्यात हादरे कमी बसायचे. रस्ता जर चांगला आणि गुळगुळीत असेल तर गाडीत 200 किलो पेक्षा कमी वजन असले तर गाडी बाऊन्स व्हायची इतकाच काय तो प्रोब्लेम सोडला तर जिप्सी फुल्ल परफेक्ट पॅकेज होतं. 

Screen Shot 2018 08 31 at 2.20.29 PM
social media

आपल्याला एसयूव्ही म्हणजे डिझेल ही संकल्पना रूढ झाली आहे पण जिप्सी ही पेट्रोल वर चालणारी एसयूव्ही होती. या गाडीला मेंटेनन्स ची गरज अतिशय कमी होती. ताकदवान इंजिन ही तिची ओळख होती. 

जिप्सी चे वैशिष्ट्य म्हणजे तिला पॉवर स्टेअरिंग नव्हते. इलेक्ट्रॉनिक स्विचेस ची गुंतागुंत नव्हती. म्हणजेच अति अभियांत्रिकी (over engineering ) चा ओव्हरडोस या गाडीत नव्हता. या गाडीचा साधा आणि सुटसुटीतपणा हा आर्मीसाठी खूप महत्त्वाचा विषय होता. सर्वात कमी खर्चात तयार होणारी ही एसयूव्ही होती. शिवाय तिचे स्पेअरपार्टस सगळीकडे मिळायला सोपे होते. 

इतकं सारं असल्यामुळे जास्त काही आधुनिकीकरण न होऊन ही जिप्सी भारतीय लष्कराची लाडकी होती. 

मारुती ने आता पर्यंत 35,000 जिप्सी लष्करात दाखल केल्या होत्या. प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो त्या प्रमाणे एक ना एक दिवस जिप्सीला सुद्धा निवृत्त व्हावे लागणार होते. गेली काही वर्षे ती चर्चा सुरू होती . कितीही टाळले तरी न थांबता येणारी गोष्ट अखेर घडली आणि जिप्सीची जागा टाटा सफारी स्टॉर्म जि एस 800 ने घेतली.

टाटा सफारी चा या स्पेशल एडिशनला गेल्या वर्षी 3,192 गाड्यांची ऑर्डर भारतीय आर्मी कडून मिळाली होती. या ऑर्डर मधली 1500 वी गाडी पुण्यात सरंक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत लष्कराच्या स्वाधीन करण्यात आली.

या गाडीला मान्यता देण्यापूर्वी तिचे अनेक कसोट्यांवर तपासणी झाली. 15 महिने या तपासण्या ऑन रोड, ऑफ रोड सुरू होत्या.या सर्व कठोर तपासण्यांमध्ये टाटा सफारी पास झाली. दणकट आणि वेगवान या लष्कराच्या बेसिक गरज ही पूर्ण करतेच शिवाय याला अँटी ब्रेकिंग लॉक, बकेट सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉईंट, एसी, हिटिंग, पॉवर विण्डोज आशा नव्या काळातल्या सुविधा दिलेल्या आहेत.  

खास लष्कराला उपयोगी पडेल या दृष्टीने फॉग लॅम्प्स, रिकव्हरी हूक्स, जेरी कॅन असे काही बदल सुद्धा केलेले आहेत. गाडीत बसणाऱ्याच्या सेफ्टी साठी सुद्धा बराच विचार करण्यात आला आहे. या गाडीचे ग्राउंड क्लीअरन्स जास्त चांगले आहे. सर्व पद्धतीच्या वातावरणात चांगली कामगिरी करू शकेल असा दमदार इंजिन आहे.

जिप्सी ने अखंड 30 वर्षे राखलेला दर्जाचा मापदंड टाटा सफारी स्टॉर्म राखेल आणि देशाची मान उंचावत राहील यात शंकाच नाही शिवाय आपल्यासाठी जिप्सी आणि मिलेट्रीमॅन अस जमलेलं गणित पुढच्या काळात सफारी आणि मिलेट्रीमॅन होईल यात शंका देखील ठेवण्याचं कारण नाही.

असो सफारीला शुभेच्छा द्यायलाच हव्यात त्या देखील जिप्सीच्या अॅटिट्यूडमध्ये !  

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.