या चक्रीवादळा दरम्यान सुरु आहे भारतीय नौसेनेचे आजवरचे सर्वात चॅलेंजिंग ऑपरेशन.

तौत्ते चक्रीवादळाचा कहर सुरूच आहे. या शक्तिशाली वादळात आतापर्यंत दक्षिण भारतासह महाराष्ट्र, गुजरात,गोवा अशा सहा राज्यांना आपल्या कचाट्यात ओढले आहे. वादळामुळे बर्‍याच लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. शेकडो लोक जखमीही झाले आहेत. यामुळे लोकांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलयं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज या नुकसान पाहणीचा दौरा केला.

तौत्ते अरबी समुद्रापासून सुरू झाले. यावर्षी आलेलं भारतातील हे पहिले चक्रीय वादळ आहे. सर्व अडचणी असूनही एनडीआरएफ आणि भारतीय नौदल जनतेचे रक्षण करण्याचे काम करत आहेत. 17 मे रोजी नौदलाला आपातकालीन बचावाची रिक्वेस्ट मिळाली आणि ‘ पी 350’ नावाचे एक बार्ज मुंबई किनाऱ्यावरून भटकल्याचे समजले. त्यात एकूण 273 लोक होते.

यासंबंधी माहिती मिळताच नौदलाने तातडीने आयएनएसची चार जहाजे तैनात केली.

ज्यानंतर 177 लोकांना वाचवण्यात यश आले. तर ताज्या माहितीनुसार ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नौदलाने आयएनएस कोलकाता आणि आयएनएस कोचीवरून हे मृतदेह आणल्याची माहिती दिली आहे, तर इतर ४४ जणांचा शोध आणि बचाव कार्य सुरू अद्याप  आहे.

मात्र, जोरदार वारे आणि खराब हवामान ऑपरेशनला बाधा आणत आहे, तरीही भारतीय नौदल हरवलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. या व्यतिरिक्त, ‘गल कन्स्ट्रक्टर’ नावाच्या बार्गेमध्ये बसलेल्या सर्व 137 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

डेप्युटी चीफ ऑफ नेवल स्टाफ मुरलीधर सदाशिव पवार यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की,

गेल्या 4 दशकांत नौदलाने जितके मदत आणि बचाव कार्य केले, हे त्यातले सर्वात चॅलेंजिंग आहे. कारण एक तर १५० ते १६० किलोमीटर ताशी वेगानं वाहणारं वारं, सुमारे 18-25 फूट उंचीच्या लाटा, वरून पाऊस, आणि पुढचे काहीच दिसत नाही अशी हि सगळी परिस्थिती. सामान्यवेळी  असं वातावरण असेल, तर जहाजाच्या डेकवर सगळं निसरडं झालेलं असतं, त्यामुळे तिथं कोणी जात नाही. मात्र आत्ताच्या परिस्थितीत लोकांना वाचवायचं असल्यानं हे आव्हान स्वीकारावं लागलं.

त्यांनी सांगितले की, युद्धनौका एक किंवा दोन क्षेपणास्त्रांनी नुकसान पोहोचवू शकते आणि अद्याप त्यांची लढाऊ क्षमता राखू शकते, परंतु समुद्र कोणालाही सोडत नाही. समुद्र हा जितका चांगला मित्र आहे, परंतु तितकाच कटू शत्रू आहे, परंतु आमची जहाजे आणि चालक दल चांगले प्रशिक्षित आहेत आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहेत.

ते म्हणाले की, कोरोना असो किंवा नसो, आमचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे समुद्रापासून लोकांना वाचविणे. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या सर्व कर्मचार्‍यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जिवंत राहिलो तर आपण पुन्हा कोविडला सामोरे जाऊ, हे आमचे आदर्श वाक्य आहे.

माहितीनुसार, रात्रीच्या दरम्यान चक्रीवादळ तौत्तेच्या वरून जाताना आयएनएस कोलकाता, ग्रेट शिप अहल्या, ओएसव्ही ओशन एनर्जीमधून मंगळवारी सकाळपर्यंत एकूण 146 लोकांना वाचवण्यासाठी बचाव मोहिमेत सामील झाले आहेत.

जगाला धडकी भरवणारी हि मोहीम अजूनही सुरूच आहे. आज सकाळपासून समुद्रात काही मृतदेह देखील सापडत आहेत. एखाद्या युद्धप्रमाणे आव्हानात्मक असलेल्या या मोहिमेत नेव्हीचे जवान प्राण पणाला लावून लढताना दिसत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.