इंग्रजांविरोधात हर हर महादेव आणि अल्लाह-हूं-अकबरच्या घोषणा एकसाथ दुमदुमल्या होत्या

लढाया. नाव काढताच माणूस राजेमहाराजांच्या युगात जातो. तलवारी, ढाल, तोफा, सैन्य, घोडे सगळे डोळ्यासमोरून पळू लागतात. भारताने इतका लढाया बघितल्याचं आहेत! या लढायांचे किस्से आजही इतिहासकार, पुस्तकं, आपले आजी-आजोबा सांगतात. मात्र लढाईसाठी सर्वात जास्त ओळखलं जाणारं साल म्हणजे १८५७. या वर्षाच्या क्रांतीने भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला.

इतकंच नाही तर शेकडो वर्ष हिंदू-मुस्लिम अशा धर्मिक मुद्द्यांवर लढणारा देश त्यावर्षी पहिल्यांदाच ‘एक देश’ म्हणून उभा राहिला. ब्रिटिशांच्या विरुद्ध हे युद्ध होतं. देशातील काही राजा इंग्रजांना भिऊन स्वतःच्या लोकांविरुद्ध जेव्हा उभे राहिले तेव्हा सैनिकांव्यतिरिक्त, व्यापारी, शेतकरी आणि अगदी भिक्षूंनीही युद्ध केलं होतं. तर त्यांच्याशी लढताना पुष्कळ मरण पावले.

असे अजूनही किस्से आहेत या १८५७ च्या युद्धाबाबतीत…

युद्ध, राजकारण अशा गोष्टींपासून नेहमीच भारतीय लोक जरा चार हात लांब राहतात, असं बोललं जातं. कारण भावनिक लोक इथे राहत असल्याने सामंजस्याने वागणूक करण्याकडे जास्त कल असतो. मात्र याच भावनांशी कुणी खेळून जर छळ, अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर कुणी शांत बसत नाही. हेच कारण होतं की या लढाईत सर्वसामान्य देखील लढला होता.

समोरून लढणारे राजे वेगवेगळ्या स्वभावाचे आणि पार्श्वभूमीचे होते. ‘शायर’ बादशाह बहादूर शाह जफर यांना लढाईचं नेतृत्व देण्यात आलं होतं. पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र नानासाहेब, ८० वर्षांचे कुंवर सिंग, तात्या टोपे आणि बख्त खान हे देखील वेगवेगळ्या ठिकाणावरून सैन्य तुकड्यांचं मार्गदर्शन करत होते. मात्र यातील लढाईच वैशिष्ट्य म्हणजे जितक्या महिला रणरागिणी या युद्धात लढल्या तितक्या कधीच लढल्या नव्हत्या.

राणी लक्ष्मीबाई पाठीवर बाळ बांधून शौर्याने लढल्या होत्या, हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र याव्यतिरिक्त बेगम हजरत महल, राणी ईश्वरी देवी, तुळशीपूरची राणी या सर्वांनी सुद्धा भयंकर युद्ध केलं. धर्म भिन्न पण लक्ष्य एक होतं. कोणत्याही देशाच्या इतिहासात इतक्या राण्या लढण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यात इंग्रजांवर भारी पडल्या त्या राणी लक्ष्मीबाई. त्यांच्या साहसाने आणि युद्ध कौशल्याने इंग्रजही अवाक झाले होते.

सगळं प्लॅनिंगनुसार जाणार होतं मात्र लढाई अवेळी सुरु झाली होती. मंगल पांडे यांनी एका अधिकाऱ्याची काडतुसातील चरबीच्या नावाखाली हत्या केली होती. इथूनच सैनिकांनी उठाव केला होता. जिथे काही स्वकीयांनी इंग्रजांकडून लढाई लढली तिथेच एक महत्वाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे – काही ब्रिटिश भारताच्या बाजूने लढले. अनेक अँग्लो-इंडियन सैनिकही लढले. पण सर्व लोक मारले गेले. 

लढाई सुरु झाली होती मात्र एकमेकांपर्यंत योजना कळवणं गरजेचं होतं. त्यातही इंग्रजांना याची भनकही लागणार नाही याची काळजी घ्यायची होती. अशात अनेक वेगवेगळे उपाय वापरण्यात येऊ लागले. तेव्हा एक पर्याय जो मोठ्या प्रमाणात वापरला गेला असं म्हणतात तो म्हणजे, चपातीचा, रोटीचा. कारण हा एक असा मार्ग होता ज्याने इंग्रजांना लवकर संशय येणं अश्यक्य होतं.

एक रोटी कोणाकडे तरी पोहचवली जायची. त्यावर सगळा प्लॅन असायचा. संबंधित वयातील संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं जायचं. मग तो अशा अनेक रोट्या करून सर्वांपर्यंत पोहोच करत असे.  गुपचूप काम होत असल्याच्या या घटनेचा संदर्भ गिल्बर्ट हुडो या ब्रिटीश डॉक्टरने आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात सापडतो.

या घटनेची सगळ्यात खास गोष्ट जी आजच्या परिस्थितीसाठी अतिशय आदर्श ठरते, ती म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र लढले. ‘हर हर महादेव’ तर गुंजत होतंच मात्र सोबतंच ‘अल्लाह-हो-अकबर’च्या घोषणांनी सगळा देश दुमदुमला. याच एकतेला इंग्रज घाबरले मात्र मोठं सैन्य आणि आधुनिक लढाऊ अवजारांच्या जोरावर लढाई जिकंले.

इंग्रजांनी या एकीची इतकी धास्ती घेतली होती की, त्यांनी ‘फोडा व राज्य करा’ ही रणनीती भारतात जोरदार अवलंबायला सुरुवात केली. सुरुवात तेव्हा झाली जेव्हा लढाई संपल्यानंतर इंग्रजांनी मोठा धमाका फोडला. दिल्लीत पकडलेल्या हिंदू सैनिकांना सोडण्यात आले. तर दुसरीकडे दिल्लीत एकाच दिवशी जवळपास २२ हजार मुस्लिम सैनिकांना फाशी देण्यात आली, असं सांगण्यात येतं. 

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी मुद्दाम हिंदूंना सरकारी नोकऱ्या आणि उच्च पदे दिली गेली. तर मुस्लिमांना दूर ठेवण्यात आलं. याने त्यांच्यामध्ये हिंदूंविषयी असंतोष निर्माण झाला. तर २० वर्षांनी हेच धोरण बरोबर उलटं केल्या गेलं. धार्मिक मुद्यावरून तंटे तेव्हापासून सुरू झाले. 

सोबतंच असंही म्हटल्या जातं की, लढाई संपल्यानंतर सुमारे दहा लाख भारतीय मारले गेले. दहा वर्षे हे काम छुप्या पद्धतीने केलं जात होतं. एका संपूर्ण पिढीला उभं राहण्यापासून रोखलं गेलं होतं. अशा या १८५७ च्या लढाईकडे भारतीय इतिहासातील रक्तरंजित क्रांती म्हणून बघितल्या जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.