आत्मनिर्भर भारताचं उदाहरण देऊन पुरुष नाही तर महिला गॅरेज चालवत आहेत

नोकरी असो वा व्यवसाय आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. मग ते काम  इनडोअर असो किंवा आउटडोअर. अगदी पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या व्यवसायातही महिला समान भूमिका बजावत आत्मनिर्भर बनत आहेत. त्यातलचं आणखी एक उदाहरण म्हणजे औद्योगिक शहर म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या इंदौरमधलं यंत्रिका गॅरेज. कारण हे गॅरेज कोणी पुरुष नाही तर महिला चालवतात.

गाडीचं इंजिन उघडून पिस्टोनमधली गडबड दूर करण्यापासून गिअरमध्ये झालेलं बिघाड दुरुस्त करणं ही सगळीचं काम या महिला मॅकेनिक करतात. राजेंद्र देशबंधू हे या महिलांना गॅरेजच्या कामाचे धडे देतात. देशातील पहिले महिला मेकॅनिक गॅरेज सुरू करण्याचे श्रेय राजेंद्र यांना जाते.

सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या राजेंद्र देशबंधू यांच्या सोबत एक घटना घडली, ज्यामुळे या यंत्रिका गॅरेजची स्थापना झाली.  राजेंद्र यांनी सांगितले कि,

 “एकदा माझ्या गाडीचा क्लच लीव्हर तुटला. ती दुरुस्त करण्यासाठी मी एका गॅरेजमध्ये पोहोचलो. गॅरेजमध्ये एक १५ ते १६  वर्षांचा मुलगा काम करत होता. जो दिवसाला ५०० रुपये या अर्थाने महिन्याला १५००० रुपये कामे करत होता. आणि त्याच रस्त्यावर एक महिला झाडू मारत होती, जिला आसपासच्या दुकानात झाडू मारून महिना ३००० रुपये हातात मिळायचे. आता तस पाहिलं तर दोघांचं सुद्धा शिक्षण ५ वी पर्यंतचं. पण कमाईत मोठी तफावत होती. आणि यामागचं मोठं कारण म्हणजे  स्त्री-पुरुष यातला फरक.”

राजेंद्र यांच्या म्हणण्यानुसार दोघांची शैक्षणिक पातळी जरी सारखी असली तरी मुलाकडे तांत्रिक ज्ञान होते तर महिलेला नव्हते. हीच गोष्ट त्यांच्या मनाला खटकली. तेव्हापासून त्यांनी महिलेला कुशल बनवण्याचा निर्णय घेतला. याच प्रयत्नातून त्यांनी महिला मेकॅनिकसाठी प्रशिक्षण सुरू करण्यात आले. 

राजेंद्र यांनी सांगितलं कि, जानेवारी २०२० पासून महिला मेकॅनिक गॅरेज सुरू झालं आधी लोकांना ऐकायला आणि पाहायला थोडं वगळ वाटलं. अनेकांचे टोमणे खायला लागले. बायकांना गाड्यांमधलं काय कळतं, त्यांना कुठे हे काम धड जमणारे, असे बोलत लोक इथं येणं टाळत होती.   पण आता ग्राहकांची गर्दी वाढत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे हे काम थांबले होतं बऱ्याच महिला शहर सोडून आपल्या मूळ गावी गेल्या, पण आता ते पुन्हा सुरू झाले आहे.

 लॉकडाऊनपूर्वी जवळपास १९० महिलांना मेकॅनिकचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यापैकी ४० महिलांना सर्व्हिस सेंटरवर जोडण्यात आले. इंदूरमध्ये सध्या ३० महिला स्वतंत्र सर्व्हिस सेंटरवर  कार्यरत आहेत. त्याचबरोबर यांत्रिकाच्या पिपलियाहाना आणि पालडा सर्व्हिस सेंटरवरसुद्धा  रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 

यंत्रिका गॅरेजमध्ये काम करणाऱ्या महिलांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले कि,  शिकत असताना नवरा आणि घरच्यांनी आधी आक्षेप घेतला, पण जेव्हा घरच्यांना अडचणी आल्या तेव्हा सगळ्यांनी होकार दिला. आत जेव्हापासून त्या काम करतात त्यांनी मुलं शाळेत जाण्याबरोबर प्रायव्हेट कोचिंगसुद्धा घेत आहेत. घराच्या बाकीच्या खर्चातही त्या हातभार लावत आहेत. आज त्या सन्मानाने काम करत आहेत. 

नुकताच भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत गर्ल्स काउंट नेटवर्कने देशभरातील ६ राज्यांतील महिला उद्योजकांचा गौरव केला आहे.  यात मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि झारखंड या सहा राज्यांतील महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. ज्यात या यंत्रिका गॅरेजच्या महिलांचा सुद्धा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या महिलांचा गौरव करण्यात आला. 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यंत्रिका गॅरेजच्या पाच महिला मेकॅनिक सरोज रावत, शिवानी विश्वकर्मा, दुर्गा मीना, सपना जाधव आणि भगवती वर्मा यांचा गौरव करत म्हंटले कि, त्यांच्या या उपक्रमामुळे देशात नवा बदल घडणार आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.