भारतात तयार झालेलं पहिलं मीठाचं पॅकेट तब्बल ५०१ रूपयाला विकलं होतं.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मिठासाठी केलेला सत्याग्रह तुम्हाला माहितीच असेल. दांडी यात्रा नावानं या सत्याग्रहाला ओळखलं जातं. मात्र या सत्याग्रहावेळी भारतीयांनी तयार केलेलं मीठाचं पॅकेट तब्बल 501 रूपयाला विकण्यात आलं होतं.

सालं होतं 1930. त्यावेळी महात्मा गांधींनी मिठासाठी सत्याग्रह सुरू केला होता. नेमकं झालं असं की, समुद्र किनाऱ्यालगत राहणारे आपले भारतीय लोक मिठागराचा व्यवसाय करायचे. मात्र हे ब्रिटींशांना आवडलं नाही. त्यांनी सगळे मिठागरं आपल्या ताब्यात घेण्याचं ठरवलं. अधिकारांचा आणि दबावतंत्राचा वापर करून भारतीय मीठ उत्पादन बेकायदा ठरवलं.

भारतीयाचं मीठ उत्पादन बेकायदा ठरवून ब्रिटीशांनी स्वत:चं मीठ उत्पादन सुरू केलं आणि त्यावर कर बसवला.

महत्वाचं म्हणजे, मीठ हा रोजच्या खाण्यातला पदार्थ. आपल्या देशात तयार होँणाऱ्या मिठासाठीच आपल्याला कर भरावा लागतोय म्हणल्यावर भारतीय लोकांच्या भावना दुखावल्या. लोकांत अंसतोषांची भावना निर्माण झाली. या इंग्रंजांच्या या जुलमी कारभाराविरूद्ध आवाज उठवायचं गांधीजींनी ठरवलं.

सुरूवातीला जनजागृती केली. इंग्रजांना पत्र पाठवले. त्यांची कान उघडणी केली. मात्र सत्तेच्या आहारी बुडालेल्या इंग्रजांनी कोणत्याच पत्राला प्रत्युत्तर दिलं नाही. त्यामुळे याविरोधात सत्याग्रह करण्याचं ठरलं. साबरमती आश्रम ते दांडी अशी यात्रा काढायची आणि स्वत: मिठाचा कायदेभंग करून हा सत्याग्रह यशस्वी करायचा होता.

12 मार्च 1930 साली साबरमती आश्रमावरून या सत्याग्रहाला सुरूवात झाली. सुरूवातीला गांधीजींच्या सोबत 78 अनुयायी होती. साबरमती ते दांडी असं 390 किलोमीटर अंतर होतं.

सूरत, डिंडौरी, वांज, धमन आणि नवसारी असं गावं करत ही यात्रा दांडी या गावी पोहचली. वाटेत या आंदोलनात लोक मोठ्या संख्खेनं सामील झाले होते. 78 लोकांपासून सुरू झालेल्या या यात्रेत दांडी येईपर्यंत हजारो लोक सामिल झाले होते.

12 मार्चला सुरू झालेली ही दांडी यात्रा 5 एप्रिलला म्हणजे तब्बल 24 दिवसांनी दांडी येथे पोहचली होती. 6 एप्रीलला सकाळीच गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत इथं मीठ हातात घेऊन कायदेभंग केला. प्रत्येक वृत्तपत्रात गांधीजींच्या या दांडी यात्रेचं छापून येत होते. त्यामुळे लोक आंदोलनात भाग घ्यायला लागले. ठिकठिकाणी लोक ब्रिटीशांविरोधात आवाज उठवायला लागले. 

मात्र या वेळी महाराष्ट्रातील एका आंदोलनाची खुप चर्चा झाली. गांधीजींनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनात मुंबईमध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय या महिलेनं मुंबईतील चौपाटीवर जाऊन कायदेभंग केला. त्याच्या या कायदेभंगामुळे ब्रिटीशांनी या महिलांवर लाठीहल्ला केला. त्यानंतर प्रकरण चिघळलं. मोठ्या प्रमाणात महिला या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यांनी आपल्या हातानं मिठाचं पॅकेट बनवंल ते

भारतीयांनी बनवलेलं पहिलं मीठाचं पॅकेट तब्बल 501 रूपयाला विकण्यात आलं होतं.

देशभरातून लोक या आंदोलनात सहभागी होत होते. मीठाचा कायदेभंग करत होते. त्यामुळे इंग्रज घाबरले. त्यांनी महात्मा गांधीजींना अटक केली. मात्र तरीही हे आंदोलन थांबलं कारण सरोजीनी नायडू, विनोबा भावे हे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. इंग्रजांना जेरीस आणत होते.  या आंदोलनाच्या काळात इंग्रजांनी तब्बल 90000 हजार भारतियांना तुरूंगात डाबंलं होतं. मात्र आंदोलन थांबायचं नाव घेत नव्हतं. एक वर्षांनी गांधींजींना तुरूंगातून सोडण्यात आलं.

गांधी आणि ब्रिटीश लाॅर्ड आयरविन यांच्यात मीठावर लावलेल्या कराबाबत चर्चा झाली. त्यानंतर हे आंदोलन थांबलं.

मात्र, या आंदोलनाला इतिहासातली मोठी जनक्रांती म्हणून पाहिलं जातं. जग बदलणाऱ्या १० महत्त्वपूर्ण आंदोलनात या मिठाच्या सत्याग्रहाचा समावेश टाईम नियतकालिकाने केला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.