शिवसेना स्थापनेच्या ७ ते ८ वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत मराठीचा आग्रह धरला.

महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचे प्रमाण आजवर कमी राहिलेलं आहे. राज्याचे राजकारण   सुरवातीपासूनच पुरुष प्रधान राहिले आहे. आज आपण या सर्व गोष्टींचा बाबतीत बोलतोय त्याचं कारण या सर्व पुरुषी व्यवस्थेला झुगारून एक महिला उभी राहिली होती.  भारतीय राजकारणाच्या पटलावर महिलांना जर कोणी आणलं तर त्या मृणाल गोरे होत्या.

मृणालताईंचा जन्म २४ जून १९२८ ला सुशिक्षित घरात झाला. ताई तरुणपणीच स्वतंत्र चळवळीत भाग  घेऊ लागल्या.

वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी राष्ट्रां सेवा दलात काम सुरू केले. त्यावेळी ताई डॉक्टरकिचं शिक्षण घेत होत्या. पुढे वैद्यकीय शिक्षण त्यांनी सोडून दिले अणि पूर्ण वेळ समाजसेवेत स्वतःला झोकुन दिले. त्या गांधीजींच्या विचारानी प्रभावित झाल्या होत्या. मृणाल ताई एकदा म्हणाल्या होत्या,

” आज डॉक्टरां पेक्षा ही जास्त समाजाला समाज सेवकांची गरज आहे.”

पुढे वर्षभरातच त्यांनी सोशालीस्ट  पार्टी काढली अणि एका प्रवासाला सुरुवात झाली. प्रथम त्या गोरेगाव ग्रामपंचायतीत सदस्या म्हणुन निवडुन आल्या. एकदा गोरेगावमध्ये राममनोहर लोहिया यांची एक सभा होती. सभा संपल्यावर परतत असताना त्यांना रस्त्यात हंडा घेऊन उभ्या असलेल्या काही महिला दिसल्या. त्यांनी मृणाल ताईन सांगितलं,

“मृणाल, इस प्रश्नो को हाथमे लेके तुम काम चालू करो..”

राममनोहर लोहिया यांच्या प्रेरणेमुळे मृणाल ताईनी पुढे पाण्याच्या प्रश्नावर लढा सुरु केला. इथूनच लोक त्यांना ‘पाणीवाली बाई ‘ म्हणुन ओळखू लागले. १९६१ साली महापालिका आली. तिथ ही त्या निवडून आल्या.

महापालिकेत त्यांनी महापालिकेचा कारभार मराठीतूनच चालावा म्हणुन बंड पुकारले. ही गोष्ट शिवसेनेच्या स्थापनेच्या ही सात आठ वर्ष आधीची आहे.

गांधींच्या राजकारणात बराच काळ “मीठ” हे प्रतिक होता. मृणाल ताईच्या राजकारणाचे “पाणी” हे प्रतिक राहिले.

त्यांच्या प्रत्येक  आंदोलनात सामान्य स्त्रीची हालअपेष्टा, तिच्या जगण्यातला संघर्ष, तिला नाकारले गेलेले सर्व अधिकार ह्यावर जोर असायचा. ताई नेहमीच सांगत एकूण लोकसंख्येच्या निम्म्या स्त्रिया आहेत पण त्यांच्या न्याय व हक्कांसाठी कोणी काहीच बोलत नाही. महिलांचाही ताईंना पाठिंबा होता हजारो स्त्रिया ताईच्य आंदोलनात एकवटत होत्या.त्यांना मनापसून साथ देत होत्या .

opd0151
लाटणे आंदोलन

१९७२ साली त्या विधानसभेत निवडून गेल्या. त्यावेळी त्यांच्या विरुद्ध उभे होते माधवराव परांजपे. त्यांच्या प्रचाराला खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी गोरेगाव मध्ये आल्या. या प्रचार सभेमुळे लढत परांजपे विरुद्ध मृणाल गोरे अशी न राहता, इंदिरा गांधी विरुद्ध मृणाल गोरे अशी झाली. आणि इंदिरा गांधीची लाट असूनही मृणाल ताई निवडून आल्या.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दलितांचे, आदिवासी लोकांचे, महिलांचे प्रश्न धडाडीने मांडले. हाच तो काळ होता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका स्त्रीला मोठं होतांना महाराष्ट्राने पाहिले.

पुढे १९७५ साली इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली. महाराष्ट्रात एसएमजोशी, दुर्गाबाई भागवत, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा केला. जयप्रकाश नारायण यांच्या आदेशांनुसार ही समाजवादी मंडळी आणीबाणीमधल्या दडपशाहीच्या विरोधात आक्रमक झाली होती.

मृणाल ताईनी इंदिरा गांधीना मुंबईत घेराव घालण्याची योजना आखली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी त्यांच्या अटकेचे आदेश काढले. मृणाल ताई भूमिगत झाल्या. अनेक महिने त्या कोणाला सापडल्या नाहीत. तेव्हा वैतागून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना ‘एक बाई सापडत नाही’ या वरून झापलं होतं. पुढे त्यांना अटक झाली. तुरुंगामध्ये त्यांचा मुद्दामहून छळ करण्यात आला. पण त्या डगमगल्या नाहीत.

आणीबाणी सुटली तेव्हा त्यांचं नाव देशपातळीवर इंदिरा गांधीशी पंगा घेणारी बाई अशी झाली होती. १९७७ ला त्या जेव्हा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेल्या.

“तेव्हा पाणी वाली बाई दिल्ली मैं और दिल्लीवाली बाई पाणी मैं”

असं लोक इंदिरा गांधी आणि मृणाल गोरे यांच्या बाबतीत म्हणाले. १९८५ साली त्या परत आमदार झाल्या. स्त्रीभ्रूण हत्ये बाबतीतला कायदा पास करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. गोरगरिबांच्या झोपड्या वाचाव्यात त्यांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ताईंनी अनेक आंदोलनं केलीत. ह्याचंच फलित की नागरी निवारण परिषदे अंतर्गत सहा हजार घरे बांधण्यात आली. ह्यातूनच सर्वसामान्यांच्या आवाज अशी त्यांची ओळख झाली.

ताईंचा वैशिष्ठ्य म्हणजे त्या नेहमीच सत्ते पासून दूर राहिल्या. १९७८ साली पुलोद चं सरकार आले ताईंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत राहिलं. पुढे जनता पक्षाचे  महाराष्ट्राचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. त्यांनी महाराष्ट्राच्या विधान सभेत  विरोधी पक्षनेत्या म्हणून ही  काम केले. दिल्लीच्या राजकारणात असताना त्यांनी चंद्रशेखर ,वी .पी .सिंग यांच्या सारखे पंतप्रधान त्यांनी पहिले. दिल्लीत ही त्यांना अनेकदा मंत्री पदासाठी आग्रह धरण्यात आला पण ताईनी अत्यंत नम्रपणे नकार दिला .

त्या नेहमी म्हणत सत्ता मला सामान्य स्त्री पासून लांब घेऊन जाईल , मला जमिनीवरच्या प्रश्नांची जाण राहणार नाही . माझ्यासाठी नाहामीच सामान्य स्त्री आणि तिचे अधिकार महत्वाचे आहेत . सत्तेत जाण्यापेक्षा बाहेर राहूनच आपल्याला मोठे काम करता येईल असे त्यांना वाटे .

वयाच्या ८४व्या वर्षी त्या वारल्या आणि हा सर्वसामन्यांच्या हा आवाज नाहीसा झाला . ताईनीं अनेक सत्तेची पदे नाकारली. त्या नेहमीच तळागळातील  लोकांचे प्रश्न मांडत राहिल्या त्यांच्या साठीच जागल्या. ज्या काळात त्यांनी हे सर्व केले तो काळ स्त्रियांसाठी अनेक अर्थानी आव्हानात्मक होता.

आज घडीला अनेक तरुण मुली समाजकारणात स्वतःला अजमावू पाहत आहेत त्यांच्या साठी मृणाल ताई या अखंड प्रेरणा स्त्रोत्र आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.