स्टार्ट-अप म्हणून झालेल्या कंपनीने इंडियन CEO ला इलॉन मस्क एवढं पॅकेज दिलंय

इंडियन सीईओ आणि अमेरिका कंपन्या ही बातमी काय आता नवीन नाही राहिलेय. पराग अग्रवाल,सुंदर पिचई,सत्या नडेला आणि अजून बरीच जणं. बहुतेक जशी पुण्यात पोरं एमपीएससी-यूपीएससी करायला येतात तशी हि पोरं कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये सीईओ बनायला  जातात. अमेरिका कंपन्या पण भूमिपुत्र आणि बाहेरचं असलं काय खेळत न बसता भारतातल्या या टॅलेंटचा फायदा घेऊन तुफान प्रॉफीट काढतात. आता अमेरिकेच्या  सीइओंच्या यादीत अजून एक नाव   पगार पण तसेच असतात. आता अमेरिकेत जाऊन सीईओ बनणाऱ्यांच्या यादीत अजून एक नाव आलाय.

 जगदीप सिंग असं या सीईओचं नाव आहे. क्वांटमस्केप या कंपनीमध्ये हे भाऊ सीईओ आहेत.

क्वांटमस्केप हि कंपनी इलेक्ट्रिक गाडयांच्या बॅटरी बनवण्याचं काम करते. पण यांची कंपनी गुगल, ट्विटर एवढी फेमस नाहीए त्यामुळं त्यांची एवढी हवा नाही झाली. मात्र आता ते ट्रेण्डिंगमध्ये आलेत आणि ट्रेंडिंगमध्ये येण्याचं कारण आहे त्यांचा पगार.  

क्वांटमस्केप या कंपनीच्या डायरेक्टर्सनी जगदीप सिंग यांचा पगार १७ हजार कोटी करण्यास मान्यता दिलेय . 

त्यांचा हा पगार एलॉन मस्कच्या तोडीचा असल्याचं इंडस्ट्री एक्स्पर्ट सांगतायत. आता इलॉन मस्क यांच्याशी का तुलना होतेय तर सगळ्यात जास्त पगार घेणाऱ्यांमध्ये इलॉन मस्क भाऊंचा नंबर खूप वरचा आहे. इंडस्ट्रीमध्ये जे सीईओना मोठे पॅकेज देण्याची लाटच आली आहे त्याची सुरवात इलॉन भाऊंनी केल्याचं सांगितलं जातंय. 

यातही जगदीप सिंग यांना एवढा पगार मिळवण्यासाठी काही टार्गेट दिली आहेत ती पूर्ण करावी लागणार आहेत. मात्र टार्गेट तर तुम्हा आम्हला पण भेटतात आणि ती पूर्ण केल्यावर भेटतं काय तर HR चा अँप्रिसिएशन करणारा ई-मेल नाहीतर सोडिस्कोचं डिस्काउंट कूपन. जगदीप सिंगांचं मात्र तसं नाहीए. त्यानं डायरेक्ट १७ हजार कोटीं शेअर्स दिले जाणारंय.

जगदीपसिंगाना पगार वाढ देण्यास सुरवातीला कंपनीतूनच विरोध होत होता. मात्र कंपनीच्या डायरेक्टर्सना मात्र  जगदीप सिंग यांच्यावर पूर्ण विश्वास.

त्यांनी कंपनीच्या शेयर होल्डर्सना लिहलेल्या पत्रात या निर्णयाचं जोरदार समर्थन केलंय.

जगदीप सिंग यांनी असं काय केलंय? की डायरेक्टर बोर्ड त्यांना एवढं मोठं पॅकेज द्यायला तयार आहे.

त्याचं पहिला कारण आहे जगदीप सिंग हे स्वतः क्वांटमस्केप या कंपनीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. एके काळी स्टार्ट-अप असणारी ही कंपनी आता एक यशस्वी कंपनी आहे. दुसरा कारण आहे इलेक्ट्रिक गाडयांच्या मार्केट मध्ये असणारी तेजी. त्यामुळं या क्षेत्रातील लोकांना भरभरून पॅकेज दिली जातायेत. आता सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हा माणसानं स्वतःच नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय.

अवघ्या १५ मिनटात जवळपास ८०% चार्जे होणारी लिथियम-आयनची बॅटरी जगदीप यांनी  बनवली आहे. 

या बॅटरीला येणाऱ्या काळात मोठी मागणी असणार आहे. 

क्वांटमस्केच्या शेयर होल्डर्समध्ये बिल गेट्स यांचाही समावेश आहे. बिल गेट्स पैसे टाकतो म्हटल्यावर कंपनीला भविष्यात चांगले दिवस आहेत एवढं नक्की आहे. मात्र आपलं टार्गेट पूर्ण करून जगदीप सिंग १७००० करोचं पॅकेज घेतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.  

 

 

       

 

Leave A Reply

Your email address will not be published.