‘लौंडेबाज-ए-हिंद’ ही भारतातील पहिली गे चळवळ होती.

प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. आत्ता जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी अस सांगत आज सुप्रीम कोर्टाने एतिहासिक निर्णय दिला. आज समलिंगी संबध गुन्हा नाही अस सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठाने एकमताने मंजूर केलं.

निश्चितच समाजातील प्रत्येक घटक आज या निर्णयाचं स्वागत करेल कारण प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मानवी भावना आणि सहमती असेल तर त्या गोष्टींला अनैसर्गिक ठरवण्याचा कायदा नष्ट झाला.

LGBT अर्थात लेस्बियन, गे, बायसेक्सयुल आणि ट्रान्सजेंडर या घटकांना अभिमानाने जगता येईल. तर याच ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सांगतोय ” जेव्हा मुंबई शहर जगभरात गे कॅपिटल म्हणून ओळखलं जायचं”.

जेव्हा मुंबई हे शहर जगभरात ‘गे कॅपिटल’  म्हणून ओळखलं जायचं.

साधारणतः ७० च्या दशकातला कालावधी. मुंबईची ओळख जगभरातील समलैंगिक लोकांसाठी नंदनवन अशी झाली होती. जगभरातील समलैंगिक लोक, त्यातही प्रामुख्याने ‘गे’ लोक मुंबईत येत असत. इंग्लंडच्या लंडन शहरातील ‘गे न्यूज’ आणि अमेरिकेतील ‘एडवोकेट’मध्ये मुंबईतील गे लोकांच्या संदर्भातील बातम्या मोठ्या प्रमाणात छापल्या जात असत.

जगभरातील ‘गे’ लोक किती मोठ्या प्रमाणात सेक्ससाठी मुंबईत दाखल होत, याचा अंदाज आपल्याला यावरून लावता येईल की जगभरातून मुंबईत दाखल होणाऱ्या ‘गे’ लोकांना आकर्षित करण्यासाठी लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या ‘गे न्यूज’मध्ये राजस्थान पर्यटनाच्या जाहिराती छापून येत असत.

अर्थात त्यावेळी देखील भारतात कलम ३७७ अन्वये समलैंगिक संबंधांवर बंदी होतीच.

समलैंगिक म्हणून आपली ओळख सांगणं आज त्या तुलनेत कितीतरी सोपं असलं तरी त्या काळात मात्र या समुदायातील लोकांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत असे. शिवाय पोलिसांकडून तसेच संस्कृती रक्षणाचे झेंडे खांद्यावर घेतलेल्या संघटनातील कार्यकर्त्यांकडून लैंगिक शोषण आणि शारीरिक हिंसेच्या प्रकरणांना देखील सामोरे जावे लागत असे. याच विरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी साधारणतः ४० वर्षांपूर्वी मुंबईतच ३० समलैंगिक लोकांनी मिळून एका संघटनेची स्थापना केली होती.

संघटनेचं नांव होतं ‘लौंडेबाज-ए-हिंद’.

गे समूहाच्या हक्कासाठी लढण्यासाठी त्यांना एकत्रित येण्यासाठी मिळालेलं हे पहिलंच व्यासपीठ होतं.

१९७७ सालीच ऑनलुकर नावाच्या नियतकालिकात या संघटनेचा एका सदस्याची मुलाखत छापून आली होती. ज्या मुलाखतीत त्याने समलैंगिक लोकांच्या प्रश्नाविषयी अतिशय रोखठोक भूमिका मांडली होती. त्याच्या मते १९७७ साली देशातील समलिंगीकांची संख्या १ कोटींपेक्षा अधिक होती, आणि लोकसंख्येच्या इतक्या मोठ्या समूहाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येतं होतं.

आज ‘लौंडेबाज-ए-हिंद’चं अस्तित्व कुठेच नाही. परंतु ज्यावेळी समलैंगिकता व्यवहारात तर मोठ्या प्रमाणात होती परंतु त्याविषयी बोलणं देखील पाप मानलं जायचं, अशा परिस्थितीत ही संघटना गे समुदायाचा आवाज बनली होती. त्या काळात हे मोठच धाडस होतं.

हे ही वाचा –  

 

1 Comment
  1. Sugi says

    Sudu

Leave A Reply

Your email address will not be published.