रघूराम राजन म्हणतायत भारताची अर्थव्यस्था सुधारायला या ‘डार्क स्टेन्स’वर काम करावंच लागेल

नवीन वर्षाचा पहिला महिना आता संपायला आलाय आणि आता नवीन प्रथेनुसार देशाच्या बजेटची तारीख पण जवळ आलेय. सालाबादप्रमाणे याही वर्षी भारताच्या अर्थमंत्री संसदेत देशाचं बजेट सादर करतील. आता बजेटच्या बाबतीत काही अर्थतज्ज्ञ अर्थमंत्र्यांना आपले सजेशन देतात तर काही मीडियाच्या माध्यमातून बजेटबाबतीतल्या आपल्या अपेक्षा कळवतात. आता असेच सजेशन आलेत आपले मत न डगमगता मांडणाऱ्या रघुराम राजन यांच्याकडून. भारताच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या रघुराम राजन यांच्या प्रतिक्रियांना अर्थजगतात खूप महत्व असतं. त्यामुळं त्यांनी केलेल्या सूचना तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न.

तर रघुराम राजन म्हणतायत भारताच्या अर्थव्यस्थेत जसे काही ब्राईट स्पॉट्स आहेत म्हणजे अश्या गोष्टी ज्यामुळं अर्थव्यस्थेची भरभराट होऊ शकते त्याचवेळी काही डार्क स्पॉट्स देखील आहेत जे अर्थव्यस्थेच्या वाढीला खीळ घालू शकतात. 

भारतातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची चांगली स्थिती, IT क्षेत्राची चालू असलेली भरभराट, स्टार्ट-अपची वाढती संख्या हे भारताच्या अर्थव्यस्थेतील ब्राइट स्पॉट असल्याचं राजन यांनी म्हटलं आहे. 

मात्र त्याच बरोबर अर्थव्यवस्तथेवरील डार्क स्टेन्स म्हणजेच काळ्या धब्ब्यांवर काम करणं गरजेचं आहे असं मत राजन यांनी नोंदवलं आहे. त्यात त्यांनी खालील मुद्यांचा समावेश आहे.

K-शेप रिकव्हरी – K-शेप रिकव्हरी म्हणजे अर्थव्यवस्थेची वाढ कशी असेल हे सांगणारा आलेख. जेव्हा अर्थव्यवस्थेचा आलेख K आकाराचा असतो याचा अर्थ काही सेक्टरची चांगली वाढ होतेय तर काही सेक्टरवची वाढच होत नाहीये किंवा खुंटलेय असा असतोय. अशा वाढीमुळे आर्थिक असमानता वाढण्याचा धोका असतो. 

सोप्या भाषेत सांगायचे तर IT वाल्यांचे पगार वाढतयात मात्र दुसऱ्या साईडला लोकडाऊनमुळं रस्त्यावर हातगाड्या चालवणाऱ्यांचं उत्पन्न घटलंय आणि मग यामुळं दोघांच्यात आर्थिक विषमताच निर्माण होते . हा K-शेप रिकव्हरीचाच परिणाम आहे. रघुराम राजन यांनी यावरच सरकारचं लक्ष वेधलंय.

बेरोजगारी आणि कमी होणारी खरेदी क्षमता– देशातील वाढती बेरोजगारी हा चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर लोकांच्या हातात कमी पैसे पडत असल्याने त्याचा विशेषतः मध्यम आणि गरीब वर्गाच्या खरेदी क्षमतेवर फरक पडत आहे. याचा लहान मुलांच्या शिक्षणावर आणि पोषणावर दूरगामी परिणाम होता असल्याचं राजन म्हणतायत.

लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग –  लघु सूक्ष्म आणि माध्यम उद्योग यांचा ‘ड्वार्फ सिंड्रोम’ अजूनही चालू असल्याचं अर्थ तज्ञांनी म्हटलं होतं.  ड्वार्फ सिंड्रोम म्हणजे एक विशिष्ट उंचीपर्यंतच होणारी लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांची वाढ. रघुराम राजन यांनाही लघु सूक्ष्म आणि मध्यम उदयोगांवर असलेल्या आर्थिक ताणावर लक्ष वेधले आहे.

महागाई – महागाईवर म्हणाले की, आज महागाई हा जगातील सर्व देशांसाठी चिंतेचा विषय आहे. भारतही त्याला अपवाद असू शकत नाही असं रघुराम राजन म्हणालेत.

जिथे गरज आहे तिथे खर्च करणे – राजन म्हणाले की, महामारीचा सामना होईपर्यंत भारताची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. यामुळेच अर्थमंत्र्यांना आता मोकळ्या हाताने खर्च करता येणार नाही. जिथे गरज आहे तिथे सरकारने खर्च करावा. परंतु, वित्तीय तूट फार वाढू नये म्हणून आपण काळजीपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारीचं बजेट आणि त्यांनतर येणाऱ्या ५ राज्यातील निवडणुका यामुळं सरकार ‘लोकप्रिय’ घोषणा करू शकतंय त्यामुळं रघुराम राजन यांची ही सूचना महत्वाची ठरू शकतेय असं जाणकार सांगतायत.

केंद्रीय अर्थसंकल्पा काढून असलेल्या आपल्या अपेक्षा यावर आपलं मत नोंदवताना रघुराम राजन म्हणतात की,

अर्थसंकल्प हे एक व्हिजन असलेलं  डॉक्युमेंट असावं .

त्यामुळं बजेटमध्ये सरकारचा भारतासाठी पुढील पाच-दहा वर्षांचा दृष्टीकोन आणि त्यासाठी सरकार कोणत्या प्रकारच्या संस्था आणि फ्रेमवर्कसाठी योजना बनवू इच्छित आहे हे पाहण्यास मला आवडेल.

आता रघुराम राजन यांच्या किती सूचना सरकार विचारात घेतं हे १ फेब्रुवारीच्या बजेटमध्येच कळेल. बाकी तुम्हाला बजेटबद्दल काही प्रश्न असतील किंवा त्या क्लीष्ट संज्ञा काळात नसतील तर त्या खाली कमेंट करून सांगा म्हणजे बोल भिडू लगेच तुम्हाला त्या विस्कटून सांगेन.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

   

Leave A Reply

Your email address will not be published.