७ वर्षांपूर्वी इथे साधी लाईट नव्हती, पण या जर्मन बाईंनी आज गावाला हायटेक रूप दिलंय…

गाव म्हटलं की, हिरवागार निसर्ग, टुमदार घरं, डोंगर, नद्या, असे सुंदर चित्र उभं राहत. पण यासोबतच कच्चे रस्ते, बिघडलेलं लाईटचं टाईम टेबल आणि शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने झालेली अधोगती.

असचं काहीसं चित्र ७ वर्षांपूर्वी जनवार गावाचं सूद्धा होतं. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे ४०० किमी अंतरावर पन्ना जिल्ह्यातलं हे एक छोटसं गाव. जवळपास १४०० लोकसंख्या असलेल्या या गावात ७ वर्षांपूर्वी ना रस्ता होता आणि ना वीज. बऱ्याचशा जमिनी नापीक असल्यानं शेतीचं अवस्था बिकट. त्यामुळे या गावातली मंडळी मोलमजुरी करून आपलं पोट भरायची.

मुलांसाठी अभ्यासाचं वातावरण काय साधी शाळा सुद्धा नव्हती.

पण या ७ वर्षात या जनवार गावाचं चित्र पूर्णपणे बदललयं. एकेकाळी उणाडक्या करत फिरणारी लहान पोरं सूद्धा तूम्हाला हायटेक सोसायटीच्या मुलांप्रमाणं स्केटिंग करताना दिसतील. गावात रस्ता आणि वीज तर पोहोचलीचं आहे, पण शाळेचा झालेला विकास अफलातून आहे.

मुले संगणक शिकतायेत, इंग्रजी बोलतायेत. गावकरी ऑरगॅनिक शेतीकडे वळालीतं. इथलं महिला मंडळ तर आपल्याबरोबर कुटुंबाला सुद्धा सांभाळतायेत.

जनवार गावाचं हे नशीब बदललयं ते जर्मनीच्या रहिवासी उलरिके रीनहार्ड यांच्या मेहनतीमुळे.  

उलरिके रेनहार्ड ६० वर्षीय जर्मन पब्लिशर, लेखक आणि डिजिटल नोमॅड. २०१४ मध्ये त्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील जनवार या छोट्या गावात पोहोचल्या आणि तिथलं भकास वातावरण पाहिलं. गावाचं हे दृश्य पाहून विचलित झालेल्या उलरिके यांनी या गावासाठी, इथल्या लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करायचचं ही गाठं मनाशी पक्की केली.

यानंतर ती तिच्या टीमसोबत काही दिवस गावात राहिल्या, गावातल्या लोकांशी बोलल्या, त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

उलरिके म्हणतात की, येथे कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी लोकांचा विश्वास जिंकणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. लोकांनी मुलांना शाळेत पाठवले नाही, मुलींची स्थिती तर आणखी चिंताजनक होती. त्यांची लहान वयातच लग्न व्हायची.  

यासह, सर्वात मोठी समस्या होती ती जाती-जातीचा भेदभाव. हे निर्मूलन करण्यासाठी, मी एक क्रीडा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला, कारण खेळ हे एक माध्यम आहे ज्याच्या मदतीने मुलांमधील भेदभाव दूर केला जाऊ शकतो.

उलरिके सांगतात की,

खूप नियोजन केल्यानंतर त्यांच्या मनात स्केटिंग सुरू करण्याचा विचार आला. कारण हा असा एक खेळ आहे जो मुलांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवतो.

यानंतर २०१५ साली स्केटिंग पार्कची पायाभरणी करण्यात आली. मुलांसाठी हे एक अतिशय मनोरंजक आणि अद्वितीय मॉडेल होते. ते स्केटिंग करायला येऊ लागले. मग आम्ही अशी अट घातली की, शाळेत जाणाराचं मुलगा स्केटिंग करेल. त्यानंतर मुले शाळेत जाऊ लागली. सहा महिन्यांच्या आत, जनवारमधील्या सर्व सरकारी शाळा आदिवासी मुलांनी भरल्या. शाळांना नवीन शिक्षक नियुक्त करावे लागले.

भारतातलं पहिलं ग्रामीण भगातलं स्केटिंग पार्क

जानवर स्केटपार्क ४८४३ चौरस फूट क्षेत्रात बांधले गेलेय. जिथे मुले आणि मुली बरोबरीने स्केटिंग करतात. अनेक मुलांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंगमध्ये भागही घेतलायं. काही मुलांनी स्केटिंगमध्ये मैदान मारून पुरस्कारही पटकावलेतं.

फक्त स्केटिंगमध्येचं नाही तर या ६ वर्षांत मुलांच्या शिक्षणाची पातळीत सूद्धा लक्षणीय वाढ झालीये. 

 उलरिके सांगतात की, स्केटिंगचा उद्देश मुलांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे आणि त्यांना चांगल्या जीवनासाठी प्रेरणा देणे हा होता.

मुलांबरोबरचं वयस्कर लोकांना सूद्धा आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न केले जातायेत. आज गावात संगणक प्रयोगशाळा सुविधा आहे. इंटरनेटच्या मदतीने मुले ऑनलाईन वर्गात शिकत आहेत. इंग्रजी आणि संगीताचे सूद्धा वर्ग करतायेत.

ओपन स्कूलच्या मदतीने सुमारे २० मुले यावर्षी दहावी उत्तीर्ण झाली आहेत आणि आता पुढील अभ्यासाची तयारी करतायेत.

हे फक्त गावापूरतं मर्यादित राहिलं नाही तर आता गावातील मुलं परदेशात झेंडा फडकवतायेत.

स्केटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणाऱ्या जनवारच्या २० वर्षांच्या आशा गोंड म्हणतात,

“स्केटिंगने माझे आयुष्य खूप बदलले आहे. जर उलरिके आमच्या गावात आल्या नसत्या तर माझं लहानपणीचं लग्न झालं असतं, पण आज त्यांच्या मदतीने मी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंगचे प्रतिनिधित्व केले आणि परदेशात शिकण्यासाठी गेले. मी माझ्या गावातील पहिली मुलगी आहे जी परदेशात गेली आणि परत आल्यानंतर मी गावातील मुलांना शिकवते. “

गावातला आणखी एक विद्यार्थी 16 वर्षीय अनिल कुमारने पहिल्यांदा स्केटिंग शिकलो,

अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आज लहान मुलांना स्केटिंग आणि संगणक शिकवतो. अनिलने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “काही वर्षांपूर्वी आमचे छोटेसे गाव कोणालाही माहित नव्हते, पण आज आमचे गाव स्केटिंगमुळे खूप प्रसिद्ध झाले आहे आणि मला आनंद आहे की मी माझ्या गावाच्या प्रगतीमध्ये भूमिका बजावत आहे.”

स्केटिंग करून गावातील लोकांना रोजगार मिळत आहे. या मोहिमेद्वारे उलरिके गावातील लोकांना, विशेषतः महिलांना स्वावलंबी बनवत आहे. गावातलं हे स्केटिंग पार्क पहायला मोठ्या शहरांमधून, ते अगदी परदेशातून लोकं येतायेत. 

गावात येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली, पण गावात लोकांना राहण्यासाठी जागा नव्हती. त्यांना 5-6 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पन्नाला जावं लागायचं.

उलरिके यांनी या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने येथे काही गृह मुक्काम विकसित केले. जेथे बाहेरून येणाऱ्या लोकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गावातील लोकांना रोजगार देखील मिळू लागलायं.

हे ही वाचा भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.