पेट्रोलचा खर्च वाचवायला येत आहे भारताची पहिली इलेक्ट्रिक बाईक.
भिडू लोक राडा झालाय राडा. भावांनो आत्ता पेट्रोलच टेन्शन घायचं नाही. एकदा चार्ज करायची आणि दीडशे किलोमीटर फिरून यायचं . बॅटरी संपली तरी पंपावर जायचं नाही कंपनीची गाडी तुमच्याकडे बॅटरी घेऊन येणार अणि पाचच मिनिटात बॅटरी बदलून देणार. अरे खरच..
एकेकाळी अस्सल भारताची स्वतःची मोबाईल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Micromax चे मालक राहुल शर्मा यांचीच नवीन कंपनी आहे “revolt intellicorp”. याच कंपनीने भारत आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘Revolt RV 400’ लॉंच केली आहे. जिची ताशी स्पीड ८५ की. मी. असणार आहे.
२५ जून पासून ही बाईक फक्त एक हजार रुपये भरून बुक करता येणार आहे.कंपनीचा कारखाना मनेसार हरयाणा इथे आहे. वर्षाला १,२०००० गाड्या बनवण्याची क्षमता या कारखान्याची आहे. ह्या गाडीची हेडलाईट LEDची आहे. गाडीचं स्पीड मीटर संपूर्ण डिजिटल आहे. RV 400 मध्ये artificial intelligence चा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. ज्यामुळे बॅटरीची स्थिती सर्वकाळ पाहता येते. Artificial intelligence मुळे तुमची स्पीड ,कापलेले अंतर ,लागलेला वेळ या सर्व गोष्टीची नोंद ठेवता येणार आहे .
तर भिडूनों हि गाडी चवीने चालू होणार नाही म्हणजे तिला चावीच नाही. तुम्ही तुमचा स्मार्टफोन कनेक्ट करून My Revolt App च्या मदतीने या बाईकला सुरु करू शकता. सेल्फ स्टार्टची सुविधा देखील उपलब्ध आहे
गाडीची काही ठळक वैशिष्टय़े खालील प्रमाणे.
▪ अॅपच्या मदतीने तुमची किती बॅटरी शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता. अजून आपण किती दूर जाऊ शकतो? हे कळणार आहे. यासोबतच बॅटरी लाईफ पर्संटेजमध्ये दिसणार आहे.
▪ अॅपच्या मदतीने युझर अगदी सहज बाईक ट्रॅक करू शकतो त्यामुळे गाडी कधी चोरीला जाण्याची शक्यता नाही .
▪ चार्जिंग करण्यासाठी वेग-वेगळे मोड असून यात ऑन बोर्ड किंवा पोर्टेबल चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे .
▪ इलेक्ट्रिक गाड्यांची आजवरची एक समस्या होती ती महणजे फायरिंग ची इलेक्ट्रिक गाड्यांना फायरिंग नसल्याने त्या चालवण्यास ‘फील’ येत नसे .RV 400 ला एक स्पीकर आहे ज्यातून गाडीचा आवाज येणार आहे तोही तुम्ही मोबाईल द्वारे बदलू शकता आहे का नाय गंमत? .
▪ हि बाईक AI (Artificial Intelligence) वर काम करत असल्यामुळे तुम्ही तिला व्हाईस कमांड देखील देऊ शकता .
तर भिडूनों गाडीच्या किमतीबद्दल अजून काहीच माहिती उपलब्ध नाहीये . एक मात्र खरं गाडीच्या लुक्सने मात्र युवा पिढीला भुरळ पाडली आहे. जर कंपनी सांगत असलेली सर्व सेवा देऊ शकली तर मात्र पेट्रोलचा खर्च वाचवणारी Revolt RV 400 भारतात धुमाकूळ घालणार येवढ मात्र नक्की .
हे ही वाच भिडू.
- भारतीयांच्या हातात आलेलं पहिलं रॉकेट यामाहा RX100 होतं !
- राजदूत, RD350 आणि बॉबी निर्माण गाड्या काढून त्यांनी एका पिढीवर उपकार केलं.
- बजाजची पोरं स्वतःचा गाड्यांचा कारखाना असूनही कॉलेजला बसने जातात?