भारताच्या HAL न बनवलंय पहिलं वहिलं सिव्हिल एअरक्राफ्ट!

आपल्या देशात आजवर कधीच सिव्हिल एअरक्राफ्ट बनलं नाही. तस म्हणायला गेलं तर ते बनलं होत पण त्याचा प्रयोग फसला होता. १४ सीटर असलेल सारस एअरक्राफ्ट होत ते. पण २००९ मध्ये हा प्रोजेक्ट गुंडाळण्यात आला. पण हल्लीच HAL १९ सीटर हिंदुस्तान – २२८ ची निर्मिती करून देशाच्या ‘उडे देश का आम नागरीक’ मिशनला हातभार लावला आहे.

थोडक्यात काय तर, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL ने देशाला अभिमान वाटेल अशी मोठी कामगिरी केली आहे. हिंदुस्थान – २२८ (VT-KNR) विमानांचे ग्राउंड रन आणि लो स्पीड टॅक्सी ट्रायल (LSTT) यशस्वीरित्या पार पाडले आहे. हे भारतात तयार केलेले स्वदेशी नागरी विमान आहे.

पण हे सिव्हिल एअरक्राफ्ट नक्की काय आहे ?

आधी हे एअरक्राफ्ट कस आहे हे वाचायच्या आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की, आजवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL ने कधीही लोकांसाठी वापरात येतील अशाप्रकारचे एअरक्राफ्ट बनवलेले नाही. आणि तरी हि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला.

हे जे १९ सीटर हिंदुस्तान – २२८ आहे ते तयार करणं हा भारतातला पहिला वहिला मोठा प्रयोग आहे. खरं तर छोट्या विमानांना UDAN (उडे देश का आम नागरीक) योजनेचा एक आवश्यक घटक मानले जात. प्रादेशिक पातळीवरील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला. याबाबत बोलताना नागरी उड्डाण केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की,

UDAN योजनेअंतर्गत १००० नवीन हवाई मार्ग आणि १०० नवीन विमानतळांची स्थापना करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. हिंदुस्थान -२२८ विमान संरक्षण दलांनी वापरलेल्या जर्मन डॉर्नियर २२८ संरक्षण वाहतूक विमानाच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे.

पण हे एअरक्राफ्ट लगेचच तयार झालं नाही.

हे तयार झालं होत फेब्रुवारी २०२० मध्येच. त्यावेळी HAL ने हे विमान लखनौच्या DefExpo मध्ये प्रदर्शनासाठी लावलं होत. त्याच्या ट्रायलसुद्धा झाल्या होत्या. पण जर या एअरक्राफ्टला आंतरराष्ट्रीय बाजारात तग धरायचा असेल तर DGCA कडून HAL हिंदुस्थान -२२८ मध्ये काही सुधारणा करण्यास सांगण्यात आल्या.

यात Do-228 चे वजन ६२०० किलो होते. कमर्शियल पायलट परवान्यांचा विचार करता या श्रेणी अंतर्गत परिवहन विमान उड्डाण करण्यासाठी HAL ला विमानाचे वजन ५७०० किलो पेक्षा कमी करावे लागेल.

HAL ने या एअरक्राफ्ट मध्ये त्याप्रमाणे बदल ही केला. 

हे एअरक्राफ्ट बनवून तर झालं पण हे वापरायचं कशासाठी ?

हे १९ आसनी एअरक्राफ्ट अनेक गोष्टींसाठी वापरता येईल. त्याच्या मदतीने प्रवासी वाहतूक, हवाई रुग्णवाहिका, उड्डाण तपासणी, क्लाउड सीडिंग इत्यादी कामे करता येतात. याशिवाय, हे पॅरा जंपिंग, हवाई देखरेख, फोटोग्राफी आणि कार्गो ऍप्लिकेशनसाठी देखील उपयुक्त ठरेल.

एचएएलच्या अधिकाऱ्यांच्या मते,

संस्थेच्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट डिव्हिजन (टीएडी) ने देशातील पहिल्या फिक्स्ड विंग सिव्हिल एअरक्राफ्टची चाचणी सुरू केली. या हलक्या एअरक्राफ्टची बांधणी केंद्र सरकारच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत ‘उडान’ अंतर्गत सुरू करण्यात आली.

भविष्यात त्याचा उपयोग हवाई देखरेख, एअर ऍम्ब्युलन्स सारख्या कामांमध्ये केला जाऊ शकतो, जो स्थानिक पातळीवर आज ही शक्य नव्हता.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सजल प्रकाश यांच्या मते,

हिंदुस्थान -२२८ चे टाइम सर्टिफिकेशन देशासाठी ऐतिहासिक आहे. DGCA ने या एअरक्राफ्ट  टाईप सर्टिफिकेट दिले आहे. याच्या सहाय्याने आता या एअरक्राफ्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित असल्याची मान्यता मिळेल.

भारतामध्ये बऱ्याच समस्या या महामार्गामुळे निर्माण होतात. जस की, एअर ऍम्ब्युलन्स हा आरोग्य क्षेत्राला भेडसावणारा प्रश्न होता. सर्वसामान्य व्यक्तीला कधी एअर ऍम्ब्युलन्सची गरज भासलीच तर पैशांची अडचण हा मोठा मुद्दा होता. पण केंद्र सरकारच्या UDAN या महत्वकांक्षी योजनेने बऱ्याच समस्या सोडवल्या जातील हे प्रथमदर्शनी तरी दिसते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.