बॉयकॉटच्या ट्रेण्डमध्ये असा सिनेमा येतोय ज्याला ठरवून पण बॉयकॉट करता येणार नाही..

लाल सिंग चढ्ढा पडला. आमिर खानचा सिनेमे सहज दोन अडीचशे कोटींचा टप्पा पार करायचे. दंगल सारखा सिनेमा भारतात तर हिट झालाच होता पण त्याने चीन मध्ये देखील हजार कोटींचा व्यवसाय केला होता. दंगल, पीके, ३ इडिएट्स असे सुपरहिट सिनेमा म्हणजे आमिर खान. अगदी ठग्स ऑफ हिंदूस्थान सारख्या सिनेमाने देखील दिडशे कोटींचा टप्पा ओलांडलेला.

पण लाल सिंगला चढ्ढाला बॉयकॉटचा शाप लागला. लालसिंग नंतर शाहरूखाच्या पठाणला बॉयकॉट करण्याच्या तयारी सोशलमिडीया असल्याच्या बातम्या ऐवू लागल्या. एकंदरित एकमागून एक बॉलिवूडचे सिनेमे बॉयकॉट करण्याचा ट्रेण्ड येवू लागला आहे. यातून ब्रम्हास्त्र देखील सुटणार नाही अस एकंदरित सोशल मिडीयाचा ट्रेण्ड पाहून दिसतय.. 

पण बॉलिवूडच्या सिनेमांना बॉयकॉट करण्याच्या या ट्रेण्डमध्ये अशा एका सिनेमाचा टिझर आलाय.

या सिनेमाचं नाव आहे पिप्पा.. 15 ऑगस्टला सिनेमाचा ट्रेलर आला आहे, अन् लोकांनी बऱ्यापैकी या सिनेमाचं कौतुक केलय. कारण आहे ते म्हणजे सिनेमाचा विषय..

सिनेमचा विषय भारत पाकिस्तान युद्ध आणि बांग्लादेश निर्मीती हा आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत इशान खट्टर, मृणाल ठाकूर असणार आहेत. पण बांग्लादेश निर्मिती याहून अधिक म्हणजे या युद्धापूर्वी काहि दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगावर सिनेमा आधारित आहे.

३ डिसेंबर १९७१ ते १६ डिसेंबर १९७१ असे १३ दिवस भारत पाकिस्तानचं युद्ध झालं.

त्या युद्धात भारत विजयी झाला आणि स्वतंत्र बांग्लादेशाची निर्मिती झाली. परंतु भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात व्हायच्या आधीच २०-२१ नोव्हेंबर रोजी भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये एक दिवसीय युद्ध झालं होतं.

ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता हे या युद्धात सहभागी झाले होते. त्यांनी या युद्धावर आधारित ‘द बर्निंग चाफेस’ हे पुस्तक लिहिलंय. पिप्पा सिनेमा याच पुस्तकातील कथेवर सिनेमा आधारित आहे. पुस्तकाचे लेखक ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांचे पात्र ईशान खट्टर साकारत आहे. 

सिनेमाचं नाव ‘पिप्पा’ ऐकून जरा गंम्मत वाटली असेल मात्र पिप्पा हे पिंपाचं नाव नसून रणगाड्याचं नाव आहे.

‘पिप्पा’ हे पीटी-७६ पलावुसियन टॅंक या रशियन रणगाड्याचं कोडवर्ड आहे. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धांनंतर भारताने हे रणगाडे रशियाकडून खरेदी केले होते. आधी भारतीय सैन्यात फारसे रणगाडे नव्हते त्यामुळे सैन्याच्या अनेक तुकड्यांना रणगाड्यांचा वापर कसा करायचा हे माहित नव्हतं.

जेव्हा हे रशियन रणगाडे भारतीय सैन्याकडे आले तेव्हा सैन्याच्या ४५ कॅलीवरी या सैन्य तुकडीला हे रणगाडे देण्यात आले होते. रणगाड्याचा सराव नसलेल्या तुकडीसाठी याचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. 

पीटी-७६ रणगाडे हे जमिनीवर युद्ध करण्याबरोबरच नदीमधील पाण्यात सुद्धा युद्ध करण्यासाठी तयार करण्यात आले होते. त्यामुळे सरावादरम्यान रणगाड्याला पाण्यात उतरवण्यात आलं. जेव्हा रणगाडा पाण्यात उतरला तेव्हा तो खाली पिंपासारखा तरंगायला लागला होता. ते बघून सैनिकांनी गंमत केली, ‘ये तो पिप्पा तैर रहा है.’ या घटनेननंतर या रणगाड्याला ‘पिप्पा’ हेच कोडवर्ड देण्यात आलं.

या कथेची सुरुवात होते मुक्ती वाहिनीपासून.

पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानकडून अन्याय होत होता. त्यासाठी पूर्व पाकिस्तानातील बंगाली भाषिक लोकांनी स्वतंत्र बांग्लादेशाची मागणी सुरु केली. बांग्लादेश मागणी करून मिळणारे नव्हते त्यासाठी स्थानिक लोकांनी सशस्त्र क्रांतिकारी सेना उभारली. त्या क्रांतिकारी सेनेचं नाव होतं मुक्ती वाहिनी. त्या मुक्ती वहिनीला भारतीय सरकार आणि सैन्याकडून मदत मिळत होती.  

२६ मार्च १९७१ ला मुक्ती वाहिनी आणि बांग्लादेशी लोकांनी बांग्लादेशाला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं होतं. परंतु पाकिस्तानने बांग्लादेशाचे स्वातंत्र्य मान्य केले नव्हते. पाकिस्तानी सैनिक आणि मुक्ती वाहिनीमध्ये युद्ध होत होते.

अशातच बांग्लादेशाच्या गरिबपूर मध्ये मुक्ती वाहिनीचे क्रांतिकारक असल्याची माहिती पाकिस्तानी सैनिकांनी मिळाली. 

मुक्ती वाहिनीच्या विरोधात पाकिस्तानी सैनिक युद्ध लढत होते तेव्हा भारतीय सैनिक मुक्ती वाहिनीला मदत करत होते. गरीबापूर येथे लपलेल्या मुक्ती वाहिनीच्या सैनिकांवर हल्ला करण्याची योजना पाकिस्तानने आर्मीने आखली होती.

परंतु त्याआधी भारतीय सैनिकांनीच आपले पीटी-७६ रणगाडे पाकिस्तानात घुसवले. 

२० नोव्हेंबर १९७१ मध्ये बांग्लादेशाची राजधानी असलेल्या ढाक्का पासून जवळ असलेल्या गरिबपूरमध्ये भारतीय सैनिकांनी आपले रणगाडे नेले. 

त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर धुकं होतं तसेच भारतीय रणगाडे नद्यांच्या पाण्यातून प्रवास करू शकत होते. त्यामुळे अगदी चपखलपणे भारतीय सैन्याने आपले रणगाडे गरिबपूरला नेले.

पाकिस्तानी सैन्याकडे एम-२४ हे आधुनिक अमेरिकन रणगाडे होते तर भारतीय सैनिकांकडे पीटी-७६ रणगाडे होते. पाकिस्तानी सैनिक हल्ला करणार तोच भारतीय सैन्याने आपल्या पीटी-७६ रणगाड्याच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. 

भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या १४ पंजाबी बटालियनने पीटी-७६ रांगड्यांमधून बॉम्बचा वर्षाव केला आणि पाकिस्तानचे ८ एम-२४ रणगाडे उध्वस्त केले आणि ३ एम-२४ रणगाडे आपल्या ताब्यात घेतले. त्यात भारताचे सुद्धा २ टॅंक उध्वस्त झाले.

मात्र बहुसंख्य रणगाडे उद्धस्त करून भारतीय सैनिकांनी या युद्धात विजय मिळवला. ‘द बर्निंग चाफेस’ पुस्तकाचे लेखक ब्रिगेडिअर बलराम सिंग मेहता हे त्या युद्धात सहभागी होते. 

त्या युद्धात लेफ्टिनंट कर्नल ती एस सिद्धू गंभीर जखमी झाले होते तर मेजर दलजित नारंग हे वीरगतीस प्राप्त झाले. युद्धानंतर मेजर दलजित नारंग यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आला. 

या युद्धामुळे भारत पाकिस्तानच्या प्रत्यक्ष युद्धाची घोषणा झाली होती. या युद्धांनंतर १४ दिवसांनी ३ डिसेंबर १९७१ मध्ये भारत पाकिस्तानच्या प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. १६ डिसेंबर १९७१ मध्ये ७१ हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं आणि हे युद्ध समाप्त झालं.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.