ग्रीटिंग कार्ड असु दे की टेडी भारतीयांना व्हॅलेंटाईनला गिफ्ट्सची सवय लावली ती या ब्रॅण्डनेच

व्हॅलेंटाईन डे तशी आपल्यासाठी नवीन कॉन्सेप्ट. पण अगदी निब्बा-निब्बी दिवसांपासून फेब्रुवारीमधला प्रेमाचा सप्ताह आणि मग १४ तारखेचा फायनल डी डे हे सगळे रितीरिवाजाप्रमाणे अगदी काटेकोरपणे पाळलेत. म्हणजे चॉकलेट डेचं चॉकलेट असू द्या की टेडी डेचा तो लाल हार्ट लावलेला टेडी की प्रॉमिस डेचं ग्रीटिंग. हे सगळं पै-पै जमवून हक्कानं एकमेकांना दिलं आणि मागितलंपण. पण ह्याच गिफ्ट्सनी  एके दिवशी घात केला. तिच्या घरच्यांना हा सगळा मौल्यवान ऐवज सापडला आणि विषयच संपला. आठवणी जपायच्या नादात साठवणूक केली आणि तिथंच आमच्या पहिल्या प्रेमाचा बाजार उठला.

अर्रर्रर्र थोडं पर्सनल झालं! आज या सोन्यासारख्या दिवशी तुमचा मूड खराब करत नाही.

आणि आता तुमचा भिडू पण व्हॅलेंटाईचे  सोपस्कार चांगलेच शिकले असल्यानं तो पण आता मूव्ह ऑन झालाय.  सालाबादप्रमाणे याही वर्षी तो या सात दिवसांचे सोपस्कार अगदी भक्तिभावाने साजरे करत आहे. या सर्व प्रवासात एक गोष्ट नेहमीच कायम राहिली ती म्हणजे गिफ्ट्स आणि त्यासाठी पै पै साठवून आर्चिजला जाणं.

व्हॅलेंटाईनसाठी या आर्चिजच्या गिफ्ट शॉपी मध्ये फुल्ल तयारी असायची.

सगळं  प्रेमाच्या लाल रंगाने रंगलेलं नुसता लव्ह इज ईन दि एअर चा माहोल. त्यामुळं तिथून गिफ्ट घेणं पण सोप्पं असायचं. तसे त्यांच्या किंमती जास्त असतात पण प्रेमापुढे कसली आलेय किंमत असा टीपीकल डायलॉग मनातल्या मनातच मारत गिफ्ट तर घ्यायचंच.

भारतातल्या कपल्सना त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळवून देणारं हे आर्चिज गिफ्ट शॉप पक्क इंडियनच आहे.

अनिल मूलचंदानी यांची हि सोशल एक्सप्रेशनला बिझनेस बनवण्याची आयडिया होती.
ही कंपनी १९७९ मध्ये अस्तित्वात आली. सुरुवातीच्या टप्प्यात आर्चीज पोस्टर्स, गाण्याची पुस्तके आणि लेदर पॅचची विक्री करायचं. तेव्हा कंपनीचे मुख्य उत्पादन असायचं ग्रीटिंग कार्ड्स. अनिल मूलचंदानी याना पहिली ऑर्डर फक्त १२ रुपयांची होती. पण १०० करोडच्या पार लोकसंख्या असलेल्या  किती खळखळून वाहतं हे मूलचंदानी यांना माहित होतं आणि त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले.

ग्रीटिंग कार्ड विकणं कंपनीनं १९८० मध्येच चालू केलं होतं, कंपनीची स्थापना झाल्यानंतर एक वर्षानंतर.

१९८४ मध्ये, कंपनीने वॉल्ट डिस्नेकडून परदेशी परवाना मिळवला. तेव्हापासून ग्रीटिंग कार्ड्सच्या वर डोनाल्ड डक आणि मिकी माऊस दिसत होते. यानंतर ही कंपनी अधिक प्रसिद्ध झाली. १९८७ मध्ये आर्चीज गॅलरी चेन अस्तित्वात आली. त्यांची वेगवेगळ्या शहरातली ही दुकानं तुफान चालू लागली. १९९३ मध्ये, आर्चीज गॅलरीने स्टोअर्स उघडण्याचा १०० वा टप्पा पार केला होता.

त्यानंतर आर्चिज काळानुरूप चेंज होत गेलं. न्यू इंडियाच्या चालीरीती. आवडीनिवडी नुसार त्यांनी आपल्या दुकानातल्या वस्तूंमध्ये सुरवात केली. व्हॅलेंटाईन डेची आईडिया ही त्यातूनच आलेली. वर्षानुवर्षे व्हॅलेंटाईन डे च्या विक्रीतून चांगला फायदा काढला .

मात्र  जास्तच वेगाने बदलत आहे. ग्रीटिंग कार्ड देण्याऐवजी लोक सरळ व्हाटसऍपवर एखादं शुभेच्छा देणारं पोस्टर फॉरवर्ड करून मोकळे होतात. आणि याचाच फटका आज आर्चिजला बसल्याचं दिसतंय. त्याचबरोबर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्या माध्यमातूनही  गिफ्ट देणं शक्य झाल्याने आर्चिजची आता तेवढी क्रेज राहिली नाहीये.

बाकी तुमच्या व्हॅलेंटाईन गिफ्ट्सच्या कोणत्या आठवणी असतील तर त्या आम्हाला खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.