देशाचा पहिला स्वातंत्र्य संग्राम ज्यात सैनिक स्वत:चा दारूगोळा पेटवून शहिद झाले

पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पानिपतची लढाई, प्लासीची लढाई इतिहासातील महत्वाच्या घटना. त्यावेळच्या सैनिकांच्या शौर्याचे सुद्धा गोडवे गायले जातायेत. पण या सगळ्यात हिंडनच्या नदीवर झालेला क्रांतिकारकांचा लढा मात्र विसरला जातोय.

गोष्ट 1857 च्या युद्धाची ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हटलं जातं, ही आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी सशस्त्र चळवळ होती. सैनिकांबरोबरचं प्रत्येक जाती धर्माचे, पिडीत शेतकरी, मजूरांची ही सशस्त्र चळवळ होती. ज्याला युरोपाचे महान विचारवंत कार्ल मार्क्स  यांनी लभांडवलशाहीविरुद्धचा लढा असं म्हंटलं.

तो काळ सगळ्या जगासाठी अशांततेचा काळ होता, युरोपीय देशांमध्ये वसाहत करण्याची स्पर्धा तर युरोपात औद्योगिक क्रांती सुरू होती.  ब्रिटीशांकडे उत्कृष्ट शस्त्र आणि दळणवळणाची साधने होती, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश सैन्याची गीनती जगातील सर्वात प्रशिक्षित सैन्यात व्हायची.

मेरठच्या कोतवालीत कोतवाल धनसिंग गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली पहिले स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले, त्यानंतर दोन दिवसांनी गाझियाबाद आणि बुलंदशहरात सुद्धा याचे पडसाद उमटले आणि पाहता पाहता दादरी  बुलंदशहरच्या  क्रांतिकारकांनी सिकंदराबाद, गाझियाबाद आणि बुलंदशहर ताब्यात घेतले.

  या क्रांतिकारकांचे नेतृत्व दादरीचे राजा राव उमराव सिंग भाटी करत होते आणि दुसरीकडे त्याचा जवळचा मित्र मलागढचा नवाब वलीदाद खान करत होता.  मुघल सम्राट बहादूर शाह जफर, जो क्रांतिकारकांनी एकमताने निवडलेला नेता होता, त्याने पश्चिम उत्तर प्रदेशची कमान नवाब वलीदाद खान आणि राजा उमराव सिंग भाटी यांच्याकडे सोपवली.

इंग्रज मेरठचा पुन्हा ताब्यात घेतील याची दाट शक्यता होती, कारण मेरठ मंडळ क्रांतिकारकांना अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू पुरवत होते. व्हायचं येते झालं, लष्करी छावणीतून ब्रिटिश जनरल बर्नार्ड यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांची मोठी फौज दिल्लीवर हल्ला करण्यासाठी निघाली, पण जनरल बर्नार्डने दिल्लीवर हल्ला करण्यापूर्वी मेरठचा ताबा घेतला.

जनरल बर्नार्डने पुढचा प्लॅन आखण्यातसाठी  दूसऱ्या ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आर्कलेड विल्सनला गाझियाबादमधील हिंडन नदी पार करून भेटण्यासाठी गुप्त संदेश पाठवला.  ही माहिती सम्राट बहादूर शाह जफरपर्यंत पोहोचली, त्याने मुघल राजपुत्र मिर्झा अबू बकर आणि नवाब वलीदाद खान यांना क्रांतिकारी राष्ट्रवादी सैन्यासह हा हल्ला थांबवण्यासाठी पाठवले.  मिर्झा अबू बकर आणि नवाब वलीदाद खान यांनी दादरीचे राजा उमराव सिंग भाटी यांच्याकडे मदत मागितली.

अशा पद्धतीने क्रांतिकारकांची राष्ट्रवादी सेना राजा उमराव सिंग भाटी यांच्या नेतृत्वाखाली हिंडनच्या काठी पोहोचली, जिथे ब्रिटिश सैन्य जनरल विल्सनसह मेरठहून येणार होते.  ब्रिटीश सैन्य नदी ओलांडू नये आणि दोन्ही ब्रिटीश सैन्याला भेटण्यापासून थांबवावे म्हणून भारतीयांनी हिंडन नदीचा पूल पाडला!

क्रांतिकारी सैन्य तेथे नदीच्या काठावरचं थांबलं होतं आणि शेवटी 30 मे 1857 रोजी ब्रिटीश सैन्य आणि क्रांतिकारक सैन्य यांच्यात मोठं युद्ध सुरू झालं.  इंग्रजांकडे तोफखाना, कुशल घोडदळ, तोफखाना, पायदळ प्रशिक्षित सैन्य अग्निशमन तोफ, दारुगोळा.

तर दुसरीकडे भारतीयांकडे होत्या फक्त मोजक्या तोफा, शेतकरी लढवय्ये, लुटलेली शस्त्रे, घोडदळ आणि पारंपारिक शस्त्रे.  उंच टेकडीवर उभे असलेले भारतीय क्रांतिकारी सैनिक इंग्रजांच्या दिशेने वळले आणि त्यांच्यावर तुटून पडले, इंग्रजी सैन्याला हे भारी पडायला लागलं.  त्यानंतर ब्रिटिश सैन्याने भारतीय सैन्याच्या डाव्या बाजूवर हल्ला केला, ज्यामुळे क्रांतिकारकांना माघार घ्यावी लागली.

पण यानंतर भारतीय सैन्याने एक रणनीती आखली, जेव्हा ब्रिटीश सैन्य तिथे पोहोचले तेव्हा काही शूर सैनिकांनी स्वतःच्या तोफगोळ्या आणि दारूगोळा पेटवला ज्यामुळे ते स्वत: शहीद झाले, परंतु त्याच वेळी अनेक ब्रिटीश सैन्य देखील जळून राख झाले. यात काही इंग्रज अधिकारी आणि सेनापती सुद्धा होते.

भारतीय सैनिकांनी ब्रिटीश सैन्यावर आपले हल्ले सुरूच ठेवले आणि इंग्रजांच्या शौर्याचा आणि श्रेष्ठत्वाचा अभिमान मातीत मिसळला, प्रचंड प्रशिक्षित ब्रिटिश सैन्याने भारतीयांच्या शूर सैन्यासमोर गुडघे टेकले आणि पळ काढला.

अशा पद्धतीने राजा उमराव सिंग आणि क्रांतिकारक सैन्याने युद्ध जिंकून केवळ विजय मिळवलाच नाही तर युरोपियन रणनीतीचाही पराभव केला.  पण भारतात या घटनेचा उल्लेख आढळत  नाही, याचं वाईट कुठेतरी वाटतं.

हे ही वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.