चीनला टक्कर देण्यासाठी सरकारने सैनिकांना दिलेली हि खतरनाक रायफल अशी आहे

गेल्या काही काळापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे या बॉर्डरवर लढणाऱ्या सैनिकांना आता अत्याधुनिक अशा खतरनाक रायफल आणि वाहनांचा पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.

थोडक्यात यामागचा उद्देश असाय कि, भारतीय सैनिकांची क्षमता वाढवण्यासाठी तसेच त्यांना सर्वच पातळीवर सक्षम करायची आहे. यासाठीच भारत सरकारने हे मोठं पाऊल उचललं आहे.

 प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि नियंत्रण रेषेपर्यंत (LoC) दहशतवादाने प्रभावित असलेल्या या  आव्हानात्मक भागात तैनात असलेल्या सैनिकांना आव्हानांचा सामना करताना तो अधिक सोपा व्हावा यासाठी या रायफल देण्यात आल्या आहेत…उत्तर सिक्कीमच्या मुगुथांग उप-सेक्टरमध्ये १५ हजार ५०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर सैन्य तैनात आहे. एवढ्या उंचीवर भारतीय सैनिक सदैव तत्पर असतात. याच भागातच चीनकडून सैनिकांना आणि सीमेच्या सुरक्षेला अधिक धोका आहे.  ATVs आणि ७.६२mm सिग सॉअर असॉल्ट रायफल पुरवल्यामुळे झालं असं कि, सिक्कीम येथे चीनच्या बॉर्डरवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे. 

तसेच असंही सांगण्यात येत आहे कि, उझबेकिस्तानसोबत सुरू असलेल्या ‘डस्टलिक’ प्रॅक्टिसमध्ये देखील याच रायफल वापरल्या जात आहेत.या रायफल भारत सरकारने अमेरिकेकडून खरेदी केल्या आहेत.  याआधी देखील याच रायफली जम्मू-काश्मीरच्या बॉर्डरवर वापरात येण्यासाठी ७२ हजार ५०० सिग सॉअर असॉल्ट रायफल्सची खरेदी केलेली आता भारत- चीन सीमेवर याचा वापर होणार आहे. 

DRDO द्वारे निर्मित केलेल्या INSAS रायफल AK-203 ची रिप्लेसमेंट म्हणून या रायफल येत आहेत. 

कारण अनेक वर्षांपासून इन्सासमध्ये अनेक इशूज येत होते, मात्र आता सरकारने रुस सोबत हा करार केला आहे. या डीलमुळे इंडियन आर्मीला मोठा सपोर्ट मिळणार आहे. 

पण काय खास आहे या रायफल मध्ये ?

SIG-७१६ ची निर्मिती अमेरिकन कंपनी ‘Sig Sauer’ करते. ही कंपनी जगातील सर्वोत्तम रायफल बनवण्यासाठी ओळखली जाते. SIG-७१६ हे LOC, LAAC सह बंडखोरी विरोधी ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून दिले आहे. भारतीय लष्कर आत्तापर्यंत AK-४७ चा वापर करत आली आहे. याशिवाय इंसासचा वापरही बराच काळ केला जात होता. त्यात काश्‍मीरमधील दहशतवादी पूर्वीपासूनच ३०० मीटरपर्यंतच्या AK-४७ चा वापर करत आलेत. म्हणजेच, दोन्ही बाजूंनी समान रेंजच्या रायफल्स वापरल्या गेल्या. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांना त्यांच्यापर्यंत जावे लागायचे, आणि विनाकारण आपले सैनिक मारले जात होते.

INSAS ची रेंज ४०० मीटर असू शकते परंतु त्यावर विश्वास ठेवता येत नाही. त्याची ५.५६ मिमी कॅलिबर शत्रूला इजा करेल, अगदी जवळून गोळीबार केल्यावर मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे अनेक गोळ्या लागूनही दहशतवादी लढत राहिले. अमेरिकन सैन्याला तालिबानच्या विरोधात हीच समस्या भेडसावत होती. यानंतर नवीन प्रकारच्या असॉल्ट रायफलमध्ये रिसर्च होत होत SIG-७१६ तयार झाली. जी कि,  INSAS च्या दृष्टीने वजनाने हलकी आणि आकाराने लहान व लेटेस्ट मॉडेल आहे. 

याच खासियत काय आहे ?

कॅलिबर- ७.६२ NATO

बॅरल लेंथ -१६ इंच

बॅरल मटेरियल- कार्बन स्‍टील

रेंज: ६०० मीटर

मॅगजीन टाईप – AR-१०

एक्शन टाईप –सेमी ऑटो

स्‍टॉक टाइप: टेलिस्‍कोपिक

ट्रिगर टाइप: सिंगल स्‍टेज पॉलिश्‍ड/हार्ड कोट

ट्विस्‍ट रेट: १.१०

फोरएंड टाइप: अलॉय

ग्रिप टाइप: पॉलिमर

ओवरऑल लेंथ: ३७ इंच

ओवरऑल विड्थ: २.५ इंच

हाइट: ८ इंच

वजन: ३.८५ किलोग्राम

सोर्स: सिग सॉर वेबसाइट

थोडक्यात हे Sig Sauer 716 7.62 x 51mm मॉडेल राउंड फायर करण्यासाठी डिझाइन केले आहे. त्याची रेंज ६०० मीटर आहे, जी AK-४७ च्या दुप्पट आहे, म्हणजेच दहशतवाद्यांच्या जवळ न जाता त्यांना टार्गेट केले जाऊ शकते. यात शॉर्ट-स्ट्रोक पिस्टन-चालित कार्यप्रणाली आहे, ज्यामुळे ऑपरेटरला कमी धक्का बसतो, याचा अर्थ अचूकता वाढली आहे….याला M१९१३ मिलिटरी स्टँडर्ड रेल देखील मिळते ज्यावर नाईट व्हिजन डिव्हाईस, टॉर्च किंवा मिशनच्या गरजेनुसार इतर कोणतेही उपकरण बसवता येते. त्यामुळे असे आधुनिक शस्त्रे भारतीय लष्कराला मिळत गेलीत तर नक्कीच आपल्या भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात लष्कराला आपले जीव गमवावे लागणार नाहीत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.