८० वेळा फेल झाली, आज तिने बनवलेल्या कापडाचं कौतुक इस्रोपासून जगभरात होतंय

गेल्या जवळपास २ वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलंय. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या भयंकर विध्वंसानंतर आता संक्रमितांची संख्या जरी कमी झाली असली तरी नवनवीन व्हेरियंट धडकी भरवतायेत. संक्रमण जरी कमी असले तरी आकडे समोरच येत आहेत.

पण कोरोनाच्या एन्ट्रीनंतर भीतीपोटी का असेना लोक आरोग्याच्या दृष्टीने जास्त विचार करायला लागलेत. मग तो मास्कचा वापर असेल किंवा सॅनिटायझर.  लोक सुरक्षेसाठी महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींकडे वळले आहेत. याच गोष्टीवर रिसर्च करून दीप्ती नथाला यांनी एक अश्या कापडावर संशोधन केलयं. जे ९९% अल्ट्राव्हायोलेट किरणे रोखतं, तसेच , ९५% प्रदूषण फिल्टर करण्याबरोबरच व्हायरल आणि बॅक्टेरीयाला सुद्धा मारतं. 

आता हे वाचून तुम्ही चाट पडला असाल. पण भिडू हे खरंय दिप्तीने नुकताच हे स्टार्टअप सुरु केल, ज्याला भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दिप्तीने ‘हेकोल’ म्हणजेचं हेल्दी कव्हर फॉर ऑल असं कापड विकसित केलंय, जे विषाणूंपासून संरक्षण करण्यास अत्यंत उपयुक्त आहेत. याचे परिणाम सगळ्यांनीच पाहिलेत. ज्यामुळे डीआरडीओ आणि इस्रोनेही या कापडाच्या आणि त्यापासून उत्पादन तयार करण्यास सांगितलं आहे.

दीप्ती नथाला आयआयटी मद्रासची माजी विद्यार्थिनी आहे. तिने नॅनो टेक्नोलॉगीमध्ये बीटेक सुद्धा केलंय.  पदवी मिळाल्यानंतर तिने मध्यपूर्व देश आणि अमेरिकेत १० वर्षे काम केले. २००७ ते २०१७ पर्यंत मल्टीनॅशनल्ससाठी २३ देशांत काम केले. त्यांनतर २०१८ मध्ये ती हैदराबादला आली. पण आता विदेशात इतक्या वर्ष राहिल्यानंतर तिला देशाच्या वातावरणात जुळवून घेण्यात बरीच अडचण जाणवत होती. जरी तीच शिक्षण इथेच घेतलं होत, पण तिकडच्या वातावरणाची तिला जास्त सवय झालेली.

त्यात भारतातील वाढते प्रदूषण ही मोठी गंभीर समस्या असल्याचे तिला जाणवले. म्हणजे शहरात गाडी चावलताना हवेतून जाणवणाऱ्या गरम वाफा, त्यामुळे  डोकेदुखी तसंच त्वचेचे आजार या सगळ्याच गोष्टी जाणवत होत्या. आता या सगळ्या गोष्टी तर लवकर आटोक्यात येणार नाहीत त्यामुळे यावर आपण काही तोडगा काढावा असं तिला वाटलं. ज्यावर तिने लगेच रिसर्च करायला सुरुवात केली.

रिसर्च करताना तिला समजले कि, महिला जे स्कार्फ बांधतात ते प्रदूषण किंवा व्हायरस म्हणा या गोष्टी रोखण्यास उपयोगाला येत नाही. त्यामुळे दिप्तीने त्या कपड्याला बॉडीगार्ड मॉलिक्यूल’ सोबत जोडण्याची प्रोसेस सुरु केली. तिची इच्छा होती कि, कपड्याला  नवीन नॅनो तंत्रज्ञानाशी जोडलं जावं. हे करताना ती ८० वेळा फेल झाली. आता तिच्या जागी दुसरं कोणी असत तर लगेच विषय सोडून दिला असता.

पण दिप्तीला आपल्या रिसर्चवर विश्वास होता. हे सक्सेसफुल होईलचचं हे तिला माहित होत. आणि म्हणतात ना इच्छाशक्ती पुढे भल्या भल्या गोष्टी हार मानतात तसचं काही दीप्तीसोबत सुद्धा घडलं. तिचा रिसर्च कामी आला.

२०१९ मध्ये डिब्बू सोल्युशन्स कंपनी लाँच केली. आणि ब्रँडला नाव दिल ‘हेकोल’

आता स्टार्टअप म्हंटल कि, आधी जरा लोडचं येतो, इतरांचा आपल्या कामावर विश्वास बसायला वेळ लागतो. असच दीप्तीसोबत सुद्धा झालं. तिने आपले आधी उत्पादन स्थानिक स्तरावर विकले. पण म्हणावी तशी दाद मिळाली नाही. पण नंतर जेव्हा कोरोना व्हायरसची लाट आली, तेव्हा केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाने मास्क तयार करायला सांगितले. पुढे भारतीय रेल्वे, युनायटेड नेशन्स, पर्यटन आणि खाण मंत्रालयाकडूनही ऑर्डर मिळायला लागल्या.

या कामाची दखल डीआरडीओने  सुद्धा घेतली आणि सैनिकांसाठी कपडे बनवायला सांगितले, खासकरून कारगिलसारख्या उंच ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांसाठी याचा योग्य वापर होईल. कारण त्या ठिकाणी सैनिकांना अतिनील किरणांपासून त्वचेचे आजाराचा धोका असतो.

तिच्या या नवीन संशोधनाचे सगळ्या जगभरात कौतुक होत आहे. जवळपास २३ देशात दीप्तीने हे काम पोहोचवलयं.

तिच्या या उत्पादनात टोपी, मास्क, अॅप्रोन ,बॅग, चावीचे किचन, स्लीपिंग बॅग, विमान, बस आणि  गाड्यांच्या सीटचे कव्हर, कमरेला बांधायचा पाऊच, हॉटेलमधला टेबल क्लॉथ, सलूनमधले अॅप्रोन अशा अनेक गोष्टी आहेत.  महत्वाचं म्हणजे कोणत्याही मार्केटिंग किंवा सेल्स टीमशिवाय या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणवर खप होतोय. 

असं सिद्ध झालंय कि, तिने विकसित केलेलं हेकोल कापड, सामान्य सर्दीसोबतच कोरोना आणि एच१एन१ सारख्या  व्हायरस सुद्धा प्रभावी आहे. जर्मनीच्या एच१एन१ व्हायरस इनहिबिशन टेस्टेड अॅट ब्युरो व्हेरिटासने यासाठी सर्टिफिकेट दिल आहे. एवढंच नाही तर एनएबीएल, बीटीआरए आणि नेल्सन लॅब्जने सुद्धा तिच्या संशोधनाचे कौतुक करत सर्टिकफिकेट दिल आहे.

दीप्तीच्या म्हणण्यानुसार हे हेकोल कापड व्हायरसला लांब ठेवण्यासोबत त्यांना नष्टही करतात.  नॅनो प्रॉडक्ट कपड्यासोबत एकत्रित केल्यामुळे ते ६ हजार वॉशपर्यंत टिकून राहतं. अलीकडेच तेलंगण सरकारनेही दीप्तीच्या उत्पादनांमध्ये इंटरेस्ट दाखवला असुन. जवळपास १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे समजतंय.

महत्वाचं म्हणजे रिसर्च मधून असही सिद्ध झाल्याचं बोललं जातंय कि, अल्ट्राव्हायोलेट किरणे, प्रदूषण आणि व्हायरसवर एकाच वेळी काम करणारे हे जगातील पहिले प्रॉडक्ट आहे.  दिप्तीला आपल्या या रिसर्चसाठी अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेत.

वर्षभरातच या व्यवसायाने दिप्तीला करोडो रुपयांची कमाई करून दिलीये. तिने बनवलेल्या कपड्यांनी आरोग्याच्या आव्हानांना मोठ्या प्रमाणात कमी केलयं .

 

English Summary: While researching, she realized that the scarves that women wear are not used to prevent pollution or viruses. So deepthi nathala started the process of attaching the garment to the bodyguard molecule. She wanted the clothes to be integrated with the new nanotechnology. In doing so, she failed 80 times

 

WebTitle: deepthi nathala hecolo cloth fight  against the virus

Leave A Reply

Your email address will not be published.