भारतात पहिल्यांदा कॅश ऑन डिलिव्हरीचा ट्रेंड सुरु झाला…

फ्लिपकार्ट हि कंपनी आज घडीला किती महत्वाची आहे हे शहरी लोकांना नाहीच तर ग्रामीण लोकांनाही माहित आहे. भारतातली इ- कॉमर्स कंपनी म्हणून फ्लिपकार्टला ओळखलं जातं.

भारतात पहिल्यांदा कॅश ऑन डिलिव्हरीचा ट्रेंड हा फ्लिपकार्टने सुरु केला.

पण फ्लिपकार्टने सहजासहजी हे यश मिळवलेलं नाही त्यामागे दोन मित्रांची कठोर मेहनत आहे, आज आपण फ्लिपकार्ट कशी सुरु झाली आणि इतकी यशस्वी कशी ठरली याबद्दल जाणून घेऊया.

२००७ मध्ये सचिन बंसल आणि बन्नी बंसल या दोघांनी फ्लिपकार्ट कंपनी सुरु केली. हे दोघेही अमेझॉन कंपनीत एकत्र काम करत होते. अमेझॉन हि सगळ्यात मोठी कंपनी होती. काम करत असताना त्यांच्या डोक्यात सुरूच होतं कि आपली एखादी ए-कॉमर्स कंपनी असायला हवी. दोघांचं जेव्हा एकमत झालं तेव्हा त्यांनी अमेझॉन कंपनीला रामराम ठोकला. त्याकाळात एवढी चांगली नोकरी सोडणं मूर्खपणाच लक्षण मानलं गेलं पण दोघांनी पक्का निर्धार केला होता.

५ सप्टेंबर २००७ साली सोवनी आपली फ्लिपकार्ट नावाची इ-कॉमर्स कंपनी सुरु केली. फ्लिपकार्ट जेव्हा भारतात सुरु केली गेली तेव्हा भारतात इ-कॅमेऱस कंपन्या ह्या आधीच घाट्यात चालल्या होत्या आणि त्याकडे सहसा कोणी वळत नव्हतं. कारण आपल्या भारतीय लोकांना सगळ्या गोष्टी स्वतः निरीक्षण केलेल्या , वारंटी गॅरंटी असलेल्या हव्या असतात. त्यामुळे कंपनी बुडते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 

त्यावेळी यावर उपाय म्हणून सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी कॅश व डिलिव्हरी नावाची आयडिया केली. याआधी ऑनलाईन पेमेंट डेबिट क्रेडिट कार्डद्वारे केलं जायचं पण लोकांचा त्यावर भरोसा नव्हता. या कंपनीने सगळ्यात आधी पुस्तकं विकायला सुरु केलं. सुरवातीला बिन्नी आणि सचिन बन्सल हे दोघेही स्कुटरवरून पुस्तकं विकायचे आणि कंपनीच्या नावाचे पॅम्प्लेट वाटायचे.

फ्लिपकार्टने कात टाकायला सुरवात केली होती. याचं कारण होतं लोकांचा विश्वास. चांगल्या प्रतीचे प्रोडक्ट आणि थेट माल घरपोच येणे आणि तिथेच पेमेंट करणे हे लोकांमध्ये लोकप्रिय होत गेलं. २००९ पर्यंत ४० मिलियनची उलाढाल फ्लिपकार्टने केली होती. डिलिव्हरी कंपनी म्हणून फ्लिपकार्टने आपली ओळख बनवली. 

भारतात इ- कॉमर्स कंपन्यांमध्ये फ्लिपकार्ट इतकं यशस्वी कोणीही नव्हतं. त्यामुळे इन्व्हेस्टर लोकांची फ्लिपकार्टकडे वारी सुरू झाली. फ्लिपकार्टने संधीचा फायदा घेत व्यापार आणि ओळखी वाढवल्या. २०१४ मध्ये फ्लिपकार्टने MYNTRA आणि इतर ऑनलाईन शॉपिंग असणाऱ्या वेबसाईट खरेदी केल्या. त्यामुळे फ्लिपकार्टने मार्केटमध्ये आपलं बस्तान बसवलं आणि भरपूर कमाई केली.

२०१५ मध्ये फोर्ब्सच्या यादीत फ्लिपकार्टला स्थान मिळालं. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल हे भारतातले ८६ वे श्रीमंत व्यक्ती बनले. ऑनलाईन शॉपिंगमध्ये अमेझॉनसारखी जबरदस्त कंपनी असूनही फ्लिपकार्टने आपला दबदबा कायम राखून ठेवला.

पुस्तकांच्या विक्रीपासून सुरु झालेली हि कंपनी पुढे घरगुती सामान, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, मोबाईल अशा अनेक वस्तूंची विक्री करू लागलं. भारताच्या आजवरच्या इतिहासात बेस्ट स्टार्ट अप प्रोजेक्ट म्हणून फ्लिपकार्टचं नाव घेतलं जातं.

फ्लिपकार्टने अनेक लोकांच्या हाताला काम दिल. आज घडीला १६ हजार लोकं फ्लिपकार्ट कंपनीत काम करतात. जागतिक पातळीवर सुद्धा फ्लिपकार्टने आपले हात आजमावून पाहिले. भारतात त्यांचं मुख्य ऑफिस बेंगळुरू आणि कर्नाटक मध्ये स्थित आहे. मार्केटिंगसाठी घरोघर जाऊन जाहिराती करणारे फ्लिपकार्ट पुढे इतक फेमस झालं कि लोकांना कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे फ्लिपकार्ट असं पक्क ध्यानात राहत. 

अमेझॉन मध्ये काम करून पुढे आपल्या मेहनतीच्या जोरावर सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी आपला स्वतःचा ब्रँड तयार केला. ज्याने बाजारपेठेत ऍमेझॉनला चांगलीच टक्कर दिली. आज घडीला २०० कोटींच्या पुढे फ्लिपकार्ट उलाढाल करत आहे. एकाच कामावर फोकस करून तो ब्रँड लोकांपर्यंत बन्सल मित्रांनी नेला. कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर आजही फ्लिपकार्ट उत्तरोत्तर प्रगती करत आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.