हिंदू राजाने बांधलेली मशिद भारतातली सर्वात जूनी आणि पहिली मशिद म्हणून ओळखली जाते.

केरळच्या त्रिचूर/त्रिशूर जिल्ह्याला केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं याच जिल्ह्यात एक अनोखा ठेवा आहे. या जिल्ह्यात भारतातील सर्वात जूनी आणि पहिली मशिद आहे. इ.स. ६२९ मध्ये ही मशिद बांधण्यात आल्याच सांगण्यात येतं. या मशिदीचं वैशिष्ट म्हणजे अरबस्थानच्या बाहेर बांधण्यात आलेली ही जगातील पहिली मशिद आहे. चेरामन जुमा मस्जिद या नावाने जनभरात ही मशिद ओळखली जाते.

देशातली ही पहिली मशिद धर्मनिरपेक्ष भारताचं प्रतिक म्हणून मानण्यात येते. या मशिदच नाव राजा चेरामन पेरूमल यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे.

राजा चेरामन पेरूमल कोण होते..?

राजा चेरामन पेरूमल हिंदू राजा होते. वास्तविक त्यांना केरलच्या लोकजीवनात ेएका देवताचं स्थान आहे. त्यांच्या नावासोबत अनेक चमत्कार जोडण्यात तर आलेच आहेत शिवाय तेच एक देव होते अशी मान्यता आहे. याच चेरामन पेरूमल यांच्याबाबत एक दंतकथा सांगितली जाते.

झालं अस होत की एक रात्र राजा चेरामन पेरूमल आपल्या राणीसोबत आपल्या राजवाड्याच्या बागेत फिरत होते. त्या रात्री राजाला चंद्राला तडे जाताना दिसले. या गोष्टीमागचा तर्क राजाला लावता आला नाही. राजा आपल्या खगोलशास्त्रज्ञांकडून या गोष्टींचा तर्क लावू लागला. याच सुमारास मुस्लीम धर्माच्या प्रचारासाठी हजरत मौहम्मद यांचे दूत केरलमध्ये आले होते. राजाला त्यांना भेटण्याचा सल्ला देण्यात आला तेव्हा राजाने या अलौकिक गोष्टीचा अर्थ त्या दूतांना विचारला. तेव्हा त्यांना मक्का येथे जावून मौम्ममद साहब यांना भेटण्याचा सल्ला देण्यात आला. त्या काळी बोटीतून राजा पेरूमल मक्केच्या दिशेने रवाना झाले.

त्यानंतर नेमकं काय झालं तर राजा मक्केच्या दिशेने गेल्यानंतर तिथे त्यांची भेट एका मुस्लीम धर्मप्रसारकासोबत झाली. त्यांनी तिथेच मुस्लीम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी स्वत:चे नाव ताजुद्दिन असे ठेवले. तिथेच जेद्दा या भागाच्या राजाच्या बहिणीसोबत त्यांचे लग्न झाले आणि ते कायमचे तिथेच राहिले.

राजा चेरामन पेरूमल यांनी आपल्या मृत्यूपुर्वी जेद्दाच्या राजाकडे केरलच्या सत्ताधाऱ्यांकडे देण्यासाठी काही पत्र दिली. या पत्रात त्यांनी केरळमध्ये मुस्लीम धर्माच्या प्रचारासाठी सहकार्य करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर अरबस्थानातून जेद्दाचे राजे केरलमधील कोडुंगलूरच्या राजाची भेट घेण्यासाठी आली व त्यांनी आपल्या भेटीत राजा चेरामन पेरूमल यांचे पत्र दाखवले.

जेद्दाच्या राजाची ही विनंती मान्य करुन त्रिशूर जिल्ह्यात सन ६२९ मध्ये मशिद बांधण्यात आली त्याचचं नाव चेरामन जुमा मशिद.

मशिद प्रबंधक समितचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद सईद यांच्या मतानुसार सध्याची मशिद ही १५ व्या शतकात नव्याने बांधण्यात आली आहे तर याच मशिदीमध्ये पुर्वीच्या मशिदीचा आराखडा ठेवण्यात आला आहे. मशिदीच्या बांधकामानंतरच्या कालखंडात अरब देशातून व्यापारी केरळला भेट देवू लागल्या त्या काळात केरळमध्ये मशिदी वाढू लागल्या व मुस्लीम धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याच सांगण्यात येत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.