अध्यात्मिक बाबा हॉलिवूडमध्ये जाऊन पहिला भारतीय फिल्ममेकर बनला.

भारतातील अध्यात्मिक गोष्टी अनेक आहेत. ज्यावर लोकांचा प्रगाढ विश्वास आहे. असेच एक भारतातील नामवंत अध्यात्मिक गुरु, शिक्षक, लेखक अखॊय कुमार मोजुमदार. १८८१ साली भारतात कोलकात्यात जन्मलेले अखॊय कुमार मोजुमदार हे एक असामान्य योगी होते. आपल्या अध्यात्मातून त्यांनी पुढे अमेरिकेत जाऊन न्यू थॉट मुव्हमेंट सुरु केली होती.

आता भारतात इतके प्रसिद्ध असलेले अखॊय कुमार मोजुमदार पुढे अमेरिकेत गेले आणि फिल्ममेकर बनले. त्यावेळी अमेरिकेत त्यांना प्रचंड यशही मिळालं आणि सुरवातीला त्रासही झाला. त्यांनी भारतातून अमेरिकेत जाण्यासाठी बराच संघर्ष झाला. अगदी वर्णभेदावरूनही त्यांचा अपमान केला गेला. पण ते फिल्ममेकिंग कडे कसे वळले ते बघूया. 

अखॊय कुमार मोजुमदार हे अध्यात्मिक गुरु असल्याने त्यांनी कुठल्याही जादुई गोष्टी, युक्त्या करून लोकांना मोहित केलं नाही किंवा इतर अध्यात्मिक गुरूंप्रमाणे बडेजाव मिरवला नाही. त्यांच्या अध्यात्मिकतेविषयी तत्कालीन पत्रकार फ्रेडरिक लीबने लिहिले कि,

त्यांनी केवळ आपल्या बोटाच्या स्पर्शाने निर्माण झालेल्या वैश्विक किरणांनी लोकांना बरे केले.

सोप्या सोप्या गोष्टीतून ते लोकांना उपाय सांगत. त्यांचं वाचन आणि चिंतन खूप जास्त होतं. प्राचीन ग्रंथांमधील निवडक गोष्टी ते लोकांना सांगत असत. १९१० आणि १९२० च्या दशकात विदेशात ते लोकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले.

त्यांच्या आध्यात्मामुळे त्या काळातील लोक मोजुमदारांना भारताचा राजा म्हणून संबोधत असे. 

लहानपणी त्यांच्या आईने त्यांची अध्यात्मिकतेची गोडी ओळखून त्यांना १६ व्या वर्षी चीनला सोडले आणि तिथून पुढे ते १९०३ मध्ये सिएटल इथे पोहचले. इंग्रजी ओघवती भाषा, नवीन जीवनशैली, नवीन विचार आणि चळवळी यांची सांगड घालत त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचवण्यास सुरवात केली. प्रचार करणे हा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता. नागरिकतत्वामुळे त्यांना बराच त्रास झाला.

१९२० मध्ये मोजुमदार हे लॉस एंजेलिस मध्ये राहत होते. त्यात त्यांना वाटलं कि जे आपल्या मनात विचार येतात ते आपण चित्रपटातून सहज लोकांपर्यंत पोहचवू शकतो. तिथून ते अशा एका चित्रपटावर काम करत होते त्यामुळे मेटॅफिजिकल कल्पनांचा विस्तार होईल.

या चित्रपटात साधारण एका विशिष्ट बुरख्याच्या पलीकडे किंवा पडद्याच्या पलीकडे अशी थीम होती.  Beyond the Veil was a photoplay. एक राजा ज्याने आपल्या राज्याचा त्याग केलाआणि तपस्वी झाला. त्यातील राजकुमार रामा दास हि मुख्य भूमिका स्वतः मोजुमदार यांनी घेतली होती. त्याकाळचे कॅथरीन मॅकगुइयर, विल्यम बॉयड आणि डोरिस मॅकक्ल्युअर असे नामवंत कलाकार होते. 

या चित्रपटाची पटकथा मोजुमदारानी नुसती लिहिलेच नाही तर सह- दिग्दर्शितही केली. असा पराक्रम करणारे ते पहिलेच भारतीय ठरले. या घटनेमुळे ते अमेरिकेतले पहिले चित्रपट निर्माता बनले. बुरख्याच्या पलिकडे  Beyond the Veil was a photoplay हा चित्रपट सेन फ्रान्सिस्कोच्या टिव्हॉली थेटरमध्ये दाखवण्यात आला. या चित्रपटाची आजच्या काळात गरज असल्याचं सांगितलं जातं कारण मोजुमदारानी भविष्याच्या दिशेने हा चित्रपट बनवला होता.

पुढे ते शिकवणीतून लोकांना संस्कृत श्लोक आणि त्याचं महत्व पटवून देत राहिले. त्यांच्या नावाने जेव्हा इंटरनेटवर पुस्तक प्रकाशित झाली तेव्हा लोकांना त्यांच्याबद्दल अधिक कळत गेलं. सर्वच धार्मिक ग्रंथ आणि त्याचं सार ते सांगत असायचे. परदेशातल्या मोठमोठ्या सभागृहांमध्ये त्यांचे व्याख्यानं होत असायचे. लोकांची तोबा गर्दी त्यांचे विचार ऐकण्यासाठी होत असायची. 

भारतीय आणि अमेरिकन विचारवंत म्हणून ते त्याकाळी दीर्घकाळ चर्चेत राहिले होते. त्यांच्याबद्दल गाजलेलं वैशिष्ठ्य म्हणजे एक भारतीय अध्यात्मिक गुरु अमेरिकेत जाऊन पहिला फिल्ममेकर बनला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.