ती होती भारताची पहिली महिला इंजिनियर !!

भारतात इंजिनियर होणे हे सध्याचे सगळ्यात मोठे फड आहे. गल्लीबोळात इंजिनीयरिंग कॉलेजस आहेत. ढीगभर इंजिनियर तिथून बाहेर पडतात. यात मुलेमुली प्रमाण जवळपास सारखेच आहे. पण स्वातंत्र्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आधीच इंजिनियरिंग कॉलेज कमी होते, त्यातही फक्त मुलेच असायचे.

हे सगळ मोडलं एका मुलीन. तीच नाव ए. ललिता.

ती अवघी १५ वर्षांची असताना तिचा बालविवाह झालेला. सप्टेंबर १९३७ मध्ये तिने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला तेव्हा ती १८ वर्षांची होती. त्याच्या अवघ्या चार महिन्यानंतर तिच्या पतीचे निधन झाले आणि या बालवयात तिच्यावर मोठे आभाळ कोसळले. आता बाळ श्यामला एकट्या आईची एकमेव जबाबदारी होती.

विधवा झाल्यावर तिचे मुंडन करण्यात आले, जगण्यावर निर्बंध घालत तिला समाजातून हद्दपार करण्यात आले. हे सगळे तिच्यावर होत असलेले मोठे आघात होते, पण सहन करण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा कुठला उपाय नव्हता. तरी ललिता राहत असलेल्या मद्रास म्हणजे आताचे चेन्नई मध्ये सती प्रथा फारच कमी होती. या सती प्रथामध्ये विधवा स्त्रियांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करत अत्यंत दुखी जीवन जागाव लागतं.

पण ललिता धाडसी आणि पुरोगामी विचारांची होती. तिने समाजातील या सर्व जुन्या प्रथा व नियमांचे उच्चाटन करण्याच्या व सोबतच अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याच्या सुद्धा निर्णय घेतला. त्याकाळी इंजिनियरिंग हे पुरुषांचे वर्चस्व असलेले क्षेत्र होते. त्यामुळे ललिताला वाटले की या निर्णयामुळे आपण देशातील अभियंता स्त्री बनू शकू.

सात भावंडांमध्ये पाचवे अपत्य असलेल्या ललिताचा जन्म २७ ऑगस्ट १९१९ मध्ये झाला. त्यांच कुटुंब एक सामान्य मध्यमवर्गीय तेलुगु कुटुंब होत. ज्यात भाऊ इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होते तर बहिणींचे शिक्षण मुलभूत गरजेपर्यंत मर्यादित होते. त्याकाळातील प्रचलित प्रथा नुसार वयाच्या १५व्या वर्षी ललिताच्या वडिलांनी तिचा बालविवाह करून दिलेला. तिच्या वडिलांचे म्हणणे होते की, वैवाहिक जीवनामुळे तिच्या शिक्षणात कुठलेही व्यत्यत येऊ नये म्हणून तिला १०वी पर्यंतचे शिक्षण घेऊ दिले.

आपण ललिताच्या मुलीच्या जीवनप्रवासाबद्दल विचार केला नाही तर ललिताची कथा अपूर्ण आहे. तिची मुलगी श्यामला सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रेरणास्थान असलेली तिची आई, तिला लहान्याचे मोठे करताना केलेला संघर्ष, अशा आईच्या अनेक प्रेमळ आठवणी तिच्याकडे आहेत. श्यामला सांगते,

”माझे वडील वारल्यानंतर आईला तिच्या क्षमतेपेक्षा जास्त त्रास सहन करावा लागला होता. आईच्या सासूने तिचे १६वे आपत्य गमावले होते आणि त्याच्या सगळा राग तिने आईवर काढला होता. ती जणूकाही लढा देणारी यंत्रणाच होती. आज मला कळत आहे की, तेव्हा आई कोणत्या परिस्थितीतून गेली असणार. तरी सुद्धा माझी आई सामाजिक दबावांना बळी पडली नाही. तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याबळावर नोकरी देखील मिळवली.”

त्याकाळी वैद्यकीय हे महिलांचे आवडते क्षेत्र होते. परंतु ललिता अशा व्यवसायात इच्छुक नव्हती ज्यात तिला अर्धा रात्री बाळाला एकटे सोडून काम बघावे लागेल. तिला साधारण ९ ते ५ अशा वेळेतील नोकरी हवी होती ज्यामुळे तिला बाळाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळू शकेल.

ललिता ज्या कॉलेजमध्ये शिकत होत्या त्या कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सुद्धा त्यांच्या यशात मोठा वाट होता. शेकडो मुलांत एकटी मुलगी कॉलेजमध्ये शिकत असताना तिला तसे वेगळेपण कधीच जाणवू दिले नाही. अधिकाऱ्यांनी एकटीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची व्यवस्था केली होती. तीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिच्या बाळाला काकांसोबत ठेवलं होत, दर आठवड्याच्या शेवटी ललिता आपल्या मुलीला भेटायला यायची.

१९४० मध्ये ललिताने आपले शिक्षण सुरु केले. तेव्हा कॉलेज मधील वातावरण चांगल असल तरी हॉस्टेलवर मात्र त्या एकट्या असायच्या. तिकडे कॉलेजमध्ये महिलांना प्रवेश देण्याची जाहिरात करण्याची ही योग्य संधी असल्याचा कॉलेज प्रसाशानाने विचार केला. त्यानंतर लगेच प्रवेश सुरु होऊ लीलाम्मा जॉर्ज आणि पीके थ्रेसीया या दोन मुलींनी सिविल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला.

लालीता १९४३ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर पदवी पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची ट्रेनिंग घेणे गरजेच होत. तेव्हा त्यांनी जमालपूर रेल्वे वर्कशॉपमध्ये एक वर्षाची इंटरशिप पूर्ण केली. तिथे मोठ्या दुरुस्ती तपासण्याचे काम त्यांच्याकडे होते.

Representative image only 2019 06 10T104052.685

त्यानंतर त्यांनी १९४४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. सेंट्रल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, शिमला मध्ये सहायक अभियंता म्हणून २ वर्षे  काम केले. पुढे त्या असोसिएटेड इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज (एईआय), कलकत्ता येथे कामाला लागल्या.

१९५३ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर (आयईई), लंडन परिषदेने त्यांना सहकरी सदस्य म्हणून निवडले तर १९६६ मध्ये त्या पूर्ण वेळ सभासद बनल्या होत्या. जून १९६४ मध्ये न्यूयॉर्कमधील महिला अभियंते व शास्त्रज्ञांच्या (आयसीडब्ल्यूईएस) प्रथम आंतरराष्ट्रीय परिषदेत ललिताना आमंत्रित केले गेले होते. त्या इतर कुणीच भारतीय सहभागी नसल्याने लालीतांना एकटेच स्वतःला सादर करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

शेवटी वयाच्या ६० व्या वर्षी मेंदूच्या विकाराने ललितांचे निधन झाले. पण जाता जाता त्या येणाऱ्या पिढीसाठी एक अनमोल ठेवा ठेऊन गेल्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.